• No products in the cart.

तुम्ही तुमच्या बिझनेसचे प्रमोशन करताना या पर्यायाचा वापर करून बघितला आहे का?

Business Promotion –
आपण आपल्या बिझनेस वाढीसाठी वेगळ्या वेगळ्या प्रकारे प्रमोशन करत असतो…
आपण बिजनेस वाढीसाठी पेपर च्या माध्यमातून , टीव्हीच्या माध्यमातून लोकल भागात Pamphlets वाटण्याचा माध्यमातून, होर्डिंग्ज च्या माध्यमातून , सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून प्रमोशन करतो…
पण बऱ्याच वेळा असा अनुभव येतो की ; आपण एखादी जाहिरात करतो त्यात टाकलेले प्रॉडक्ट किंवा सर्विस उत्तम असते पण त्यामानाने त्याला रिस्पॉन्स कमी मिळतो..
आपल्याला रिस्पॉन्स कमी मिळण्याचे एक कारण हे सुद्धा आहे की आपण आपल्या बिजनेस चे किंवा प्रॉडक्टची उत्तम जाहिरात करतो पण ती जाहिरात आपल्या कस्टमरने बघितल्यावर त्यांना तत्काळ रिस्पोंड करण्यासाठी संधी देत नाही..
याला *कॉल टू ॲक्शन* (Call To Action )असे म्हणतात…
आपण जेव्हा आपल्या बिझनेसचे प्रमोशन करतो तेव्हा कॉल टू ॲक्शन या पर्यायाचा वापर केल्यास आपल्याला जाहिरातीमधून रिस्पॉन्स येण्याची शक्यता 110 % टक्के वाढेल..
चावडी चे Affiliate बना,सोशल मिडिया वर मेसेज शेयर करा,अधिकचे उत्पन्न कमवा.अधिक माहितीसाठी या लिंक वर क्लिक करा.
म्हणजे बघा उदाहरणार्थ तुम्ही जर सणानिमित्त, दिवाळीनिमित्त काही विशेष ऑफर काढत असाल तर ही *ऑफर ही मोजक्या लोकांसाठीच आहे तत्काळ संपर्क साधा* अशी टॅग लाईन आपल्या Handbillls मध्ये वापरली तर कदाचित लोकांचा रिस्पॉन्स अधिक चांगला येईल…
किंवा उदारणार्थ तुमचे फॅशन शॉप आहे आणि लेडीज साठी तुम्ही नवनवीन कुर्ती , साड्या , ड्रेस मटेरियल आणत आहात तर या मटेरियल ची जाहिरात करताना तुम्ही असे टाकू शकता; *आमच्या शॉप मधील नवनवीन अपडेट साठी आजचा हा नंबर मिस कॉल द्या व्हाट्सअप वर फोटो मिळवा* याने फायदा असा होतो की जरी तुमच्या कस्टमरला आज खरेदी करायची नसली तरी इथून पुढे तो तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये येईल म्हणजे त्याचं तुमच्या बरोबर कनेक्शन तयार होईल..
तिसरं उदाहरण पाहुयात ;
सध्या मार्केटमध्ये विविध प्रकारे *चहा विकण्याचे स्टॉल्स शॉप्स कॅफे एरिया सुरू होत आहेत..*
मला असेच स्टॉल करू सुरु करण्यासाठी एक क्लाइंट येऊन भेटून गेला तो म्हणाला मी माझे उद्योगाचे मार्केटिंग कसे करू लक्षात येत नाहीये;
मी त्याला सल्ला दिला ; कॉल टू ॲक्शन हा पर्याय तुझ्या साठी सर्वोत्तम आहे…
कारण एखादी ऑफर जर आपण काढली आणि ती नेमके वेळेसाठी जरी ठेवली तर त्याचा फायदा नक्कीच होतो म्हणजे सकाळी 6 ते 7 आणि रात्री 9 ते 10 यावेळी येणाऱ्या ग्राहकांना संपूर्ण चहा *मोफत* असेल ..
याने होणार एकच ची ऑफर चा फायदा घेण्यासाठी या वेळेत जास्तीत जास्त लोक गर्दी करतील आणि त्यांना तद्नंतर या चहा सेंटरच्या चवीबद्दल सर्विस बद्दल माहिती होईल याचा बिझनेस साठी मोठा फायदा होईल..
असा हा सोपा पर्याय चा वापर तुम्हीसुद्धा तुमच्या बिझनेस चे प्रमोशन करताना करा..

वरील माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा.. अणि तुम्हाला सुद्धा तुमचा बिझनेस 10 X पद्धतीने वाढवायचं असेल तर चावडीच्या CBN नेटवर्कमध्ये सहभागी व्हा त्यासाठी customer care ला लगेच फोन करा.

आपला,
अमित मखरे

Stay Updated…
Other Blogs
Follow Us On Facebook And Instagram
For More Information Please Call Us On 7272971971

March 27, 2021

0 responses on "तुम्ही तुमच्या बिझनेसचे प्रमोशन करताना या पर्यायाचा वापर करून बघितला आहे का?"

Leave a Message

Contact Details

Contact No: +917272971971
Comany Name : Chawadi Training and Consultancy Pvt. Ltd.
Adress: First Floor, Radha House Building, Tapovan Rd, Nirmal Nagar, near Laxmi nagar kaman, Savedi, Tal. Nagar, Dist- Ahilyanagar 414003, maharashtra ,India
top
All Right Reserved.