• No products in the cart.

उद्योजकता आणि महिला शक्ती

Women Entrepreneurship –
“कल्पना सत्यात उतरविण्यासाठी स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा”

“चूल आणि मुल” या चाकोरीतून महिला आता बाहेर पडत आहेत आणि स्वतःचा महिला उद्योजकता करण्याकडे झेप घेत आहेत. व्यवसायासाठी शहराकडील परिस्थिती महिलांना जराशी अनुकूल ठरते परंतु खेडेगावात अजूनही महिलांना व्यवसायासाठी एवढी अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली नाही तरी काही महिला घराचा उंबरठा ओलांडून व्यायसाय चालू करण्याच्या हेतूने बाहेर पडतात आणि उद्योग यशस्वीही करतात. अजूनही आपल्या समाजात “तुझ्याबरोबर कोण आहे” हे वाक्य महिलांना अनेकदा ऐकायला मिळते. “बाहेर निघालीस, पण तुझ्याबरोबर कोण आहे” हेही कायमच ऐकावे लागणारे वाक्य. या परिस्थितीत स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्या महिलांना किती ऐकावे लागत असेल, याची कल्पना न केलेलीच बरी पण इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. याची बरीच उदाहरण आपण पाहू शकतो. ज्योती नाईक (महिला गृहउद्योग लिज्जत पापड संस्थापक), अनिता डोंगरे(फॅशन डिझायनर) तर एक महिला कशी एक सक्षम उद्योजक (Women Entrepreneur) होऊ शकते, तिला मदत कोण करू शकते अशा बर्याच गोष्टींची माहिती तुम्हाला येथे मिळेल.

नेमका कोणता व्यवसाय सुरु करावा? (Exactly what business to start)

जेव्हा तुम्ही विचार कराल स्वतःचा व्यवसाय सुरु करूया, तर पहिला विचार करा तुम्ही लघु-उद्योग करू इच्छिता की मोठा व्यवसाय. तुम्ही कोणता उद्योग चांगला करू शकता त्यासाठी तुम्हाला तुमच्यामधील  कलागुण ओळखता आले पाहिजे उदाहरणार्थ, कोणाला चांगला स्वयंपाक येतो, कोणाची शिलाई चांगली असेल, कोणाच व्यावहारिक ज्ञान चांगले असेल, कोणाला माल कोणता चांगला कोणता खराब याची ओळख असेल, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या कलागुणातील  ओळखू शकता आणि तुम्ही तुमचा उद्योग, व्यवसाय चालू करू शकता.

व्यवसायाला भांडवल कोण देणार?(Who will finance the business ?)

कोणताही व्यवसाय चालू करायचा असेल तर भांडवल लागणार हे निच्छितच. यासाठी सरकारने बऱ्याच योजना तयार केलेल्या आहेत. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज बँकांकडून घेऊ शकता. उदाहरणार्थ, स्त्री शक्ती योजना, मुद्रा योजना, ट्रेड योजना,महिला उद्योग निधी योजना, अन्नपूर्णा योजना, देना शक्ती योजना, उद्योगिनी योजना, सेंट कल्याणी योजना. अशा अनेक प्रकारच्या योजनांचा फायदा घेऊन तुम्ही तुमचा उद्योग सुरु करू शकता. महत्वाचे  म्हणजे बँकेकडून खास महिलांसाठी अशा विशेष कर्ज योजना आहेत ज्यात तारण, व्याज दर इ. बाबतीत अटी व शर्ती थोड्या शिथिल आणि लवचिक ठेवण्यात आलेल्या आहेत. यामध्ये तुम्ही ५०,००० पासून ते १०,००००० पर्यंतच कर्ज काढू शकता.

माल कुठ्न आणायचा? (Where to bring the product?)

