भाजीपाला डिहाइड्रेशन (निर्जलीकरण) यशस्वी लघुउद्योग……!!!

           भाजीपाला डिहाइड्रेशन (निर्जलीकरण) यशस्वी लघुउद्योग……!!!

भारत हा देश भाजीपाला व फळांच्या उत्पादनात जगात दुस-या क्रमांकावरचा देश आहे. जगाच्या एकुण उत्पादनाच्या जवळ जवळ १५% भाजीपाल्याचे उत्पादन एकट्या भारत देशात घेतले जाते. हि आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. असे असले तरी, नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार एकुण उत्पादनाच्या १८% उत्पादनाची नासाडी ही उत्पादनाची योग्य हातळणी न केल्यामुळे झाली. फळे व भाजीपाल्याचा नाशवंत गुणधर्म असल्यामुळे भाजीपाल्याची नासाडी तर होतेच त्याचबरोबर शेतक-याचही तेवढच नुकसान होते. त्याचप्रमाणे भारतात एकुण भाजीपाला व फळे उत्पादनाच्या केवळ २% उत्पादनावर प्रक्रिया केली जाते. हा आकडा इतर उत्पादनांच्या तुलनेत अतिशय कमी आहे हे प्रमाण वाढवणे गरजेचे असुन यासाठी प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याची गरज आहे. भाजीपाला व फळे टिकवण्यासाठी तसेच त्याचे मुल्यवर्धनासाठी त्याचे निर्जलीकरण (Dehydration) हा एक सोपा व फायदेशिर पर्याय आहे.

निर्जलीकरण म्हणजे काय ?

              भाजीपाला हा नाशवंत असतो कारण त्यातील अतिरिक्त नैसर्गिक जल आणि जीवाणू (ब्याक्ट्रियाज). सडण्याची प्रक्रिया त्यामुळे अत्यंत वेगाने सुरु होते आणि शेतमाल अखाद्य बनतो. चक्क फेकून द्यावा लागतो. जलांश जेवढा अधिक तेवढी सडण्याचा वेग अधिक. कोथींबीर, टोमॅटो ते सर्वच पालेभाज्या या सदरात येतात. काही फळभाज्यांचे नैसर्गिक आयुष्य थोडे अधिक असते पण बाजारभाव नसला कि त्याही वाया जातात. हे वाया जाणे थांबवणे. भाज्यांमधील अतिरिक्त जल अल्प प्रक्रिया करुन काढुन घेणे म्हणजे निर्जलीकरण

   निर्जलीकरण उदयोग :-

              बऱ्याचशा भाज्या अशा आहेत ज्या की, सुकवून लाभदायक रीत्या विकल्या जाऊ शकतात. बटाट्याचा खप बाराही महिने होत असतो. त्याची भाजीपण बनते आणि खाऱ्या पदार्थांसाठीही चालतो. यंत्राव्दारे बटाट्याची साल काढून त्या सुकवून फायदेशीरपणे विकल्या जाऊ शकतात. काही वेळा केळी खूप  स्वस्त असतात. त्या दिवसात कच्ची किंवा पिकलेली केळी घेऊन त्यांच्या चकत्या किंवा तुकडे कापून सुकविले जातात.  कोबी, घोळाची भाजी, पुदिना वगैरही सुकवले जातात. आजकाल हिरवा मटार सुकविण्याचे काम खूप चांगले चालू आहे. कारण मटर बाराही महिने खाल्ली जाते. पिकलेल्या मटारमध्ये सुकवलेल्या कच्च्या मटाराइतकी चांगली चव लागते त्यामुळे सध्या हा उदयोग मोठया प्रमाणात विकसित होत आहे. येणाऱ्या भविष्यकाळामध्ये हा उदयोग मोठ्या स्वरूपाची भरारी घेऊ शकते.

           भाजीपाला साठवणुकीचा कालावधी वाढविण्यासाठी सुकविणे ही अत्यंत महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे. अलीकडे सुकविणे ही पद्धत घरगुती स्तरावर न राहता त्याला व्यावसायिक स्वरूप आले आहे. तांत्रिक पद्धतीने भाजीपाल्यातील पाण्याचा अंश कमी करून त्याचा साठवण कालावधी वाढविता येतो.  ठराविक हंगामामध्ये मिळणारा भाजीपाला बाजारपेठेत एकदम आल्यास दर पडतात. अशा वेळी त्या भाजीपाल्यावर प्रक्रिया करून साठवणुकीचा कालावधी वाढविल्यास त्याची मूल्यवृद्धी होते, शिवाय योग्यवेळी विक्री करून चांगले आर्थिक उत्पन्नही मिळविता येते.

बाजारपेठ :-

          सध्या सर्वत्र सुकविलेल्या भाज्या खाण्याची संस्कृती रूजत आहे. त्यांची मागणी सुध्दा दिवसेंदिवस वाढत आहे. या फळ व भाज्यांना अनेक हॉटेल, विविध दुकान, घरगुती स्वरूपात यांची मागणी दररोज वाढत आहे. या उदयोगास देश व आंतराष्ट्रीयस्तरावर चांगली बाजारपेठ उपलब्ध आहे.

प्रकल्प विषयक :-

          या उदयोगास साधारण २००० चौ. जागेची आवश्यकता भासते. तर हा उद्योग सुरू करण्यासाठी ३ ते ४ लोकांची आवश्यकता असून या  उभारणीसाठी ३ ते ४ लाख रूपये खर्च येतो. बँक सुध्दा आपली पत पाहून योग्य  स्वरूपात कर्ज पुरवठा करते. तसेच आपणांस शासकीय योजनाचा लाभ घेता येतो.

 या प्रकल्पबाबत चावडी तर्फे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले असून नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी खालील .

                        अधिक माहितीसाठी खाली दिसत असलेल्या call now या बटनावर क्लिक करा किंवा थेट कॉल करा.

December 9, 2016

2 responses on "भाजीपाला डिहाइड्रेशन (निर्जलीकरण) यशस्वी लघुउद्योग......!!!"

    • भाजीपाला सुकवणे याची आणखी माहिती मिळेल का

Leave a Message

Your email address will not be published.

All Right Reserved.
Call Now ButtonCall Now
Translate »