आज कोणताही व्यवसायिक असेल तर त्याची एकच इच्छा असते आपल्याकडे भरपूर सारे ग्राहक असावेत आणि लोकांचा आपल्यावरती विश्वास तयार होऊन मग स्वतःचा ब्रँड तयार व्हावा..
पण सुरुवातीच्या काळामध्ये सर्विस देणाऱ्या उद्योजकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो यामध्ये स्पेशली डॉक्टर इंजिनियर वकील सल्लागार मंडळी ही येतात..
जेव्हा तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करता तेव्हा फक्त क्लिनिक टाकल्याने आपला व्यवसाय वाढेल आणि हा व्यवसाय स्थिर व्हायला थोडा वेळ लागतो हे अनेक डॉक्टर मंडळींनी स्वीकारले आहे असे मला त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर जाणवते.. अनेक वेळा या कारणामुळे कित्येक डॉक्टर फक्त ओपीडी टाकून तिथे नियमित वेळेत हजर राहण्याचे काम करतात पण मग अशावेळी प्रॅक्टिस वाढत जाण्याचे प्रमाण फार स्लो असते.. जर आपला व्यवसाय वाढवायचा असेल तर आत्ता नवीन काळात तुम्हाला लोकल भागात आपल्या उद्योगाची आपल्या क्लिनिकची किंवा आपल्या हॉस्पिटलची जाहिरात करणे या सोबतच स्वतःची इमेज बिल्डिंग करणे सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह राहणे अशा अनेक गोष्टी करणे क्रमप्राप्त आहे.. इथे माझा अनुभव आहे की अनेक डॉक्टर मला आपल्या मार्केटिंग मंत्रा या कार्यक्रमाच्या वेळी नेहमी एक अडचण सांगतात की आम्ही स्वतःहून जाऊन लोकांशी कसे बोलावे हेच समजत नाही कारण मी डॉक्टर आहे म्हटल्यावर मी थोडा कंजर्वेटिव्ह होऊन जातो..
मला त्या डॉक्टर मित्रांना सांगावेसे वाटते की सर्वसामान्यांमधली तुमची प्रतिमा तेव्हाच चांगली आणि लवकर तयार होईल जेव्हा तुम्ही त्यांना आपलेसे वाटेल यामुळे एखाद्या लोकल भागात तुम्ही तुमचा क्लिनिक किंवा हॉस्पिटलचा व्यवसाय सुरू केल्यानंतर तिथलच्या सामान्य नागरिकांची वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला कसे कनेक्ट होता येईल यावरती जास्त फोकस करायला हवा..
सोबतच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन आपला पब्लिक connect वाढवायला हवा..
सोशल मीडिया द्वारे सुद्धा तुम्ही तुमच्या येणाऱ्या पेशंटचे फीडबॅक लोकांना पाठवू शकता किंवा तुमच्यासोबत लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून जागरूकता निर्माण करून त्यांना जोडून घेऊ शकता..
सोशल मीडियाच्या बाबतीत सुद्धा अनेक डॉक्टर लोकांमध्ये आजही उदासीनता आढळते त्यांना आम्ही काय स्वतःहून सोशल मीडियावर टाकायचे आणि रोज काय टाकायचं असा प्रश्न पडतो इथे स्पेशली सांगता येईल की तुम्ही पेशंटला त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत माहिती देणारे शॉर्ट व्हिडिओ तयार करून टाकू शकता किंवा तशा काही इमेजेस सुद्धा तुम्ही बनवून तुमच्या सोशल मीडिया अकाउंट द्वारे शेअर करू शकता.. शक्य असेल आणि मोकळा वेळ असेल तेव्हा मोठ्या माहिती देणारे व्हिडिओ सुद्धा तुम्ही शेअर करू शकता यामधून हळूहळू तुमची प्रसिद्ध होण्यास सहकार्य मिळेल..
Amit Makhare
*चावडीच्या सर्व अपडेट व्हाट्सअप वर मोफत मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आजच चावडीचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..*
https://www.chawadi.com/entrepreneurs/
0 responses on "स्वतःची प्रॅक्टिस वाढवताना"