आता भांडवलाचा प्रश्न सुटला, तर तुम्ही आता माल कुठून आणणार. यासाठी काही संस्था आहेत ज्या तुम्हाला तुमच्या उद्योगासाठी पूर्ण माहिती देतात. जसे स्वस्त, कमी दारात, जास्त माल कोठे मिळेल. काही ठिकाणी त्याचे प्रशिक्षण दिले जाते. तर ते घेऊन तुम्ही तुमचा उद्योग सुरु करू शकता. तसेच या अगोदर तुम्ही चालू करत असणाऱ्या उद्योगात अजून कोणती महिला असेल तर तिच्याकडून पण तुम्ही माहिती घेऊ शकता.

स्वभाव ,गुणधर्म ( Temperament  properties )

महिलांचा स्वभाव हा स्थिर असतो. जर त्यांनी ठरवलं की या उद्योगात आपल्याला पैसे कमवायचे आहेत. तर त्या नक्कीच त्या उद्योगात यशस्वी होतात. महिलांमध्ये कष्टाची सवय असते. तसेच त्यांच्यामध्ये संयम ही जास्त असतो. त्या बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष देऊ शकतात. महिलांमध्ये संभाषण कौशल्य चांगले असते त्यामुळे त्या दुसऱ्या महिलांना पण उद्योगात सामील करून घेऊन त्यांचीही प्रगती करू शकतात. त्यांनी मिळून जर काम केले तर कोणताही उद्योग त्या उच्च स्तरावर नेऊ शकतात. उदाहरणार्थ, ज्योती नाईक यांचा गृह उद्योग लिज्जत पापड यामध्ये महिलांनी घरी बसून त्यांच्या घरातल्या कामातून वेळ काढून काम केले आणि त्यांना त्यांच्या घराला हातभार लावायला पैसेही मिळाले त्यासाठी त्या कामाचा विस्तार चांगल्या पद्धतीने केला.

 प्रोडक्ट( Product )

आपण जे प्रोडक्ट ग्राहकांपर्यंत पोहचवत आहोत ते चांगले आहे का याची खात्री करून घेणे खूप गरजेच आहे. जर ते चांगले नसेल तर त्यामध्ये कोणत्या बदलाची आवशक्यता आहे, हेही जाणून घेणे तेवढच गरजेच आहे आणि बदलही लवकरात लवकर करायला हावा. म्हणजे आपले प्रोडक्ट मार्केटमध्ये चांगले जाईल. जर आपले प्रोडक्ट हे खात्रीशीर, योग्य दारात असेल तर ग्राहकही ते घेण्यास मोलभाव करत नाही आणि आपल वितरणही चांगले होते. प्रोडक्ट तयार करताना त्यात काही नवीन करता येईल का? याचाही विचार करून ग्राहकांपर्यंत नवनवीन प्रोडक्टचे प्रकार आणून वितरण करायला पाहिजे.

वितरण प्रणाली (Distribution system)

आपण प्रोडक्ट तयार केले पण ते मार्केटपर्यंत न्यायची प्रोसेसच माहिती नसेल तर उपयोगाच नाही. यासाठी आपण पाहिले  पाहिजे आपले प्रोडक्ट कुठल्या मार्केटला किती दराने जाईल. यासाठी थोडी मार्केटची माहिती आवश्यक आहे. काही जणांना वाटत की प्रोसेस वितरण म्हणजे लोकांपर्यंत जाऊन स्वतः विकणे परंतु ही पद्धत जुणी झाली. काही लघु-उद्योगात हि पद्धत लागूही होते परंतु जर तुम्ही मोठा उद्योग करत असाल तर लक्षात घ्या. आता जग डिजिटल झालंय तर आता आपले प्रोडक्ट लोकांपर्यंत घरी कसे पोहचेल तेही आपण घरी बसून याचा विचार करून. त्याची व्याप्ती वाढवा. त्याची जमेल तेवढी डिजिटल जाहिरात करा. असा विचार करू नका कि माझे प्रोडक्ट चांगले आहे तर मला जाहिरातीची गरज का?  जेवढी जाहिरात कराल तेवढी तुमच्या प्रोडक्ट विषयी लोकांना माहिती कळेल. व्यवसाय हा मर्यादित न ठेवता तो व्यापक कसा करता येईल याचा विचार करून कृती करा. व्यवसायाची जेवढी व्याप्ती वाढेल तेवढा नफा जास्त.

