• No products in the cart.

नोकरी ला वैतागलो होतो ; नको ती बॉस ची कचकच रोज ! त्या पेक्षा स्वताचा बिझनेसच सुरु करायचा ..

नोकरी ला वैतागलो होतो ; नको ती बॉस ची कचकच रोज ! त्या पेक्षा स्वताचा बिझनेसच सुरु करायचा ..
यशस्वी उद्योजक होण्याची  वाटचाल (Journey of Successful Entrepreneur)

नोकरी ला वैतागलो होतो ; नको ती बॉस ची कचकच रोज ! त्या पेक्षा स्वताचा बिझनेसच सुरु करायचा .. ये जवानी हे दिवानी च्या रणबीर कपूर सारखं मैं उठना चाहता हूं, दौड़ना चाहता हूं, गिरना भी चाहता हूं ….बस रुकना नहीं चाहता या प्रेरणेने दिला जॉब सोडून आणि बाहेर पडलो सर …पण….

आता जरा टेन्शन आलय ! काय करावे नेमके हे कळत नाहीय ! घरून प्रेशर जास्त वाढतंय ! फक्त बायको नाही तर अगदी गावाकडून आई वडिलांचे फोन येतायेत… कधी कुणाचे काही न ऐकलेल्या माझ्या सारख्या माणसाला सरकार फेम नजदीकी फायदा देखने से पहले दूर का नुकसान सोचना चाहिए. हा फिल्मी डायलॉग सध्या कुणीही अगदी कुणीही मोफत देतंय…

काय करावे कोणता बिझनेस सुरु करावा ; कश्यात जास्त प्रोफीट आहे ? कोणता बिझनेस लवकर सेटल होईल ? काहीच कळत नाहीय ; जामच वैतागलोय… असं वाटतंय परत जॉब जॉईन करावा का ??? परत तेच चक्र तोच गाडा ….पण मग  मेरी कोम सारखे  कभी किसी को इतना भी मत डराओ कि डर ही खत्म हो जाए. म्हणत तर मी  बॉस च्या तोंडावर राजीनामा फेकला होता आता परत..

हा वरील कठीण प्रसंग आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या आयुष्यात आलेला असेल ;हि वाक्य अगदी तुमच्या बाबतीत घडले आहे कि काय असे असे वाटत असेल…हो नां…????

मला कळतंय ; हा प्रसंग मुळात खूप कठीण  असतो…पण घाबरण्याची , व्यथित होण्याची आणि टेन्शन घेण्याची काहीही गरज नाही…

फक्त काही गोष्टी एका साच्यात बसवाव्या लागतील…कारण बॉलीवुड चित्रपटांतील डायलॉग फक्त जिंकण्याची प्रेरणा….देतील जिंकून देणार नाहीत…

जसेकी ;

बदमाश कंपनी मधील बड़े से बड़ा बिजनेस पैसे से नहीं, एक बड़े आइडिया से बड़ा होता है.

मला हा डायलॉग फार आवडतो पण आयडिया येणे किंवा त्या दृष्टीने विचार करणे गरजेचे आहे नाही का ?

यापेक्षा हैप्पी न्यू ईयर मधील हा डायलॉग दुनिया में दो तरह के लोग होते हैं विनर और लूजरलेकिन जिंदगी हर लूजर को एक मौका जरूर देती है जिसमें वह विनर बन सकता है.. फार सुंदर आहे.

कारण कठीण काळ प्रत्येकाच्या आयुष्यात येतो फक्त त्यास आपण सामोरे कसे जातो यावर यश अवलंबून आहे.आणि जे अश्या कठीण प्रसंगांना सामोरे जाऊन Successful बनतात त्यांच्या Journey ला Journey of Successful Entrepreneur असे म्हंटले जाते.

तर आता तुमच्या प्रॉब्लेम चे सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न करूयात..

जर आत्ता जॉब सोडला असेल आणि बिझनेस करण्याचा प्लान करीत असाल तर हा सर्वोत्तम डिसिजन आहे ..व्हेरी गुड..अभिनंदन..कारण ८ तासाची दुसर्यासाठी नोकरी करण्यापेक्षा २४ तास मालक म्हणून जगण्याचा आनंद आता तुम्ही घेवू शकणार आहात. तेही सेम कष्ट करून…

[wcps id=”5510″]

आता सगळ्यात पहिले ;

