• No products in the cart.

About Director

Mr.Amit Makhare

मला काही तरी माझा एखादा छोटासा शेतीपूरक उद्योग सुरु करायला पाहिजे ? पण कोणता ? कसा ? कुठे ? कधी ? या आणि यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे देण्याचे काम किंबहुना स्वत:चा उद्योग सुरु करावा या विचारात असलेल्या प्रत्येक नव उद्योजकास, शेतकऱ्यास ,  महिला बचत गटास सर्व प्रकारचे मार्गदर्शन आणि सहकार्य करण्याचे काम  अमित मखरे सर  यशस्वीरित्या करताना दिसतात.

 

पुण्या मुंबई च्या मोठ्या करियर च्या वाटा सोडून अमित मखरे सरांनी  त्यांच्या  अर्धांगिनी सौ.प्राची मखरे यांच्या सहकार्याने अहमदनगर येथे २०१0  साली घरच्या घरीच चावडी कृषी सल्ला व सेवा केंद्र सुरु केले.

नाममात्र शुल्क आकारून शेतकऱ्यास, नव उद्योजकास मार्गदर्शन करणे ही मूळ संकल्पना.

सर सांगतात., आज महाराष्ट्रात बोटावर मोजण्याइतके व्यवसाय सल्ला व सेवा आहेत .

मुळात कृषी चे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या मुलाने गावाकडे येऊन आपल्या शेतकरी बांधवास आधुनिक तंत्रज्ञान बाबत जागरूक करावे आणि पारंपारिक शेतीत सुधारणा करावी हि संकल्पना मागे पडलीय. कृषी पदवीधर शिक्षण घेऊन स्पर्धा परिक्षा कडे वळताना दिसतो. पण सगळेच त्यात यशस्वी होत नाहीत..मग  माझे वर्गमित्र स्पर्धा परिक्षाची तयारी करत असताना मी उद्योगाची माहिती घेत सैरभैर फिरायचो.इतर मित्र मला वेड्यात काढायचे. शिक्षण पूर्ण झाल्यावर सगळे मित्र स्पर्धा परिक्षा अभ्यास कुणी MPSC तर काही एमबीए कडे वळले. मी सुद्धा एमबीए ला पुण्यात प्रवेश घेतला आणि हळू हळू हा सल्ला व सेवा केंद्र चा उपक्रम सुरु केला .

एमबीए वर्ष पूर्ण करता मी चांगल्या पैकी पैसे कमवू लागलो. आणि मग मनात विचार आला जर मला बिझनेसच करायचंय मग मी आता दुसऱ्या वर्षासाठी परत फी चे पैसे का वाया घालू आणि मी आईशी चर्चा केली तिने सुद्धा पाठींबा दिला आणि मी अर्धवट शिक्षण सोडून इतर ठिकाणी हि कामे सुरु केली. २०१० मध्ये पुणे सोडून नगर मध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.

 

जे जे आपणास ठावे ते इतरांना सांगावे या उक्ती प्रमाणे अमित मखरे यांनी व्यवसाय मार्गदर्शक हे करियर निवडले. अनेकांनी त्यांना वेड्यात काढलं. शिकलेल्यांनी “करियर बेस्ट आहे पण नगर मध्ये स्कोप नाही “ असा सल्ला दिला. मात्र या तरुणाने आपल्या ध्येयावरचा विश्वास तस भर सुद्धा कमी होऊ दिला नाही. भांडवलाचा अभाव असल्याने राहत्या घरीच चावडी ची सुरवात झाली.

घरच्यांचा पाठींबा

कोणत्याही तरुणाने घरी विचारले कि मला माझा स्वतःचा  बिझनेस सुरु करायचा आहे तर ९० % घरांमध्ये आजही पालक कशाला तो बिझनेस त्यापेक्षा ५००० ची नोकरी कर पण बिझनेस नको अशी प्रतिक्रिया देतात.

