Description
बॉक्स निर्मिती ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम.
कॉर्गेगेटेड क्राफ्ट पेपर बोर्ड बॉक्स, तांत्रिकदृष्ट्या कोरूगेटेड फायबर बोर्ड-बॉक्स म्हणतात, आजकाल हे सर्वात लोकप्रिय शिपिंग कंटेनर आहे. बॉक्समध्ये रसायने आणि औषधे, तंबाखू, अभियांत्रिकी वस्तू, कॅन केलेला आणि बाटलीबंद वस्तू, खाद्यपदार्थ, दिवे, विद्युत उपकरणे, काचेच्या वस्तू इत्यादींच्या पॅकेजिंगमध्ये त्यांची संख्या किती आहे हे पॅकेजिंग देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. अलीकडे फक्त पश्चिमी जगापर्यंत, विशेषत: विकसित देशांनी योग्य पॅकेजिंगची काळजी घेतली. आपल्या आवडत्या सुपरमार्केट, डिस्काउंट स्टोअर किंवा शॉपिंग मॉलमधील बर्याच वस्तू सुरक्षितपणे नालीदार पुठ्ठ्याने बनवलेल्या बॉक्समध्ये वितरीत केल्या गेल्या. तथापि, आता भारतासारख्या विकसनशील देशांनीही पॅकेजिंगकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे आणि गेल्या काही वर्षांत सुधारित व योग्य पॅकेजिंगवर वाढता ताण दिला गेला आहे. आज, पॅकेजिंग सामग्रीइतकेच महत्वाचे आहे.
-
-
- ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये तुम्हाला या उद्योगाविषयी बऱ्याच प्रमाणात माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तुम्हाला हा उद्योग सुरू करण्यासाठी तुमचा पाया पक्का करताना ह्या कोर्स चा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
- हा कोर्स तुम्ही 30 दिवस पाहू शकता .30 दिवसांनंतर हा कोर्स एक्सपायर होऊन जाईल. त्यामुळे 30 दिवसात हा कोर्स संपवायचा आहे .
- या कोर्स मध्ये काय काय शिकवले जाते त्याची माहिती तुम्हाला curriculum section मध्ये दिली आहे कोर्स घेण्यापूर्वी अगदी ती सगळी बघून घ्या.
- शक्यतो मराठी भाषेमध्ये संपूर्ण कोर्स असून सोप्या आणि सहज भाषेमध्ये यामध्ये माहिती दिलेली आहे.
- कोर्स हा व्हिडीओ फॉरमॅटमध्ये असून तुम्हाला विषयानुसार वेगवेगळ्या व्हिडिओ curriculum section मध्ये दिसतील.
- या उद्योगाला जागा किती लागते ? शेड कसे बांधावे लागते तसेच मशिनरी कुठून घ्याव्यात साधारण इन्वेस्टमेंट किती लागते याविषयी सुद्धा कोर्समध्ये माहिती देण्यात आली आहे.
- याप्रमाणेच उद्योग उभा करण्यासाठी नक्की अगोदर काय तयारी करावी लागते ? तुमची मानसिक स्थिती ? कुटुंबाचा सपोर्ट यासारख्या विषयांवर तीसुद्धा मार्गदर्शन करण्यात आले आहे.
- सोबतच लोन मिळवण्यासाठी नक्की काय करावे लागते ? प्रकल्प अहवाल म्हणजे काय ? सध्या शासकीय योजना कोणत्या सुरू आहेत त्या विषयी माहिती सुद्धा कोर्समध्ये देण्यात आली आहे.
- कच्चामाल मशिनरी कुठे मिळतील यासाठी काही संपर्क क्रमांक सोबत देण्यात आले आहेत.
- जर तुम्हाला काही अडचण आली, व्हिडीओ पाहताना काही प्रश्न उभे राहिले तर ते प्रत्येक वेळी लिहून ठेवा आणि नंतर आमच्या counselor( तज्ञ सल्लागार) टीमशी चर्चा करून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सहजरीत्या मिळवा.
- लक्षात घ्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी तुम्हाला तीनदा चर्चा करता येईल त्यामुळे सगळे प्रश्न वेळोवेळी लिहून ठेवल्या नंतर फोनवर बोलते वेळी तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांचे निरसन करून घेता येईल.
-
बॉक्स निर्मिती प्रशिक्षण कोण करू शकतो ?
- ज्या तरूणाला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे असे प्रत्येक तरूण हा व्यवसाय करू शकतात.
- ग्रामीण तसेच शहरी भागात स्वतःचा उद्योग सुरू करण्याची इच्छा असणारी प्रत्येक व्यक्ती, कोणतीही संस्था किंवा कंपनी हा व्यवसाय करू शकतात.
- महिला बचत गट किंवा शेतकरी गट किंवा फार्मर प्रोड्यूसर कंपनी हा व्यवसाय सुरु करू शकतात .
हा प्रोग्राम केल्यावर काय फायदा होईल?
- तुम्हाला बॉक्स निर्मिती उद्योगाविषयी मनात जेवढ्या शंका असतील त्या संपूर्ण निरसन झाले असेल.
- एक कोर्समधील दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला स्वतःचा उद्योग कसा सुरु करायचा हे समजू शकेल.
माहितीसाठी या उद्योगाविषयी सर्वसाधारण माहिती देणारा आपला युट्युब वरील व्हिडिओ .
View Course Introduction Video on Youtube
Reviews
There are no reviews yet.