• No products in the cart.

उन्हाळ्यात सुरु करा, बेदाणे प्रक्रिया उ्दयोग …..!!!!

उन्हाळ्यात सुरु करा, बेदाणे प्रक्रिया उ्दयोग(Raisins Production Business) …..!!!!               
           द्राक्षांपासून प्रक्रिया करून बेदाणे बनवले जातात. ज्यांच्या कडे द्राक्षांचे उत्पादन जास्त होते. त्या जिल्ह्यातील व्यावसायिकांनी या उद्योगाकडे वळावे. द्राक्षांपासून बेदाणे तयार करणे हा तसा हंगामी व्यवसाय आहे. ज्या सिघनमध्ये द्राक्षांचे उत्पादन होते त्याच सिझनमध्ये हा व्यवसाय करता येतो. द्राक्षांपासून बेदाणे तयार करून त्याची विक्री करता येईल. द्राक्षांची फळे ही नाशवंत असलेने लवकर खराब होतात. त्यामुळे त्यांच्यावर प्रक्रिया करून बेदाणे बनवले तर जास्त दिवस टिकतात. ग्रामीण भाषेत बेदाण्यांना मनुके असेही म्हणतात. द्राक्षांवर  विशिष्ट प्रक्रिया करून त्याचे बेदाणे बनवले जातात. तसा हा शेतीपूरक व्यवसाय आहे. बरेचसे द्राक्ष उत्पादक शेतकरी बेदाणे तयार करण्याचा जोड व्यवसायही करतात. बेदाणे व मनुके यांचा वापर करून ड्रायफ्रुट विकणारे विक्रेते करतात. बेदाणे बऱ्याच प्रकारच्या मिठाई बनवताना वापरतात. बेकरी पदार्थ, स्वीट मार्ट, जेवणे बगैरे बनवताना हमखास वापरतात. बेदाणे मध्ये विटॅमीन व प्रोटिन्स जास्त असलेने शक्तिवर्धक खाद्य म्हणूनही लोक मनुके खातात.
(लाकडी घाना तेल निर्मिती उद्योग..!!! अधिक वाचा सोबतच्या लिंक वर :-   http://wp.me/p6Y2eu-128  )

                             

    बेदाणे प्रक्रिया उ्दयोग(Raisins Production Business)  :-
           बेदाणे हा प्रक्रिया उद्योग मोठ्या स्वरूपात सर्वत्र जोड व्यवसायही विविध बचत गटा मार्फत  केला जाऊ शकतो. या प्रक्रिया उद्योगा करिता कमी भांडवलाची आवश्यकता असते. तसेच या प्रक्रिया उद्योगकरिता पंतप्रधान योजने अतंर्गत सुध्दा मदत मिळते. या बेदाणे उद्योगसाठी प्रमुख कच्चा म्हणून द्राक्षेची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. द्राक्षावर योग्य प्रक्रिया करून त्यांचे बेदाण्यामध्ये रूपांतर केले. जाते. तर या प्रक्रिया उद्योगात निर्जलीकरण पंप व पाण्याचा पंप अशी यंत्रसामग्रीची आवश्यकता असते. चांगल्या बेदाण्यासाठी चांगल्या प्रतीची द्राक्षे प्लास्टिक ट्रे, प्लास्टिक टफ बादल्या, वजनकाटा, लहान-मोठी भांडी असे किरकोळ साहित्याची आवश्यकता असते.
                   

(सरकीपासून तेल निर्मिती उद्योग…!!! अधिक वाचा सोबतच्या लिंक वर :-   http://wp.me/p6Y2eu-1eX )

      बाजारपेठ :-  

बेदाणे प्रक्रिया उद्योगास सर्वत्र मोठ्या स्वरूपात बाजारपेठ तयार झालेली आहे हे बेदाणे आपल्याला स्थानिक बाजारपेठेत सुध्दा त्यांची विक्री करता येते. ठोक विक्रेते, वितरक, किरकोळ दुकानदार हॉटेल्स, खानावळी, ढाबे, लंच होम्स, हॉटेल, ड्रायफ्रुटचे ठोक विक्रेते आईसक्रिम पार्लर, बेकरी आदी ठिकाणी या बेदाण्यास मोठ्या प्रमाणात मागणी असते. आदी ठिकाणी जाऊन आपण बेदाणीची आर्डर आपण घेऊ शकतो. तसेच या उत्पादनाची आपण डोअर टू डोअर जाऊन सुध्दा विक्री करता येते. जर हा उद्योग महिलान मार्फत हा उद्योग केल्यास हा माल आपण विविध ठिकाणी बचत गटा मार्फत सुध्दा यांची विक्री करू शकतो. या बेदाण्यास सर्वत्र मोठ्या स्वरूपात बाजारपेठ मिळते.
           

 ( फळे, भाज्यांना आहारात आहे, महत्वाचे स्थान..!!! अधिक वाचा सोबतच्या लिंक वर :-  http://wp.me/p6Y2eu-1m  )

चावडी मार्गदर्शन  :-

हा उद्योग सुरु करण्यासाठी साधारण १.५० ते २ लाख रूपये खर्च येतो. उद्योग सुरु झाल्यावर खर्च कमी जास्त प्रमाणात होऊ शकतो. तसेच बॅक सुध्दा आपली पत पाहून कर्ज पुरवठा करते. या उद्योगासाठी विविध शासकीय योजनेचा  लाभ घेता येतो.  हा उद्योग सुरू केल्यास आपणांस चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो.
 

                       

चावडी :- 7272971971

Stay Updated…
Other Blogs
Follow Us On Facebook And Instagram
For More Information Please Call Us On 7272971971     

March 27, 2021

0 responses on "उन्हाळ्यात सुरु करा, बेदाणे प्रक्रिया उ्दयोग .....!!!!"

Leave a Message

Contact Details

Contact No: +917272971971
Comany Name : Chawadi Training and Consultancy Pvt. Ltd.
Adress: First Floor, Radha House Building, Tapovan Rd, Nirmal Nagar, near Laxmi nagar kaman, Savedi, Tal. Nagar, Dist- Ahilyanagar 414003, maharashtra ,India
top
All Right Reserved.