स्टील सम्राट लक्ष्मी मित्तल -पर्सन ऑफ दि इयर

लोखंडाचा सम्राट(King of Steel Lakshmi Mittal)करतो, १५ देशात व्यवसाय……!!!


भारतात जन्मलेल्या पण लंडनमध्ये वास्तव्यास असणाऱ्या King of Steel Lakshmi Mittal यांचा जन्म १५ जून १९५० मध्ये राजस्थान मधील सादुलरपूर या गावी झाला. जगातील सर्वात श्रींमंताच्या यादीत त्यांचे नाव बऱ्याच वरच्या क्रमांकात असते. ‘ फायनांशियल ’ टाइम्सने त्यांना २००६ साली ‘ पर्सन ऑफ दि इयर ’ हा किताब बहाल केला. कोलकात्यातील सेंट झेवियर महाविद्यालयातून त्यांनी बी.कॉमची पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी आपल्या व्यवसायिक जीवनाची सुरुवात त्यांच्याच कुटुंबाच्या स्टील तयार करण्याच्या कारखान्यात केली. सुमारे ३२ वर्षांचा व्यवसायिक अनुभव त्यांच्या खात्यावर जमा आहे. श्री.लक्ष्मी यांनी १९७६ साली मित्तल स्टील या कंपनीची स्थापना केली. तेव्हा पासून ते या कंपनीच्या विस्तारासाठी आणि विकासासाठी झटताहेत. मित्तल स्टील ही एक जागतिक संस्था असून तिचा विस्तार जवळजवळ १५ देशात आहे. लक्ष्मी हे इंटिग्रेड मिनी मिल्स आणि डायरेक्ट रिड्यूस्ड आर्यन (D.R.I) या कार्य पध्दतीचे जनक आहेत. त्यामुळे जागतिक स्टील उत्पादन करणारी कंपनी ठरली आहे. त्यांच्या ह्या नेत्रपदीक कामगिरीबद्दल जगातील बहुतेक नामवंत संस्थांकडून त्यांच्या कार्याचा गौरवही झाला आहे.
                                (Dairy By Product Online Training Programme…!!!  अधिक वाचा :- https://bit.ly/2QK8Q9e )

                                       
मित्तल यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात इंडोनेशिया पासून केली. तेथील मोडकळीस आलेले स्टीलचे कारखाने त्यांनी विकत घेतले. त्यानंतर एक सावकार उषा मोडकळीस आलले स्टीलचे कारखाने त्यांनी विकत घेतले. त्यानंतर एक सावकार कन्या उषा यांच्या बरोबर त्याचा विवाह झाला. १९९४ साली वडील आणि भाऊ यांच्यात काही मतभेद झाल्यामुळे त्यांनी त्यांच्या व्यवसायातून वेगळे व्हायचे ठरवले आणि आंतरराष्ट्रीय व्यवसायावर लक्ष केंद्रीत करायचे ठरवले. मतभेदांचे कारण मात्र गुलदस्त्यातच राहिले. मागील सतत तीन वर्षे ते इंग्लडमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून निवडले गेले. सध्या ते आर्सेलर स्टील या कंपनीचे अध्यक्ष आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी आहेत. ही कंपनी लो आणि मिड ग्रेड स्टील तयार करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे.
             (सोयाबीन बाय प्रॉडक्ट ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम !!! अधिक वाचा :-https://bit.ly/3w5rB71 )


           (मका प्रोसेसिंग ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम !!!  अधिक माहितीसाठी :- https://bit.ly/2QAEqWM )
केवळ १९८० साली सुरु केलेल्या कंपनीचे रूपांतरस्टील सम्राट लक्ष्मी मित्तल यांनी वार्षिक उलाढाल सहा मिलियन डॉलर्स आणि ८०,००० हजारांहून अधिक कामगार असणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या स्टील उत्पादक कंपनीत केले. त्यांच्या कंपनीची क्षमता २० मिलियन टन स्टील उत्पादनाची आहे. लक्ष्मी मित्तल यांचे कौशल्य अनेक देशातून आजारी स्टील उद्योग स्वस्तात विकत घेऊन त्यांचे रूपांतर उत्तम उत्पादक कारखान्यात करणे हे आहे. दूरदृष्टी आणि प्रचंड कष्टाची तयार यामुळेच हे शक्य झाले आहे. जगातील स्टील उद्योग आजारी असाताना त्यांच्या सर्व कंपन्या मात्र भरपूर फायद्यात चालतात हे त्यांच्या कर्तृत्वाचे दृश्य स्वरूप आहे.
                        

                         
स्टील सम्राट लक्ष्मी मित्तल यांना राजे शाही आयुष्य जगायला आवडते. त्यांचे घरही जगातील सर्वात महागडे घर आहे. आपल्या मुलीच्या लग्नासाठी त्यांनी २००४ साली ६५ मिलियन डॉलर्स एवढा खर्च केला. त्यांचा मुलगा आदित्य हा त्यांच्याच कंपनीत अर्थविभागाचा प्रमुख आहे. त्यांनी आपल्या घरातील चित्रांसाठी एम.एफ. हुसेन यांना सहा महिने लंडनला ठेऊन घेतले होते.
                          

Stay Updated…
Other Blogs
Follow Us On Facebook And Instagram
For More Information Please Call Us On 7272971971

0 responses on "स्टील सम्राट लक्ष्मी मित्तल -पर्सन ऑफ दि इयर"

Leave a Message

All Right Reserved.