Description
शेतमालाची बाजार समितीत मोठ्या प्रमाणात नियमित आवक होत असते परंतु शेतमाल हा अधिक काळ चांगल्या स्थिती राहावा तसेच शेतमालाला योग्य भाव मिळवा यासाठी कोणतीही परिपूर्ण व्यवस्था तालुका आणि शहरी भागात आढळत नाही.
तसेच मागील पाच वर्षांमध्ये खाद्य संस्कृतीमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. आजची पिढी प्रक्रिया उत्पादने खाण्यामध्ये अतिशय उत्साही दिसते परंतु हे पदार्थ साठवणूक करण्यासाठीची अपुरी व्यवस्था आज भारतात दिसून येत आहे.मूल्यवर्धित प्रक्रिया उत्पादने बाजारात आणण्यापूर्वी त्याची ऋतुमानानुसार साठवणूक(Cold Storage) केली जाते.
शेतमाल आणि प्रक्रिया उत्पादनांची मागणी येणाऱ्या काळात अतिशय वेगाने वाढवण्याचे जागतिक बाजारपेठेतून संकेत आहेत.भविष्यातील संधी ओळखून आपण जर आजच पावले उचलली तर उच्च आर्थिक उत्पन्न देण्याची क्षमता असणारा Cold Storage उद्योग आपण यशस्वीरित्या करू शकतो. ज्याचे पहिले पाऊल चावडीने Cold Storage या कोर्सच्या माध्यमातून आणले आहे.
- ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये तुम्हाला या उद्योगातील तांत्रिक प्रक्रियेविषयी माहिती देण्यात आली आहे. तुम्हाला हा उद्योग सुरू करण्यासाठी तुमचा पाया पक्का करताना ह्या कोर्सचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
- Cold Storage उद्योग कोर्समध्ये काय शिकवले जाते त्याची माहिती तुम्हाला Curriculum Section मध्ये दिली आहे. कोर्स घेण्यापूर्वी ती सगळी बघून घ्या.
- मराठी आणि हिन्दी भाषेमध्ये संपूर्ण कोर्स असून सोप्या आणि सहज भाषेमध्ये माहिती दिलेली आहे.
- कोर्स हा व्हिडीओ फॉरमॅटमध्ये असून तुम्हाला विषयानुसार वेगवेगळ्या व्हिडिओ Curriculum Section मध्ये दिसतील.
- Cold Storage उद्योगाला जागा किती लागते ? शेड कसे बांधावे लागते तसेच मशिनरी कुठून घ्याव्यात, साधारण इन्वेस्टमेंट किती लागते या विषयी कोर्समध्ये माहिती देण्यात आली आहे.
- या प्रमाणेच उद्योग उभा करण्यासाठी नक्की अगोदर काय तयारी करावी लागते ? तुमची मानसिक स्थिती ? कुटुंबाचा सपोर्ट या सारख्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले आहे.
- सोबतच लोन मिळवण्यासाठी नक्की काय करावे लागते ? प्रकल्प अहवाल म्हणजे काय ? सध्या शासकीय योजना कोणत्या सुरू आहेत त्या विषयी माहिती सुद्धा कोर्समध्ये देण्यात आली आहे.
- हा कोर्स तुम्ही ३० दिवस पाहू शकता. 30 दिवसांनंतर हा कोर्स एक्सपायर होऊन जाईल. त्यामुळे 30 दिवसात हा कोर्स संपवायचा आहे .
- जर तुम्हाला काही अडचण आली व्हिडीओ पाहताना काही प्रश्न निर्माण झाले तर ते प्रत्येक वेळी लिहून ठेवा आणि नंतर आमच्या Counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी चर्चा करून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सहजरित्या मिळवा.
- लक्षात घ्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी तुम्हाला तीनदा चर्चा करता येईल त्यामुळे सगळे प्रश्न वेळोवेळी लिहून ठेवल्यानंतर फोनवर बोलते वेळी तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांचे निरसन करून घेता येईल.
Cold Storage व्यवसाय कोण करू शकतो ?
- Cold Storage उद्योग शेतकरी करू शकतात.
- ज्या तरूणाला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे असा प्रत्येक तरूण हा व्यवसाय करू शकतो .
- ग्रामीण भागात स्वतःचा उद्योग सुरू करण्याची इच्छाअसणारी प्रत्येक व्यक्ती, कोणतीही संस्था किंवा कंपनी हा व्यवसाय करू शकतात.
- महिला बचत गट किंवा शेतकरी गट किंवा फार्मर प्रोड्यूसर कंपनी हा व्यवसाय सुरु करू शकतात .
Cold Storage उद्योग ऑनलाईन प्रशिक्षण केल्यावर तुम्हाला काय फायदा होईल ?
- तुम्हाला Cold Storage उद्योगाविषयी मनात जेवढ्या शंका असतील त्या संपूर्ण शंकांचे निरसन होईल.
- Cold Storage उद्योग कोर्समध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला स्वतःचा उद्योग कसा सुरु करायचा हे समजू शकेल.
माहितीसाठी या उद्योगाविषयी सर्वसाधारण माहिती देणारा आपला युट्युब वरील व्हिडिओ .










Reviews
There are no reviews yet.