भारतात ५०० हेक्टर क्षेत्रावर अंजिराची लागवड केली जाते. यापैकी एकट्या महाराष्ट्रात ४०० हेक्टर क्षेत्र या पिकाच्या लागवडीखाली आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने पुणे जिल्ह्यात अंजिराचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते आणि या जिल्ह्यात ३०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर या पिकाची लागवड आहे. पुणे जिल्ह्यात निरा नदीच्या खोऱ्यातील पुरंदर – सासवड तालुक्याचा भाव अंजीर लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे मराठवाड्यातील दौलताबादजवळच्या भागात अंजिराची लागवड फार पूर्वीपासून केली जाते. पुणे जिल्ह्यातील सासवड भागात अंजिराचे दर हेक्टरी उत्पादन १० ते १२ टन इतके मिळते.
उत्पादित फळांवर प्रक्रिया करून त्यापासून टिकाऊअंजीर प्रक्रिया उद्योग, खाद्यपदार्थ तयार करून चांगला आर्थिक लाभ मिळवता येतो. अंजीर फळांपासून बर्फी, टॉफी, जॅम, गर (पल्प), पावडर, सुके अंजीर, आइस्क्रीम, मिल्कशेक, बार इ. प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थ तयार करता येतात.
बाजारपेठ : अंजीर युक्त प्रक्रिया पदार्थांना आपल्या लोकल मार्केट ला सुद्धा चांगली बाजारपेठ उपलब्ध होवू शकते..यात बर्फी ,टॉफी, जॅम हे प्रोडक्ट्स पूर्वीपासून बाजारात उपलब्ध आहेतच सोबत आईसक्रीम आणि ज्यूस इंडस्ट्री मध्ये पल्प आणि मिल्क शेक तितकाच फेमस आहे …
सुके अंजीर चे महत्व आपण ड्रायफ्रुट मध्ये जाणतोच…तेव्हा अंजीर युक्त पदार्थांना मार्केट ची अडचण येणार नाही.
[wcps id=”5510″]
इन्व्हेस्टमेंट – अंजीर प्रक्रिया उद्योग सुरवातीला २-३ लाख इन्व्हेस्टमेंट करून हा उद्योग सुरु करता येईल..यात मशिनरी चा खर्च गृहीत धरला आहे.
शासकीय योजना : अंजीर प्रक्रिया उद्योग यासाठी शासनाकडे प्रोत्साहनपार अनुदान योजना उपलब्ध असते.सुशिक्षित बेरोजगारांना जिल्हा उद्योग केंद्राकडून मदत मिळू शकते..
बँक कर्ज : पत चांगली असल्यास बँक कर्ज पुरवठा सुद्धा तत्काळ होवू शकतो…
याविषयी चे संपूर्ण माहिती देणारे प्रशिक्षण चावडी मध्ये उपलब्ध असून त्यासाठी 7249856425 या क्रमांकावर संपर्क साधावा…
1 responses on "अंजीर नाशवंत आहे प्रक्रिया करू पैसे कमवू...!! अंजीर प्रक्रिया उद्योग"
Leave a Message
You must be logged in to post a comment.
भविष्याचा विचार करून तरुण पिढीने शेती व पूरक व्यवसाय धंदे करावे त्यासाठी प्रशिक्षण गरजेचे आहे,
चावडी हे पारस असून त्यांच्या संपर्कात येणार प्रत्येकजण सोन्याचा होईल .