पण सरांच्या बाबतीत  उलट झाले आई कृषी विभागात उच्च पदावर नोकरी करत असून तिच्या ओळखीने कुठेही चांगली नोकरी मिळाली असती …वडिलांचे निधन झाले असून सुद्धा त्या आईने मुलाचा हा हट्ट तर पुरवलाच पण व्यवसाय उभा करण्यासाठी त्यास मानसिक – आर्थिक  सर्व प्रकारचा  आधार दिला. हि खरी यशाची सुरवात होती असे अमित सर सांगतात.

 

मुलगा व्यवसाय किंवा शेती करत असेल तर त्या  मुलांबरोबर लग्न करायला मुली तयार होत नाहीत अशी एक मोठी समजूत आपल्या ग्रामीण भागात आहे. पण अमित चे लग्न तर झालेच पण मराठी कुटुंब पद्धतीत बाईकोने व्यवसायात लक्ष घालावे अशी मानसिकता आपल्याकडे नसून सुद्धा आज त्याची अर्धांगिनी सौ.प्राची त्याची बिझनेस पार्टनर आणि कंपनी मध्ये स्वत: मॅनेजिंग डायरेक्टर आहे. उलट जोडीने खांद्याला खांदा लावून व्यवसाय केला तर व्यवसायात अधिक यश मिळते आणि एकमेकाला समजून घेता येते असे अमित सर यांनी सांगितले.

आलेल्या अडचणी

उद्योगाची सुरवात तशी खडतर असते माझ्या बाबतीत ती अधिकच खडतर होती असे अमित सर सांगतात.

नगर मध्ये जेव्हा राहत्या घरी सुरवात केली तेव्हा शेतकरी आणि सामान्य नागरिकांना हि संकल्पना माहित नसल्याने माहिती विचारण्यासाठी कशाला पैसे द्यायचे असे लोकांना वाटे.

सुरवातीचे ६ महिने तर फक्त ५००/- रुपये उत्पन्न झाले. त्यानंतर हळू हळू लोक यायला लागले.. केलेल्या मार्गदर्शनाचे ,कामाचे पैसे देऊ लागले.. या पडत्या काळात अनेक कृषी अधिकारी वर्गाने साथ दिली. आणि बघता बघता संपूर्ण महाराष्ट्र भर अनेक ठिकाण हून चौकशी होऊ लागली कमी फी मध्ये मुबलक सल्ला व सेवा देत असल्याने लांबून लोक भेटण्यासाठी येऊ लागले .

 

आणि मग चावडी चे स्वतंत्र कार्यालय उभे राहिले .त्यानंतर मग मागे वळून पहिलेच नाही आज २००० फुटाचे प्रशस्त कार्यालय अहमदनगर येथे आहे.

नक्की काम काय चालते.

चावडी ने सुरवातीपासून गुणवत्तेला प्राधान्य दिले, नाविन्याचा शोध घेतला आज चावडी मार्फत २५० पेक्षा जास्त उद्योगांचे मार्गदर्शन केले जाते सर्व प्रकारचे सहकार्य केले जाते राज्यातील अनेक जिल्ह्यात चावडी चा विस्तार झाला आहे चावडी कडून सेवा घेणारा ग्राहक समाधानाने भरून पावतो हीच चावडी च्या यशाची पावती आहे.

आज चावडी मार्फत विविध योजना विषयी चे उद्योगाविषयी चे हजारो शेतकऱ्यांना मोफत एस एम एस पाठीविले जातात.मागच्या वर्षी कृषी दिन निम्मित चावडी या नावाने एनड्रोइड अँप्लिकेशन (Android app) उपलब्ध करून दिले असून त्यावर सर्व उद्योगांची माहिती मराठी भाषेमध्ये उपलब्ध आहे. चावडी च्या तिसऱ्या वर्धापनदिना निमित काही गावे दत्तक घेऊन त्या गावात शासकीय योजना पोहचवण्याचे विधायक काम केले. या कृषी पदवीधरांने उभारलेले काम मराठी तरुणांमध्ये व्यावसायिक वृत्ती निर्माण करण्यासाठीचा आदर्श प्रयत्न आहे

All Right Reserved.