स्वताची जमीन नाहीय, भांडवल सुद्धा नाहीय; पण स्वताचा अग्रोबेस बिझनेस स्टार्ट करण्याची इच्छा आहे का ? मग हा बिझनेस करा..

स्वताची जमीन नाहीय ,भांडवल सुद्धा नाहीय; पण स्वताचा अग्रोबेस बिझनेस स्टार्ट करण्याची इच्छा आहे का ? मग हा बिझनेस करा.. स्पिरुलीना प्रकल्प – Spirulina Farming

मित्रांनो बऱ्याच नवतरुणांची स्वताचा बिझनेस स्टार्ट करण्याची इच्छा असते .बॉस बरोबर रोज कटकटी करीत बसण्यापेक्षा स्वतःचा बिझनेस करतो हा विचार सारखा मनात येत असतो; पण बिझनेस सुरु करायचा तर जागा पाहिजे.भांडवल पाहिजे हे बेसिक प्रश्न समोर उभे राहतात…तर अश्या सर्व मित्रांसाठी  आज आपण एका आगळ्यावेगळ्या नवीन स्टार्ट अप उद्योगाची माहिती बघणार आहोत….

चावडी चे Affiliate बना,सोशल मिडिया वर मेसेज शेयर करा,अधिकचे उत्पन्न कमवा.अधिक माहितीसाठी या लिंक वर क्लिक करा.

स्पिरुलीना प्रकल्प
स्पिरुलीना  हे एक प्रकारचे हिरवे निळे शेवाळ असून याचा सर्वात जास्त वापर पूरक अन्न म्हणून केला जातो . जगातील सर्वोत्तम अन्न म्हणून नासा या अंतराळ मोहिमांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या संस्थेने उल्लेख केला आहे. या  शेवाळापासून पावडर , गोळ्या असे विविध प्रोडक्ट्स तयार केले जातात .याचा आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मोठा फायदा होतो. यामध्ये पालकापेक्षा  एक हजार पट जास्त लोह  आहे. दुधापेक्षा ५०० % अधिक कॅल्शियम आहे. गाजरापेक्षा १००० % आणि पपईपेक्षा २००० % अधिक बीटा कॅरोटीन आहे.
आज तब्बल ६ हजार रुपये किलो दराने हे स्पिरुलीना प्रोडक्ट्स मार्केट मध्ये विकले जातात तर याचा उत्पादन खर्च साधारण १ – १.५ हजारप्रती किलो येतो.एक १० किलो उत्पादन युनिट चा विचार करून हिशोब केल्यास सर्व खर्च वजा जाता महिना कमीत कमी १५-२० हजार रुपये निव्वळ नफा मिळतो.
घराच्या गच्चीवर किंवा अगदी पडीक जमीन जरी असेल किंवा कुणाची २-३ गुंठे जागा भाड्याने घेवून आपण हा प्रकल्प अगदी सहज सुरु करू शकतो यासाठी तुम्हाला लागणार आहेत पांढऱ्या रंगाचे काही ड्रम ,प्लास्टिक पेपर आणि इतर काही आवश्यक साधनसामग्री…बास झाले काम…

हा प्रकल्प उभारणी ला सुद्धा फार कमी खर्च येतो आणि विशेष म्हणजे पाणी एकदाच लागते रोज पाणी सुद्धा लागत नाही. आणि विशेष म्हणजे हा प्रकल्प एका ठिकाणाहून दुसरीकडे आपण सहज हलवू शकतो ..ज्यांच्याकडे जमीन असेल किंवा मोकळा प्लॉट असेल त्यांच्यासाठी तर हा प्रकल्प सगळ्यात चांगला आहे.

बँकॉक च्या एका इंजिनियर ने आपल्या हॉटेल च्या वरती या स्पिरुलीना प्रकल्प काम सुरु केले आणि हा उद्योग एका वेगळ्या प्रकाशझोतात आला..ते लोक स्पिरुलीना चे प्रोडक्शन करून त्याच्या त्यांच्या हॉटेल च्या खाद्यपदार्थ मध्ये वापर करतात यामुळे त्यांच्या उत्पादनाचे value addition व्हायला मदत होते आणि त्यामुळे त्याचा आर्थिक फायदा सुद्धा वाढतो….

आज शहरी भागात जागेची  मोठी अडचण आहे त्यामुळे कमी भांडवलात आणि आहे त्या जागेत  हा व्यवसाय सुरु करता येईल.आणि गरजेनुसार त्यात हळूहळू वाढ करता येईल .अजून एक विशेष कि या प्रकल्पाला मनुष्य बळ मोठ्या प्रमाणात लागत नाही .त्यामुळे घरातील प्रशिक्षित व्यक्ती अगदी सहजरित्या पूर्ण युनिट चालवू शकते. स्पिरुलीना प्रकल्प संपूर्ण माहिती घेवून आणि थोडा अभ्यास करून जर महाराष्ट्र मध्ये शहरी भागात हा व्यवसाय सुरु केल्यास नक्कीच तुम्हास आर्थिक फायदा होवू  शकेल .

या प्रकल्पाच्या अधिक माहिती साठी चावडी मध्ये याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण आयोजित केले असून त्या साठी 7272971971 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Stay Updated…
Other Blogs
Follow Us On Facebook And Instagram
For More Information Please Call Us On 7272971971

March 30, 2021

15 responses on "स्वताची जमीन नाहीय, भांडवल सुद्धा नाहीय; पण स्वताचा अग्रोबेस बिझनेस स्टार्ट करण्याची इच्छा आहे का ? मग हा बिझनेस करा.."

  1. Mala pan ha business karaycha

  2. Soyaben oil machine & sheli palan

  3. Mala Nursery & Soya oil Machine krayacha Aahe.

  4. I would like start fish farming, I have land, but require 2 lacks rupees

  5. Sar mal sheli palan karycy ahayt

  6. मला करायचाय हा व्यवसाय

  7. Yes, i will do this business. I m interested in this. Give me details of this business.

  8. Sir, Where is market of this material????? After Production where we can sell this

  9. प्रविण रामकृष्ण सोनवणेSeptember 15, 2017 at 11:10 am

    मला स्पिलूरिनाचा व्यवसाय सुरू करायचा आहे
    प्रशिक्षण कुठे आहे
    माझे गाव मुडावद तालुका सिदखेडा जिल्हा धुळे महाराष्ट्र

  10. Nilesh shinde ( baba shinde)October 31, 2017 at 1:46 pm

    Good

  11. मला पापड उद्योग सुरु करावयाचा आहे

Leave a Message

All Right Reserved.