फळांच्या टाकाऊ भागापासून उपपदार्थ

फळांच्या टाकाऊ भागापासून उपपदार्थ
फळांचे उत्पादन हंगामी स्वरूपाचे असल्यामुळे एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर फळे बाजारात येतात. ताज्या फळांची साठवण क्षमता कमी असल्यामुळे शेतकरी शेतावर फळे दीर्घकाळ साठवून ठेवू शकत नाहीत. परिणामी बाजाराभाव पडून शेवटी उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. म्हणून अशा वेळी स्थानिक पातळीवरच साखर कारखान्यांच्या धर्तीवर फळांवर प्रक्रिया करून मूल्यवर्धित पदार्थ तयार करण्याचे उद्योग सुरु झाले तर फळांची नासाडी टाळून उत्पादकांना फायदा होईल.
फळाचे उत्पादन हंगामी स्वरूपाचे असल्यामुळे एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर फळे बाजारात येतात. ताज्या फळांची साठवण क्षमता कमी असल्यामुळे शेतकरी शेतावर फळे दिर्घकाळ साठवून ठेवू शकत नाही. परिणामी बाजारभाव पडून शेवटी उत्पादक पातळीवरच साखर कारखान्यांच्या धर्तीवर फळांवर प्रक्रिया करून मूल्यवर्धित पदार्थ तयार करण्याचे उद्योग सुरु झाले तर फळांची नासाडी टाळून उत्पादकांना फायदा होईल.
निरनिराळ्या फळांवर प्रक्रिया करून मूल्यवर्धित टिकाऊ अत्रपदार्थ करतांना फळाच्या प्रकारानुसार बराचसा भाग टाकाऊ म्हणून वेगळा केला जातो. त्यामध्ये प्रामुख्याने साली, बिया व रस काढून घेतलेला लगदा किंवा चोथा  केळयांसारख्या फळांच्या बाबतीत पाने व खोड, काजू फळांमध्ये रसाभरीत बोंडे, फळे स्वच्छा करताना कापून काढलेल्या फळांचा भाग आणि खराब व किडलेली फळे यासारख्या घटकांचा समावेश असतो. बहुतेक ढिगांच्या रूपात मोकाट जनावरांचे खाद्या किंवा खत करण्यास वापरतात. युनिटजवळ बेवारसपणे टाकलेल्या या टाकाऊ घटकामुळे वातावरण दूषित तर होतेच. शिवाय त्यामुळे इतरत्र जंतुसंसर्ग होऊन पर्यावरणाची हानी होते.


अशा टाकाऊ समाजल्या जाणाऱ्या पदार्था मध्येही प्रथिने, स्निग्धांश किंवा तेल, खनिजे, तंतुमय घटक, पेक्टीन, स्टार्च साखर, नैसर्गिक रंग सुगंधी घटकद्रव्ये यासारखे रासायनिक घटक बऱ्यापैकी असतात. म्हणून टाकऊ पदार्थ योग्य रितीने गोळा करून त्यावर प्रक्रिया केली तर त्या पासून मूल्यवान पदार्थ तयार करता येतील. त्याव्दारे उपलब्ध फळांचा पुरेपुर वापर केल्यामुळे मुख्या प्रक्रियायुक्त पदार्थांचा उतपादन खर्चही कमी होण्यास मदत होईल. शिवाय पर्यावरणाचे प्रदुषणही होणार नाही. त्यासाठी मोठ्या क्षमतेच्या फळप्रक्रिया युनिटमध्ये किंवा स्वतंत्र असे खास टाकाऊ पदार्थांवर प्रक्रिया करणारे युनिट उभारणे गरजेचे आहे. आपल्याकडे तयार होणाऱ्या फळांवर आधारित कोणत्या प्रकारचे उपपदार्थ करण्यास वाव आहे. ते सोबत दिलेल्या तक्त्यात दिले आहे.
फळांमध्ये टाकाऊ घटकांचे प्रमाण साधारपणे २० ते ६०, आंबा ४० ते ६०, संत्र्यामध्ये ५०, लिंबू ६०, अननस ३० ते ६० टक्के. एकूण उत्पादनाचा विचार केला तर या टाकाऊ घटकांपासून मोठ्या प्रमाणावर संपत्ती निर्माण करता येईल.
उदा. जगतिक पातळीवर आंब्याचे उत्पादन १०० लाख टन गृहित धरले तर त्यापासून ३० हजार टन कोयी मिळतात. त्यामधून २० कोटी रूपयांचे ३ लाख टन खाद्यातेल तसेच १.४ लाख टन स्टार्च मिळविणे शक्य आहे. जॅम, जेली सारखे प्रक्रिया पदार्थ करण्यासाठी पेक्टिनची आवश्यकता असते. फळांच्या सुकविलेल्या सालीमध्ये ५ ते २० टक्के पेक्टीन असते. त्यामध्ये प्रामुख्याने आंबा,लिंबू व संत्रे, सफरचंद, लगदा, कच्चीपपई व पेरू या फळांचा प्रामुख्याने वापर करणे फायद्याचे ठरेल.
खाद्य रंग मिळविण्यासाठी निळ्या द्राक्षांच्या साली, कोकम फालसा किंवा जांभळाचा उपयोग होऊ शकतो. काजूचे फळ वेगळे केल्यानंतर राहिलेल्या बोंडापासून रस, सिरप, कँडी तसेच फेनिसारखे मद्य तयार करता येते. काजू बोंडामध्ये २० टक्के तेल असून त्यांचा उपयोग ब्राझीलमध्ये कारखान्यात मोठ्या प्रमाणात केला जातो. म्हणून अशा प्रकारचे फळांपासून जे टाकाऊ घटक निघतात त्यावर योग्य  प्रकारे प्रक्रिया करण्यास भरपूर वाव आहे.


