चिंच प्रक्रिया उद्योग (Tamarind Processing Business)…….!!!
चिंच दिसली की लहानपण डोळ्यासमोरुन गेल्याशिवाय राहत नाही. हि चिंच पाहून तोंडाला पाणी सुटणार नाही असे फार क्वचीतच आढळते. चिंचेची भलीमोठी झाडे आपल्याकडे भरपूर दिसतात. चिंचेची सावली अत्यंत शीतल आणि श्रम कमी करणारी असते.
प्रत्येक खेड्यापाड्यात चिंचेचे झाड मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळतात. या झाडाची कोवळी पाने व पाकळ्या खेड्यामध्ये चवीने खातात. त्याची चव आंबट तुरट अशी असते. या वृक्षाची उंची ७० ते ८० फुट इतकी असते. काही झाडे शंभर फुट पर्यंत ही वाढतात.याचा आकार चौफेर असून, घाटदार असतो. चिंचेची पाने भाजीसाठी वापरली जातात. चिंचेची झाड कोणत्याही हवामानात पोसले जाते. त्याची वाढ होण्यासाठी कमीत कमी पाणी लागते. दुष्काळी भागात किंवा स्वतंत्र शेती करावयास हरकत नाही. या झाडाला आयुष्यही भरपूर असते. या वृक्षाची लागवड डोंगरी, भागात मोठ्या प्रमाणात दिसून येतात.
स्वयंपाक घरात नित्य आहारात चिंच दिसून येते. पिकलेल्या चिंचेचा स्वाद आंबट, गोड आणि तुरट असल्यानं भाजीत किंवा आमटीत वापरल्यानं तोंड स्वच्छ होते. मधुर-आंबट चवीची चिंच म्हणजे प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या बालपणात आवडता असणारा खाद्य पदार्थ आहे. चिंच अत्यंत रुचीकर असून तिचा वापर थेट औषध म्हणून त्याचा वापर होतो.
उद्योग :-
महिला, पुरुषांना सर्वांना घरबसल्या करता येण्यासारखा चिंच प्रकिया उद्योग होय. अत्यंत अल्प भांडवलात हा व्यवसाय सुरु करता येतो. चिंच ही सर्वत्र उपलब्ध असणारी, दैनंदिन आहारात उपयोगी येणारी सर्वांच्या जिभेला पाणी येणारी चिंच आहे. चिंचेपासून वेगवेगळे पदार्थ, तसेच विविध औषाधीसाठी सुध्दा यांचा उपयोग मोठ्या प्रमाणत केला जातो. तसेच प्रत्येक दैनंदिन आहारा मध्ये चिंचेचा उपयोग होतो. पदार्थांना व तोंडाला चव आणणे करिता चिंच वापरतात.आयुर्वेदिक औषधांमध्येही चिंचेचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. या उद्योगात आपल्याला अत्यंत सोप्या पध्दतीने व कमी खर्चात विविध पदार्थ तयार करता येतात. उदा. चिंच गोळा व चमचा चिंच सर्वात जास्त मागणी असणारा हा चिंचेचा प्रकार. चिंचेपासून लोणचे, बर्फी, चॉकलेट असे विविध पदार्थ तयार होतात. परंतु चिंचगोळा आणि चमचा चिंच या दोन पदार्थांना सर्वात जास्त मागणी आहे. यांना सर्वात कमी प्रक्रिया करावी लागते आणि अत्यंत कमी खर्चात कमी साहित्यात हे प्रॉडक्टस् घरच्या घरी करता येतात. Tamarind Processing Business हा उद्योग केल्यास आपल्याला अधिक प्रमाणात फायदा होऊ शकतो. आपल्या जवळच्या शेतकऱ्याकडूनही किंवा गावात चिंचेची झाडे असणाऱ्यांकडून चांगल्या प्रतीची चिंच खरेदी करून त्यावर प्रक्रिया करून त्यापासून विविध प्रक्रिया उद्योग करता येतो.
बाजारपेठ :-
सर्वात तोडांला पाणी आणाणार उद्योग म्हणजे चिंच प्रक्रिया उद्योग होय. या पासून बनविलेल्या विविध पदार्थांना बाजारपेठ उपलब्ध आहे. चिंचला ठोक विक्रते, किरकोळ दुकान, स्टेशनरी दुकान हॉटेल, खानावळ येथे मोठ्या प्रमाणात चिंचेला मोठ्या प्रमाणात मागणी असते. तसेच त्यापासून बनविलेल्या उत्पादनाना मोठ्या प्रकारात बाजारात मागणी असते.
प्रकल्पविषय :-
हा प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी ७० ते ८० हजार रुपये खर्च येतो. उद्योग सुरु झाल्यावर खर्च कमी जास्त प्रमाणात होऊ शकतो. तसेच बॅक सुध्दा आपली पत पाहून कर्जपुरवठा करते. तसेच विविध शासकीय योजनाचा लाभ घेता येतो. हा उद्योग केल्यास आपण एक चांगले यशस्वी उद्योजक होऊ शकता.
अधिक महितीसाठी :- 7272971971
Stay Updated…
Other Blogs
Follow Us On Facebook And Instagram
For More Information Please Call Us On 7272971971
1 responses on "चिंच प्रक्रिया उद्योग …….!!!"
Leave a Message
You must be logged in to post a comment.
चिंच प्रकिया उद्योग प्रशिक्षण date कळवा ,