 1. महत्वाचे म्हणजे सर्वप्रथम स्वतावर विश्वास ठेवा स्वताशी नेहमी बोला; कि जो काम दुनिया को नामुमकिन लगे, वही मौका होता है करतब दिखाने का. ओर आज नही तो कभी नही.. आत्मविश्वास निर्माण व्हायला मदत मिळेल.
 2. मग पुढे सर्वात महत्वाची गोष्ट करा ; आपल्या घरच्यांना अगोदर विश्वासात घ्या…त्यांना शांत बसून तुमची कल्पना ,तुमचा प्लान समजून सांगा..शक्य झाल तर त्यांना सुद्धा त्यात involve करून घ्या मग जास्त सोपे होईल. कारण घरच्या व्यक्तीचा सपोर्ट असला तर बाहेर लढणे सोपे जाते.( माझ्या स्व अनुभवावरून )
 3. कोणताही व्यवसाय सेटल थोडा वेळ लागतो;त्यामुळे सुरवातीच्या काळात आर्थिक फायदा होणे शक्य होईल असे नाही पण त्यामुळे आपल्या संसाराची आर्थिक घडी बिघडता कामा नये याची काळजी घ्या..सोप्या भाषेत थोडे पैसे अगोदर बाजूलाच काढून ठेवा…
 4. सुरवातीला अपयश येईल ;थोडा वेळ लागेल पण जो हारता है, वही तो जीतने का मतलब जानता है.हो ना.!!!
 5. खूप दिवस व्यवसाय कोणता करावा याचा विचार करण्यात घालवू नका ;त्यास एक डेडलाईन द्या नाहीतर नंतर गोंधळ वाढतो..जर आपल्याला सुचत नसेल तर सल्लागाराची मदत घ्या.
 6. मला वाटते कि लोकांना हे हवे आहे …यापेक्षा लोकांना काय हवे हे प्रत्यक्षात लोकांना विचारा.सोप्या भाषेत मार्केट सर्व्हे करा..पण स्वत :::
 7. तुम्ही जो व्यवसाय करण्याचा प्लान करताय किंवा जे obtion डोक्यात आहेत त्याचा फेरविचार करा….जसेकी सदर बिझनेस चा स्कोप ,त्यास लागणारी जागा ,इन्व्हेस्टमेंट , कच्चा माल , मशिनरी , महत्वाचे बाजारपेठ यासारख्या मुद्दे लक्षात घ्या ( याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला माझ्या com वर मिळू शकेल.)
 8. आर्थिक बाजू कमकुवत असेल तर सुरवातीला कर्ज मिळते का प्राधान्य द्या…तसेच आपला मित्र परिवार ,नातेवाइक ,जवळचे यांच्याकडून काही रक्कम गोळा होते का ते पहा…
 9. जर तुम्ही निवडलेल्या बिझनेस चे मार्केटिंग सुद्धा तुम्ही करणार असाल; तर माझे व्यक्तिगत मत आहे अगोदर मार्केटिंग पासून सुरवात करा जर ते जमले तर प्रोडक्शन करणे सोपे आहे. आणि समजा नाही जमले तर बाहेर पडणे सोपे असेल.
 10. आपल्या उद्योगास जाहिरात तंत्राची नितांत गरज आहे हे लक्षात घ्या.. अनेक मोठे ब्रांड जसेकी टाटा ,बिर्ला ,अंबानी हे किती जरी मोठे झाले असले तरी आपल्या उत्पादनाची रोज विविध माध्यमातून जाहिरात करताना दिसतात किंबहुना आपल्या मनात त्यांचा ब्रांड बिंबवताना दिसतात खरी गरज हीच आहे…त्यामुळे आपल्या बजेट च्या २५-३५ टक्के इन्व्हेस्टमेंट हि सुरवातीला जाहिरातीवर करायचीय हे नक्की लक्षात ठेवा.. ( आज चावडी च्या बाबतीत आम्ही हा नियम काटेकोर पणे पाळतोय )
 11. शक्यतो ; नातेसंबध उद्योगात न आणणे सोपे राहील; कारण सुरवातीच्या काळात जर त्याचा balance करता आला नाही तर अडचणी वाढतील..एकदा बिझनेस थोडा रुळावर आला मग काहीच हरकत नाही. ( याला अपवाद असतात सुद्धा ;कारण अगदी आमच्या चावडी चे कामकाज मी आणि बायको पहिल्यापासून शेजारी शेजारी बसून पाहतो.)
 12. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वत स्वप्न बघायला शिका कारण ; अगर किसी चिज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तूमसे मिलाने की कोशीश में लग जाती हैं..

आणि सुरु करा यशस्वी उद्योजक होण्याची वाटचाल;  कारण रास्ते की परवाह करोगे तो मंजील बूरा मान जायेगी……………….

कसे छान वाटले मग…अपेक्षा करतो कि तुम्हाला माझे हे २ शब्द नक्कीच उपयोगी ठरतील..

तुमच्या या यशस्वी उद्योजक होण्याची वाटचाल मध्ये काहीही मदत लागली तर नक्की सांगा..

तुमचा उद्योजक मित्र;

अमित मखरे

Chawadi.com

 

मग कसा वाटला आमचा Journey of Successful Entrepreneur हा लेख. अशेच अनेक लेख पाहायचे असतील तर Other Blogs वर क्लिक करा.

Stay Updated…
Other Blogs
Follow Us On Facebook And Instagram
For More Information Please Call Us On 7272971971

March 27, 2021

2 responses on "नोकरी ला वैतागलो होतो ; नको ती बॉस ची कचकच रोज ! त्या पेक्षा स्वताचा बिझनेसच सुरु करायचा .."

 1. Hi sir.i m mechanical engineer i do job but I m not interested in that.from long time i m still searching business idea but didn’t found …plz sir tell me some ideas..

 2. mala amit makhare sir yanch no pahije ahe.

Leave a Message

Contact Details

Contact No: +917272971971
Comany Name : Chawadi Training and Consultancy Pvt. Ltd.
Adress: First Floor, Radha House Building, Tapovan Rd, Nirmal Nagar, near Laxmi nagar kaman, Savedi, Tal. Nagar, Dist- Ahilyanagar 414003, maharashtra ,India
top
All Right Reserved.