• No products in the cart.

व्यापारी ते उद्योजक एक नवा प्रवास

अनेक वेळा व्यवसाय मध्ये उतरायचे म्हणून आपण एखादे दुकान एखाद्या व्यवसाय सुरू करतो माल खरेदी करायचा आणि पुढे तो विकायचा असा आपला उद्योगाचा गाडा हळूहळू आकार घेत असतो..

पण एकदा का व्यवसाय रुटीनमध्ये आला की मग 24 तास आपण त्या उद्योगांमध्ये अडकून पडतो ना लोकांचे लग्न ना लोकांचे कार्य घरी कधी काही सण आपल्या सोबतच्या लोकांसोबत आनंदाने दोन क्षण घालवणे हे सगळे प्रकार ओघाओघाने कमी होत चालतात मग अशावेळी नक्की सुचत नाही की काय करायला हवे बर कर्मचारी खूप आहेत आमच्याकडे पण स्वतः तिथे हजर राहावेच लागते ही भावना प्रत्येक उद्योजकाच्या मनात असते काही अंशी ते बरोबर सुद्धा आहे पण यामध्ये बदल जर केला नाही तर शेवटपर्यंत आपल्याला युद्ध लढावेच लागेल अशी काहीशी परिस्थिती आपल्या धंद्यामध्ये असते..

मग आपण जर आजारी पडलो आपल्याला जर कुठे बाहेर जायचे असेल जर काही कारणाने आपण काही दिवस दुकाने जाऊ शकलो नाही तर व्यवसायाचे काय होणार ही चिंता कायम व्यवसायिकांच्या मनामध्ये घर करून असते..

या अडचणी वरती कायमस्वरूपी तोडगा काढायचा असेल आणि फक्त तुम्ही उपस्थित नसताना व्यवसाय चालणे असे नसून तुमच्याशिवाय तुमचा बिजनेस जर वाढवायचा असेल नवीन सोप्या शब्दात तुमचा बिजनेस ऑटो पायलेट मोड वरती न्यायचा असेल आणि तुम्हाला स्वतःला व्यावसायिक ते उद्योजक हा प्रवास जर करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या उद्योगांमध्ये अमुलाग्र बदल करावे लागतील

यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला स्वतःची मानसिकता बदलावी लागेल की माझ्याशिवाय सुद्धा माझा उद्योग चालू शकतो

साधं उदाहरण घ्या ना मोठमोठ्या कंपन्या जसे की डी मार्ट जिओ स्मार्ट बिग बाजार यासारखे मोठे आउटलेट हे स्वतः मालक चालवत नाहीत तिथे सगळीकडेच कर्मचारी असतात मग तिथे सगळे कसे काही बरे व्यवस्थित असेल

अर्थात तिथेही सगळे काही व्यवस्थित नसेलच काही चुका तिथे सुद्धा होत असतील पण सगळ्या गोष्टी त्यांनी सिस्टिमॅटिक पद्धतीने सेटअप केले आहेत काही गोष्टींना वेळ दिला आहे त्यांचीही सुरुवात आपल्या दुकानासारखी छोटीच झाली होती पण पहिल्या मिनिटापासून त्यांनी सिस्टीम लावण्याकडे कल ठेवला आणि आपण फक्त दुकानाचा धंदा कसा होईल याच्याकडे लक्ष ठेवले एवढाच काय तो फरक.

आजही तुमचे दुकान हे बिलिंग सॉफ्टवेअर वरती चालते का त्यातही ते ऑनलाईन झालेले आहे का हे खूप महत्त्वाचे आहे आता तुम्ही म्हणताल सर सॉफ्टवेअर लावला आहे पण चुका होतातच तर हो चुका होणारच पण जसे सीसीटीव्ही लावल्या वरती आणि आमच्या इथे सीसीटीव्ही आहेत बर का असा बोर्ड लावल्यावर ती चोरीचं प्रमाण थोडे कमी होऊ शकते तसेच ऑनलाईन सॉफ्टवेअर ठेवल्याने आपल्याला घरून सुद्धा नक्की आज काय झाले हे आपल्याला बघता येते यालाच म्हणतात ऑटो पायलेट मोड..

समजा तुमचा दुकाने व्यवसाय असला तर ग्राहकाला आल्यापासून जाईपर्यंत कशा प्रकारची सेवा द्यायची आहे याचे संपूर्ण ट्रेनिंग आपल्या कर्मचाऱ्यांना देत राहणे आणि ते काम ते व्यवस्थित करत आहेत का हे बघत राहणे हा जॉब तुमचा असायला हवा म्हणजे माझ्यासारखं माझा कर्मचारी काम करत नाही ही तक्रार तुमची कमी होईल आणि जसं तुम्ही काम करता तसेच चांगले कर्मचारी शोधण्याचं कौशल्य तुम्हाला आत्मसात केलं की तुमचा हाही प्रॉब्लेम सॉल होईल..

स्वतः दुकानदाराने माल खरेदी वरती लक्ष ठेवावे माल विक्री वरती फारसा फोकस करण्याची आवश्यकता नसते असं माझं वैयक्तिक मत आहे कारण तुम्ही स्वतः जर बाहेर पडू शकलात मन मोकळेपणाने मार्केटचा अभ्यास करू शकलो तर जगात काय सुरू आहे याचा तुम्हाला अंदाज येईल आणि त्यानुसार तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये तसे बदल करता येतील पण सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर तुम्ही तुमच्याच दुकानात अडकून पडला तर तुम्ही तुमचा व्यवसाय वाढू शकणार नाही

हा विषय खूप मोठा आहे पण तुम्हाला आवडतो ना जर आवडेल तर या आणि यासारख्या असंख्य ट्रिक आणि टेक्निक ब्लॉग च्या माध्यमातून मला तुमच्या सोबत शेअर करायला आवडेल

कमेंट करून नक्की कळवा

अमित मखरे

फक्त विचार केल्याने व्यवसाय वाढत नाही Act करा..

December 1, 2022

0 responses on "व्यापारी ते उद्योजक एक नवा प्रवास"

Leave a Message

All Right Reserved.