केळी प्रक्रिया उद्योग……!!!!

केळी प्रक्रिया उद्योग……!!!!
केळी हे लवकर खराब होणारे फळ असल्याने फळाची दीर्घकाळ साठवणूक करणे शक्य नसते. त्यामुळे शेतकऱ्यांचे  नुकसान होऊ शकते. केळी उत्पादना नंतर ते ग्राहकांना मिळे पर्यंत ३० ते ३५ %  फळे खराब होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ नये. यासाठी, शीतकक्षात फळ साठविणे, हवा बंद करणे किंवा केळीवर प्रक्रिया करून विविध टिकाऊ खाद्या पदार्थ तयार करून आपल्याला मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा  होऊ शकतो.  तसेच या माध्यामातून आपल्याला चांगला उद्योग उभारून आपल्याला विविध पदार्थांची निर्मिती करता येते.  केळी फळांवर प्रक्रिया करून विविध पदार्थ व उपपदार्थ तयार करून बाजारपेठेत विक्रीस पाठविता येतात, तसचे प्रक्रिया युक्त पदार्थांची साठवणूक अगदी सोपी आहे. ती अधिक कालावधी साठी करता येते. आपल्याला केळी पासून विविध प्रक्रिया युक्त पदार्थ बनविता येतात. व ते अधिक काळ टिकतात. आपण जर  हा उद्योग केल्यास आपल्याला चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो.

 
उद्योग :-
केळीपासून आपल्याल विविध पदार्थ बनविता येतात. आणि अशा पदार्थांना बाजारात खाद्या पदार्थ म्हणून मोठ्या प्रमाणात मागणी असते. केळी वर प्रक्रिया करून केळी चिप्स, केळीचे सुके अंजीर, केळी पीठ, केळी पावडर, बनाना प्युरी, केळी ज्युस बनाना, फ्रुट बार केळी बिस्किट, केळी जाम, जेली, केळी सालापासून अल्कोहोल, केळीची टॉफी, केळीपासून वाइन आदी सह विविध पदार्थ हे केळी पासून बनविले जातात.  या उद्योगासाठी प्रमुख कच्चा माल म्हणून केळी हे फार महत्वाचे आहे. केळीपासून आपल्यााल विविध गोड तिखट तसेच अांबट पदार्थ तयार करता येतात.  तसेच हा उद्योग आपल्याला विविध बचत गटामार्फत सुध्दा केला जाऊ शकते. हा उद्योग सुरु केल्यास आपण एक यशस्वी उद्योजक बनू शकता.

 
बाजारपेठ :-
सुरुवातील आपण विविध दुकानदारांच्या गाठी भेटी घेतल्यास, मालाचे सॅम्पल दाखवल्यास, पॅकिंग आकर्षक  माल उत्तम व वाजवी दर ठेवल्यास आपल्या मालाला मोठ्या प्रमाणात मागणी असते.  या प्रक्रिया युक्त पदार्थ आपल्याल हॉटेल, स्वीट होम, ठोक व्यापारी, किरकोळ दुकानदार, रेस्टॉरेट, तसेच विविध पदार्थाचे वितरक यांच्याशी आपण संपर्क साधल्यास आपल्याला मोठ्या प्रमाणात आर्डर मिळू शकतात.  तसेच या प्रक्रिया उद्योगास मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध आहे. त्यामुळे हा उद्योग वर्षभर करता येतो.

 
प्रकल्पविषय :-
हा प्रकल्प सुरु करण्यासाठी २ ते ३ लाख रूपये खर्च येते. उद्योग सुरु झाल्यावर खर्च कमी जास्त प्रमाणात होऊ शकतो. तसेच विविध योजनानचा फायदा सुध्दा या उद्योगास मिळते. बँक आपणांस पत पाहून कर्ज पुरवठा करते. हा उदयोग सुरु केल्यास आपण एक यशस्वी उद्योजक होऊ शकता.

 
अधिक माहितीसाठी :- 7249856424
 
 

February 11, 2017

0 responses on "केळी प्रक्रिया उद्योग……!!!!"

    Leave a Message

    Your email address will not be published.

    All Right Reserved.
    Call Now ButtonCall Now
    Translate »