ग्राहक ओळखा (Know your customer)

तुम्ही जे प्रोडक्ट बनवताय ते कोणत्या लोकांसाठी आहे हेही लक्षात घ्या. उदाहरणार्थ, तुम्ही शेतीच्या बियाण्यांचा व्यवसाय करताय, तर तुमचे हे प्रोडक्ट शेतकरीच घेणार तर तुम्ही ते प्रोडक्ट खेड्यातच विकणे, जास्त फायद्याचे. समजा तुम्ही कोणत सौदर्यप्रसादानांची निर्मिती करत आहात तर तुम्ही ते प्रोडक्ट काही दुकानात तर काही लेडीज पार्लरकडे विकणे गरजेचे आहे.जर तुम्ही कोणते प्रोडक्ट बनवत आहात ते कोणत्या प्रकारच्या माणसांसाठी आहे हे लक्षात घेतले तर वितरण करायला सोप्पे जाते आणि फायदाही होतो. वितरण हे काही वेगळ्या पद्धतीने कसे करता येईल उदाहरणार्थ,सणासुदीला डीस्काउंट कसे देता येईल कि आपल्याला ही परवडेल आणि ग्राहकांनाही असाही विचार करा.

व्यवसायातील काही महत्वाच्या गोष्टी (Some important things in business)

  • जेव्हा एखादा व्यवसाय करताय तर त्याची व्याप्ती किती करता येईल याकडे लक्ष द्या.
  • बाजाराच्या दरांचा नेहमी आढावा घ्या.
  • आपले स्पर्धक काय नवीन करतायेत आणि आपण काय नवीन केले पाहिजे याकडे लक्ष द्या.
  • व्यवसायाची व्याप्ती वाढवण्यासाठी महिलांना सामील करून घेऊन त्यांनाही व्यवसायच प्रशिक्षण द्या आणि आपला व्यवसाय वाढवा.
  • जुने ग्राहकांशी नेहमी संपर्कात रहा. त्यांना तुमच्या नवीन प्रोडक्ट विषयी माहिती द्या.
  • जमेल तेवढ मार्केटिंग करा तेही वेगवेगळ्या पद्धतीने.
  • कधी तोटा झाला तरी खचून न जाता अजून प्रयत्न करा.
  • प्रोडक्ट किती तयार केले, किती वितरण झाले, किती किंमतीला गेले, खरेदी सोडून नफा किती झाला, अशा सर्व गोष्टींचा तपशील ठेवणे तसेच रोजची एक नियमावली ठेवणे गरजेच.
  • नवीन प्रोडक्ट कधी तयार केले, त्याचा फायदा किती झाला, आपण आखलेल्या वितरणाच्या पद्धतीचा किती फायदा झाला याची माहिती करून घेणे तेवढेच गरजेचे आहे.
  • तोटा झाला तरी आता आपण काय नवीन करू शकतो याकडे लक्ष द्या.

     आशा करते वरील माहितीवरून महिलांनी त्यांच्या स्वतःच्या पायावर व्यवसाय कसा सुरु करावा. तो कसा चांगला वाढवावा याची महिलांना कल्पना आली असेल.  या माहितीचा नक्कीच सर्व महिलांना फायदा होईल अशी आशा करते.

अशाच उद्योजकीय माहितीसाठी चावडीला भेट देत राहा.

-सुरेखा पवार.

“व्यावसायिक ज्ञानाचा पाया भक्कम करा आणि स्वतःचा विकास घडवा.”

  Stay Updated…
Other Blogs
Follow Us On Facebook And Instagram
For More Information Please Call Us On 7272971971

0 responses on "उद्योजकता आणि महिला शक्ती"

Leave a Message

Contact Details

Contact No: +917272971971
Comany Name : Chawadi Training and Consultancy Pvt. Ltd.
Adress: First Floor, Radha House Building, Tapovan Rd, Nirmal Nagar, near Laxmi nagar kaman, Savedi, Tal. Nagar, Dist- Ahilyanagar 414003, maharashtra ,India
top
All Right Reserved.