• No products in the cart.

शेळीपालन व्यवसायातील स्वॉट अॅनालिसिसचे महत्व…!!!

शेळीपालन व्यवसायातील स्वॉट अॅनालिसिसचे(Swot Analysis)महत्व…!!!
स्वॉट ॲनालिसिसचा उपयोग व्यवसायात जमेच्या बाजूंवर लक्ष केंद्रित करण्यासाठी, व्यवसायातील धोके कमी करण्यासाठी व वेगवेगळ्या संधींचा आवश्यक फायदा घेण्यासाठी अग्रक्रमाने होतो. शेळीपालन व्यवसायातील सर्वोच्च उंची गाठण्यासाठी एक चौकटबद्ध उपाययोजना करण्यासाठी स्वॉट ॲनालिसिसचा उपयोग होऊ शकतो.  कोणताही व्यवसाय सुरू करायचा असल्यास स्वॉट ॲनालिसिस (Swot Analysis) ला खूप महत्त्व आहे. स्वॉट ॲनालिसिसमध्ये शेळीपालन व्यवसाय सुरू करताना आपल्या जमेच्या बाजू कुठल्या आहेत किंवा आपली ताकद काय (S-strength) आहे, अडचणी (Weakness) म्हणजे या व्यवसायासाठी कुठल्या बाजूने भविष्यात कमी पडू शकू हे तपासावे. यानंतर संधी (Opportunities) म्हणजे आपल्याला या व्यवसायात काय संधी आहेत व कुठले धोके (Threats) आहेत हे तपासणे अतिशय गरजेचे आहे. जमेचा बाजू व कमकुवतपणा हा शेळीपालकाच्या बाजूच्या असतात व त्यावर शेळीपालक त्वरित आवश्यक उपाययोजना अंमलात आणू शकतो. म्हणजेच या गोष्टी त्याच्या अखत्यारीतील असतात. त्यामध्ये त्याला आवश्यक काळजी घेऊन बदल करता येतात. त्यामुळे व्यवसायातील संधी व धोके लक्षात घेऊन व्यवसायात पुढे जाता येते.Swot Analysis मधील प्रत्येक शब्दाचा अर्थ पुढीलप्रमाणे..


 जमेच्या बाजू व ताकद (S-Strengths)

  • मनुष्यबळ, तंत्रज्ञान, माहिती आणि पैसे या सर्व बाजूने शेळीपालनाची क्षमता काय आहे हे प्रथम महत्त्वाचे आहे. या सर्व गोष्टींचा विचार भविष्यातील ३ वर्षांसाठी केला पाहिजे.
  • व्यवसाय करण्याची इच्छा, जिद्द व कष्ट करण्याची तयारी.
  • यशस्वी शेळीपालक व त्यांच्या सोबतची तुमची गटबांधणी.
  • व्यवसायातील ध्येय व त्याच्या वर्तमानासाठी व भविष्यासाठी योग्य चाचपणी याचा योग्य ताळेबंद असणे.
  • व्यवसायातील गुणवत्ता असलेली सेवा पुरविण्याची क्षमता ज्यामध्ये सागम्री, वेळापत्रक पाळणे, कार्यक्षमता, ग्राहकापर्यंत पोचण्याची क्षमता व व्यवसायातील नावीन्यपूर्णता या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

 

  • व्यवसायातील शासनाचे नियम व अटी पाळून करावयाच्या किंवा केल्या जाणाऱ्या गोष्टी तपासणे याबद्दल विश्वास असणे.
  • या व्यवसायाची माहिती अगोदरपासून असेल तर यशस्वी होण्यासाठी मदतच होईल.
  • या व्यवसायासंबंधीचे व तुमच्या सेवेचे तुम्ही ज्या जिल्ह्यात किंवा गावात, आजूबाजूच्या परिसरातून मिळालेले उत्तम अभिप्राय असणे.
  • विक्रीव्यवस्थापन प्रक्रिया व जाहिरात याबद्दलची माहिती.
  • इतर व्यावसायिकापेक्षा तुमच्या व्यवसायाचे वेगळेपण.
  • खाद्य, पाणी, जमीन, आवश्यक गोठा यांची व्यवसायाच्या प्रमाणात असलेली उपलब्धता.
  • कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची उपलब्धता व नफ्यानुसार पगाराची क्षमता.
  • व्यवसायासाठी आवश्यक असणारी सर्वात चांगली मालमत्ता (उदा. वाळला चारा, पाणी, बाजार, निर्यातक्षमता इ.)
  • ग्राहकाने तुमचा माल विकत का घ्यावा याबद्दलची तुमची स्पष्टोक्ती.
  • व्यवसायात का फायदा मिळेल असे वाटते व त्याबद्दल तुम्ही काय प्रयत्न कराल?

