आंबा प्रक्रिया उद्योग…!!!!

आंबा प्रक्रिया उद्योग…!!!!

आपल्याकडे आंबा खाण्याच्या अनेक पारंपरिक पद्धती आहेत. कापून खाणे, चोखून खाणे, आमरस, ज्युस  , तर त्याही पुढे जाऊन आंबा पोळी, आंबा वडी या स्वरूपात खाणे. पण गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानाने यात आणखीन एका प्रकाराची भर पडली आहे. आंब्याचा रस काढून त्यावर प्रक्रिया करून तो हवाबंद डब्यात साठवून मग वर्षभरात आपल्याला आवडेल तेव्हा खाता येतात. त्यामुळे आंब्यापासून तयार केलेल्या पदार्थांना सर्वत्र मोठ्या मागणी असल्याचे दिसून येते.

आंबे समृध्दीचे फळ मानले जाते. आकर्ष रंग, उत्तम स्वाद, अप्रतिम चव आणि चांगली पोषणमूल्ये आंब्यामध्ये एकवटली आहेत. भारत जगातील सर्वात मोठी व चांगल्या प्रतीचा आंबा उत्पादक देश आहे. आपणाकडे दरवर्षी १२ ते २० दशलक्ष टन इतके उत्पादन होते.

महाराष्ट्र सरकारच्या फलोद्यान योजनेमुळे संपूर्ण राज्यातच आंबा लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. कृषी पणन मंडळाने           ‘ अपेडा ‘ च्या सहकार्याने आंबा निर्यात क्षेत्राची २००३ मध्ये स्थापना करण्यात आली. आंबा निर्यात क्षेत्रामुळे आंबा लागवड आंबा फळांना बाजारपेठे मिळवून देणे, आंबा फळांवर प्रक्रिया करता येणारे छोटे घरगुती उद्योग सुरु करणे इतके व्यापक क्षेत्र आज आंबा व्यवसायात निर्माण झाले आहे. आंबा लागवडीमुळे हंगामात स्थानिक लोकांना रोजगार मिळतो.

चावडी चे Affiliate बना,सोशल मिडिया वर मेसेज शेयर करा,अधिकचे उत्पन्न कमवा.अधिक माहितीसाठी या लिंक वर क्लिक करा.

आंब्याच्या टिकावू पदार्थात प्रामुख्याने दोन प्रकारचे पडतात.

  • कैरीपासून तयार केलेले पदार्थ – लोणचे, आमचूर, पन्हे, गुळांबा, साखरांबा, कैरीच्या वड्या.
  • पिकलेल्या आंब्यापासून तयार केलेले पदार्थ – आंबा वडी, सरबत, मुरांबा जॅम, आंबा पोळी, आंबा साठे, हवाबंद डब्यात गराची / रसाची साठवण, मद्य इ. कुटरिरोद्योगातून साल आणि कोय हे टिकाऊ पदार्थ उपलब्ध होतात. आंब्याच्या सालीमध्ये पेक्टिन या मौल्यवान घटकाचे प्रमाण १०-१५ टक्के इतक्या प्रमाणात स्निग्ध पदार्थ असतात. कोयीपासून स्निग्ध पदार्थ मिळवल्यास उच्च दर्जाच्या स्निग्ध पदातुँचा उपयोग चॉकलेट आणि बेकरी उत्पादनात करता येतो.

 

आंब्यापासून बनवण्यात येणारे पदार्थ :–

  • आंबा पल्प – हापूस आंबा सर्वत्र लोकप्रिय आहे. वर्षातून केवळ दोन ते तीनच महिने त्याची चव चाखायला मिळते. मात्र प्रक्रिया करून त्यापासून विविध पदार्थ बनविले तर या हापूसची चव बाराही महिने चाखायला मिळते. हाच प्रक्रियेचा म्हणजे पल्पनिर्मितीचा उद्योग (याला कॅनिंग असेही म्हणतात) असे म्हणतात. हा उद्योग सर्व़त्र मोठ्या प्रमाणात केला जातो.
  • लोणच्यासाठी खारवलेल्या फोडी – रायवळ आंब्याचे फळ कैरी स्वरूपात असतानाच त्यांच्या फोडी करून मिठात ठेवल्या-खारवल्या म्हणजे टिकतात. त्या प्रामुख्याने लोणच्यासाठी वापरता येतात. या फोडी वर्षभर टिकतात. त्यापासून लोणचे करून वर्षभर टिकवणे शक्य होते. असा आंबा फोडी खरवण्याचा उद्योग ग्रामीण भागात विशेषत: स्त्रियांना रोजगार प्राप्त करून देता येतो. आंबा पासून बनवलेल्या लोणच्याला हाँगकाँग इस्त्रायल व आखाती देशात मागणी अधिक आहे.

 

 

  • आंबा वडी – हापूस आंब्याच्या रसापासून तयार केले जाणारे हे घरगुती उत्पादन कोकणात लोकप्रिय आहे. रस आणि साखर एकत्र शिजवनू चांगले घटतात. शिजलेल्या थंड रसाचा गोळा लाटून त्यांच्या वड्या तयार केल्या जातात. या वड्याना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे दिसून येते.
  • आंब्याचे सरबत – पिकलेल्या आंब्याचा रस, साखर, थोडेसे पाणी, सायट्रिक आम्ल, पोटॅशियम मेटाबाय सल्फेट यांच्या साह्याने हे सरबत तयार केले जाते. व त्याची मोठ्या प्रमाणात विक्री वर्षभर केली जाते.
  • कैरीचे पन्हे – कैऱ्यांचे पन्हे दोन प्रकारे केले जाते. कैरीचा किस पाण्यात कोळून किंवा कैऱ्या उकडून त्यांचा गर पाण्यात मिसळून चवीपुरते मीठ,साखर, केशर, वेलंदाडे पूड घालतात. हे पन्हे विविध पॅकिंग करून विक्री केली जाते.

 अधिक माहितीसाठी :- 8830350675 

अधिक माहिती साठी खाली देलेल्या call now या ग्रीन बटनावर क्लिक करा किंवा थेट कॉल करा.

 

1 thought on “आंबा प्रक्रिया उद्योग…!!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Customer Care