Sale!

Masala Online Training Programme

5,150.00 4,450.00

Report Abuse
Category:
Share this:

Description

 भारतीय इतिहासात सुद्धा ” भारतीय मसाल्यांचा ” आवर्जून उल्लेख केलेला आढळतो आणि आपल्याला माहीतच आहे कि, भारतीय मसाल्यांच्या गुणवत्तेमुळे इंग्रज किंवा पोर्तुगीज यांनी भारतात पाय रोवण्यासाठी मसाला व्यापाराची सुरुवात केली होती. 

      याचे  महत्वाचे कारण म्हणजे भारतीय मसाल्यांना असणारी चव, गंध आणि गुणवत्ता. भारतीय मसाल्यांना जगात वेगळे स्थान आहे. त्यामुळे जागतिक बाजार पेठेत तसेच भारतीय बाजार पेठेत हजारो वर्षांपासून खूप चांगली मागणी आहे. मसाला उद्योग  व्यवसायासाठी भारतीय हवामानात व ऋतुमानात सर्वच गोष्टी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे कमीत कमी गुंतवणूक करून आपण हा व्यवसाय सुरु करू शकता.

  • ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम  मध्ये तुम्हाला या उद्योगाविषयी बऱ्याच प्रमाणातमाहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तुम्हाला हा उद्योग सुरू करण्यासाठी तुमचा पाया पक्का करताना ह्या कोर्स चा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
  • या कोर्स मध्ये काय काय शिकवले जाते त्याची माहिती तुम्हाला curriculum section  मध्ये दिली आहे कोर्स घेण्यापूर्वी अगदी ती सगळी बघून घ्या.
  • शक्यतो मराठी भाषेमध्ये संपूर्ण कोर्स असून सोप्या आणि सहज भाषेमध्ये यामध्ये माहिती दिलेली आहे.
  • कोर्स हा व्हिडीओ फॉरमॅटमध्ये असून तुम्हाला विषयानुसार वेगवेगळ्या व्हिडिओ curriculum section मध्ये दिसतील.
  • या उद्योगाला जागा किती लागते ? शेड कसे बांधावे लागते तसेच मशिनरी कुठून घ्याव्यात साधारण इन्वेस्टमेंट किती लागते याविषयी सुद्धा कोर्समध्ये माहिती देण्यात आली आहे.
  • याप्रमाणेच उद्योग उभा करण्यासाठी नक्की अगोदर काय तयारी करावी लागते ? तुमची मानसिक स्थिती ? कुटुंबाचा सपोर्ट यासारख्या विषयांवर तीसुद्धा मार्गदर्शन करण्यात आले आहे.
  • सोबतच लोन मिळवण्यासाठी नक्की काय करावे लागते ? प्रकल्प अहवाल म्हणजे काय ? सध्या शासकीय योजना कोणत्या सुरू आहेत त्या विषयी माहिती सुद्धा कोर्समध्ये देण्यात आली आहे.
  • कच्चामाल मशिनरी कुठे मिळतील यासाठी काही संपर्क क्रमांक सोबत देण्यात आले आहेत.
  • जर तुम्हाला काही अडचण आली.व्हिडीओ पाहताना काही प्रश्न निर्माण झाले तर ते प्रत्येक वेळी लिहून ठेवा आणि नंतर आमच्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी चर्चा करून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सहजरित्या मिळवा.
  • लक्षात घ्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी तुम्हाला तीनदा चर्चा करता येईल त्यामुळे सगळे  प्रश्न वेळोवेळी लिहून ठेवल्यानंतर फोनवर बोलते वेळी तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांचे निरसन करून घेता येईल.
  • हा कोर्स तुम्ही ३० दिवस पाहू शकता. 30 दिवसांनंतर हा कोर्स एक्सपायर होऊन जाईल. त्यामुळे 30 दिवसात हा कोर्स संपवायचा आहे .

 मसाला निर्मिती प्रशिक्षण कोण करू शकतो ?

  • मसाला निर्मिती हा व्यवसाय शेतकरी करू शकतात.  
  • ज्या तरूणाला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे असे  प्रत्येक तरूण हा व्यवसाय करू शकतात.  
  • ग्रामीण भागात स्वतःचा उद्योग सुरू करण्याची  इच्छा असणारी प्रत्येक व्यक्ती,  कोणतीही संस्था किंवा कंपनी हा व्यवसाय करू शकतात.  
  • महिला बचत गट किंवा शेतकरी गट किंवा फार्मर प्रोड्यूसर कंपनी हा व्यवसाय सुरु करू शकतात . 

मसाला उद्योग ऑनलाईन प्रशिक्षण केल्यावर तुम्हाला काय फायदा होईल ?

  • तुम्हाला मसाला  उद्योगाविषयी मनात जेवढ्या शंका असतील त्या संपूर्ण शंकांचे  निरसन होईल .
  • मसाला निर्मिती कोर्समध्ये  दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला स्वतःचा उद्योग कसा सुरु करायचा हे समजू शकेल.

माहितीसाठी या उद्योगाविषयी सर्वसाधारण  माहिती देणारा  आपला युट्युब वरील व्हिडिओ .

View Course Introduction Video on Youtube

                                                                                                                                                                           

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Sorry no more offers available
All Right Reserved.
Translate »