           

   कमकुवत बाजू (W-Weakness)

  • लागणाऱ्या साहित्याची उपलब्धता कमी असणे (उदा. मनुष्यबळ, तंत्रज्ञान माहिती इ.)
  • जागा व पाण्याची कमतरता, फक्त चांगली जमीन असणे (पिकाऊ) व जास्त क्षारयुक्त पाणी असणे किंवा चारा उत्पादनाचे नियोजन नसणे.
  • योग्य प्रशिक्षण न घेता दुसरे गोठे व लोकांच्या सांगण्यावरून व्यवसाय सुरू न करणे.
  • विक्री नियोजन योग्य नसणे. स्वच्छ मांसनिर्मिती व दूधनिर्मिती याबद्दल माहिती न घेणे.
  • एकाच वेळी जास्त शेळ्या विल्यानंतर करडांचे योग्य व्यवस्थापन न केल्यामुळे मरतूक वाढणे यासंबंधी योग्य खबरदारी न घेणे.
  • प्रतिनग मादी/नर विक्री वयापर्यंत किती खर्च आला व त्यानुसार किंमत ठरविण्याबाबत माहिती नसणे.
  • तज्ञ पशुवैद्यक, रक्त, लेंडीचे नमुने तपासण्यासाठी प्रयोगशाळा जवळपास उपलब्ध नसणे.
  • शासनाच्या पैदास धोरणाप्रमाणे जनावरांचा संकर नियोजन न करणे व धोरणाबद्दल माहितीच नसणे.
  • शासनाच्या विविध योजना, बॅंकाचे व्यवहार, गोठ्यातील नोंदी, लसीकरण, जंत निर्मूलन, गोठ्याचे
  • व्यवस्थापन, विमा या गोष्टीबद्दल योग्य माहितीचा अभाव.

 व्यवसायातील संधी (O:Opportunities)

  • सध्याचा बोकडाच्या मटनाचा दर, चव व मागणी.
  • बोकडाच्या मटनाची वाढत चाललेली निर्यात व मटनाला सर्व धर्मामध्ये खाण्यासाठी कोणताही अडसर नाही.
  • बोकडाची खाण्यासाठी वाढलेल्या कत्तलीमुळे कमी होत असलेली संख्या.
  • शास्त्रीय शेळीपालन करण्यासाठी तज्ञ व माहिती याची वाढत चाललेली उपलब्धता.
  • गोठा, जनावरे, चारा व इतर आवश्यक गोष्टीवर लागणारी गुंतवणूक परवडणारी आहे.
  • शेळीच्या दुधामध्ये औषधी गुणधर्म असल्याने दुधाची व उपपदार्थांची हळूहळू वाढत चाललेली मागणी.
  • दुष्काळ, ओला दुष्काळ, अचानक वातावरणातील बदल, ग्लोबल वाॅर्मिंग यामुळे शेतीव्यवसायाला जोडधंदा म्हणून अत्यंत उपयुक्त व्यवसाय.
  • बेरोजगारी
  • सध्या पशुपालन व्यवसायामध्ये येत असलेल्या नवनवीन तंत्रज्ञानामुळे प्रती जनावर मिळणारी उत्पादनवाढ व एकूणच नफा (उदा. कृत्रिम रेतन)
  • विक्री व्यवस्थापनासाठी सध्या वापरात येऊ शकतात अशा माहिती तंत्रज्ञानाच्या बाबी (उदा. इंटरनेट मार्केटिंग असोसिएशन
  • शेळीपालन व्यवसायात आवश्यकतेनुसार जनावरे विक्री करण्याची पद्धती (उदा. बकरी ईद, जत्रा, पैदाशीची जनावरे, स्थानिक विक्री इ.)

   धोके (T-Threats)

  • शेळीपालनातील वाढलेली फसवणूक आणि अशास्त्रीय दृष्टिकोनातून दिली जाणारी माहिती.
  • शेळीपालकांमध्ये वाढलेली अनावश्यक स्पर्धा व दुसऱ्याला मदत करुन एकत्र पुढे न जाण्याची भावना.
  • करडांची वाढती मरतूक तसेच नवीन रोगांचा शिरकाव आणि नियंत्रणातील असफलता.
  • बदलत्या वातावरणामुळे ओला, वाळला चाऱ्याचा अभाव.

 

Stay Updated…
Other Blogs
Follow Us On Facebook And Instagram
For More Information Please Call Us On 7272971971

March 27, 2021

0 responses on "शेळीपालन व्यवसायातील स्वॉट अॅनालिसिसचे महत्व...!!!"

Leave a Message

Contact Details

Contact No: +917272971971
Comany Name : Chawadi Training and Consultancy Pvt. Ltd.
Adress: First Floor, Radha House Building, Tapovan Rd, Nirmal Nagar, near Laxmi nagar kaman, Savedi, Tal. Nagar, Dist- Ahilyanagar 414003, maharashtra ,India
top
All Right Reserved.