Description
नव उद्योजकांना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन देण्यासाठी चावडीचा विशेष फॅकल्टी कन्सल्टन्सी प्रोग्राम ….
या प्रोजेक्टच्या माध्यमातून एखाद्या व्यवसायाचे एक्स्पर्ट नॉलेज ज्यांच्याकडे आहे अशा तज्ञ प्रशिक्षकांकडून व्यवसायिक मार्गदर्शन घेण्याची संधी उपलब्ध करून देत आहोत. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी व्यवसायातील खाचखळगे माहिती करून घेण्याची उत्तम संधी चावडी बिझनेस ट्रेनिंग इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून आपणास उपलब्ध करून देत आहोत.
फॅकल्टी कन्सल्टन्सी प्रोग्राम म्हणजे काय?
हे बेसिकली ऑनलाइन मॉडेल असून तुम्ही निवडलेल्या उद्योगाबद्दल तुमचे नॉलेज वाढवण्यात कन्सल्टंट तुम्हाला मार्गदर्शन करेल.
तज्ञ प्रशिक्षकांबरोबर तुम्हाला डिजिटली जोडून दिले जाईल. (उदारणार्थ : झूम कॉल)या झूम कॉलवरती तज्ञ प्रशिक्षकांबरोबर चर्चा करून ज्ञान प्राप्त करून घेऊ शकता. याचा वापर तुम्हाला उद्योग उभारणीमध्ये करता येईल.
हा कॉल तीस मिनिटांत पासून नव्वद मिनिटापर्यंत असू शकतो.
प्रशिक्षण कार्यक्रम कोण करू शकतो ?
-
ज्या तरूणाला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे अश्या प्रत्येक तरूणासाठी .
-
ग्रामीण तसेच शहरी भागात स्वतःचा उद्योग सुरू करण्याची इच्छा असणारी प्रत्येक व्यक्ती, कोणतीही संस्था किंवा कंपनी व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम करू शकतात.
-
महिला बचत गट किंवा शेतकरी गट किंवा फार्मर प्रोड्यूसर कंपनी प्रशिक्षण कार्यक्रम करू शकतात .
प्रशिक्षण कार्यक्रम केल्यावर काय फायदा होईल?
-
तुम्हाला उद्योगाविषयी तुमच्या शंकाचे निरसन झाले असेल.
-
तज्ञ प्रशिक्षण कार्यक्रम मधील दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला स्वतःचा उद्योग कसा सुरु करायचा हे समजू शकेल.
Reviews
There are no reviews yet.