फळप्रक्रिया युनिटमध्ये फळे, प्रक्रियेसाठी वापरलेली भांडी व युनिटची फरशी धुण्यामुळे तसचे फळांना उष्ण पाण्याची प्रक्रिया करणे, प्रक्रिया पदार्थांचे पाण्यात निर्जंतुकीकरण करणे, वेष्टनासाठी वापरायचे कॅन, डबे, काचेच्या बरण्या व बाटलया धुणे इ. स्तरांवर मोठ्या प्रमाणावर सांडपाणी तयार होते. अशा सांडपाण्यात विद्राव्य घटक, साठवणीत बसणारे घटक, पाण्याचा सामू नत्र स्निग्ध घटक, हे पर्यावरणास घातक असतात. अशा पाण्यात फळांचे तुकडे, पाने असे मोठ्या आकाराचे टाकाऊ असतात. अशा पाण्यात फळांचे तुकडे, पाने असे मोठ्या आकाराचे टाकाऊ घटकही असतात. फळप्रक्रिया युनिटच्या सांडपाण्यात सामू हा बऱ्याच वेळा आम्लधर्मी असतो. त्यामुळे मोठ्या शहरांतील प्रक्रिया युनिट जर मुख्य गटारास जोडले असतील तर अशा घटकांमुळे गटारे तुंबतात. त्यामुळे गटाराचे कॉक्रिट गंजून खराब होते. म्हणून फळप्रक्रिया युनिटमधील सांडपाण्याचे विल्हेवाट योगय पध्दतीने लावणे महत्वाचे आहे.
प्रथम अशा सांडपाण्यातील मोठे अविद्रव्य घटक गाळण पध्दतीने वेगळे करण्याची व्यवस्था असावी. सांडपाण्याचा सामु ६ ते ९ या दरम्यान राखावा. पाणी गुरुत्वाकर्षणाच्या तत्वावर चालणाऱ्या स्वच्छता संयंत्राव्दारे घटक तळाला बसतील अशा टाक्यात साठवून स्वच्छ करावे व नंतर मुख्य गटारास जोडावे किंवा परिसरातील शेतीस किंवा बागेस वापरावे. मोठ्या व्यापारी युनिटमध्ये अशा सांडपाण्यावर प्राथमिक, दुय्यम तसेच सुधारित पध्ततीने प्रक्रिया करण्याची यंत्रणा राबविली जाते. त्यामुळे सांडपाण्यापासून कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. लहान व मध्ये युनिटसाठी सुध्दा  सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची आवश्यक पध्दती वापरणे महत्वाचे आहे.
फळे   उपपदार्थ  :- 

 • आंबा
 •  कोय                                                                 खाद्यतेल, स्टार्च, पीठ(जनावरांचे खाद्य), टॅनीन.
 • साली                                                                 शिरका, खत, पेक्टिन, अल्कोहोल.
 • लगदा                                                                वाईन, सिरका, एकपेशी प्रथिने.

 

 • द्राक्षे
 • लगदा                                                                 टार्टारिक आम्ल,जेली, खाद्य पेक्टिन खाद्यरंग.
 • बिया                                                                   तेल, जनावरांचे खाद्य.

 

 • लिंबू वर्गीय फळे
 • साली                                                                  सुगंधी तेल, पेक्टिन, कँडी.
 • गराचा लगदा                                                      पेक्टीन, सायट्रिक आम्ल, जनावरांचे खाद्य.

 

 • केळी
 • साली                                                                   वाळवून पोल्ट्रिखाद्य, चीज, जनावरांचे खाद्य.
 • खोड                                                                     खाद्यतेल, तंतुमय धागे, कागद, स्टार्च.
 • पेरू
 • गर                                                                       साल चीज.

 

 • अननस
 • देठ                                                                       फळांची सालरस, सायट्रिक आम्ल.
 • गराचा चोथा                                                         वाळवून जनावरांचे खाद्य.

 

 • जांभूळ
 • लगदा                                                                    वाळवून जनावरांचे खाद्य.
 • बिया                                                                      आयुर्वेदिक पावडर.

 

 • डाळिंब
 • बिया                                                                       खाद्यातेल, पावडर.
 • साली                                                                       दंतमंजन.
 • पपई (कच्ची)                                                           टुटीफ्रुटी. (पेपेन काढल्यावर)

0 responses on "फळांच्या टाकाऊ भागापासून उपपदार्थ"

Leave a Message

All Right Reserved.