विक्री वाढ व्यवस्थापन

Sales Growth Management – 

“कल्पना सत्यात उतरविण्यासाठी स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा”

“व्यवसाय विकास म्हणजेच विक्री वाढ व्यवस्थापन नफाच नाही” पण त्यासाठी नेमक करायचे काय? हा प्रश्न सगळ्यांना पडत असेल तर आपल्या व्यवसायातील विक्री सुधारण्यासाठी ग्राहकांवर लक्ष केंद्रित करा आणि नाफ्याऐवजी विक्रीच्या कामगिरीत वाढ करा. कोणताही विक्री तज्ञ आपल्याला हाच पहिला सल्ला देईल. आपण विक्रीला चालना देऊ इच्छित असाल तर ते कसे करायचे याची माहिती काही सोप्प्या पायऱ्यात देत आहोत.

विद्यमान ग्राहकांवर लक्ष केंद्रित करा (Focus on the existing customer)

आपण विक्री सुधारित करू इच्छित असल्यास, आपण नवीन ग्राहकांना आकर्षित करण्याबरोबर आपल्या विद्यमान ग्राहकांकडेही आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे तसेच त्यांनी आपली उत्पादने किंवा सेवा पुन्हा विकत घेण्याचा प्रयत्न केला आहे की नाही याचे विश्लेषण केले पाहिजे . विद्यमान ग्राहकांकडेही आपण लक्ष केंद्रित केल पाहिजे ते खरेदीदार कसे टिकवायचे याकडे लक्ष दिले पाहिजे. लीडब्रिज पार्टनर्सच्या विक्री आणि विपणन व्यावसायिकांच्या मते, “एकूण अनोळखी व्यक्तींऐवजी आपण आधीपासून विद्यमान ग्राहकांमध्ये रुपांतरीत केलेल्या ग्राहकांकडून सर्वोत्तम विक्रीची संभाव्यता आहे”.

जर आपण आपल्या सिद्ध ग्राहकांवर लक्ष केंद्रित केले तर आपण आपली विक्री वाढवू शकतो. त्यामुळे विपणनाचा निश्चितच विक्रीवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो म्हणून आपण नवीन ग्राहकांवर लक्ष देताना नेहमी लक्षात ठेवा, आपण आपले विद्यमान ग्राहक विसरत तर नाही.

 स्पर्धकांबद्दल जाणून घ्या ( Learn about competitors )

प्रतिस्पर्धी काय ऑफर करतात याकडे लक्ष दिले पाहिजे ते काय करतायेत याकडे लक्ष दिले आणि त्यांची कमजोरी जाणून घेऊन आपण त्यावर काम केले तर आपल्या विक्रीवर नक्कीच  सकारात्मक परिणाम होईल.

 उदाहरणार्थ: सगळ्यांकडे पहिले Idea , Airtel असे वेगवेगळे मोबाईल कार्ड होते पण त्यांचे Recharge pack थोडे सामान्य लोकांना महाग पडत होते. याच कमजोरीचा फायदा उठवून jio कंपनीने त्यांना स्वस्तातले किंवा मोफत  pack उपलब्ध करून दिले आणि त्यांचे नेटवर्किंग वाढवले  त्यामुळे jio कंपनीची जास्त विक्री झाली.

 नाविन्य आणि अद्वितीय उत्पादने  ( Innovation and unique product )

कोणत्याही ग्राहकाने आपल उत्पादन एकदाच घेऊन सोडलं नाही पाहिजे याकडे लक्ष दिले पाहिजे. ग्राहक हा आपल्या उत्पादनापासून पूर्णपणे समाधानी असावा. आपले उत्पादन एवढे भक्कम , दर्जेदार आणि नाविन्यपूर्ण बनवा कि  ते कोणतीही बाजारपेठ सहज ओलांडू शकेल.

ग्राहक सेवा दृष्टीकोन तयार करा (Build a customer service approach)

आपण ऑफर करत असलेल्या विविध उत्पादने आणि सेवांमध्ये नवीन  ग्राहकांना प्रवेश मिळवून देण्यासाठी व्यापक संशोधन केंद्र आणि ग्राहक सेवा तयार करणे  हा एक चांगला मार्ग आहे. तसेच ग्राहक जर ग्राहक सेवामध्ये आले तर त्यांना चांगली वागणूक आणि त्यांचे असणारे उत्पादना संबंधित प्रश्न सोडवले पाहिजे. याव्यतिरिक्त, आपण आपल्या ब्रांन्डचे परीक्षण केले पाहिजे. आणि तक्रारी असल्यास वेळेवर त्या समस्यांचे निराकरण केले पाहिजे.

 ग्राहक संबंध (Customer relation)

विक्री वाढविण्यासाठी एक मार्ग म्हणजे ग्राहकांशी संबंध वाढविणे आणि जुन्या ग्राहकांसोबत जास्तीत जास्त नवीन ग्राहक वाढविणे म्हणजे आपली विक्री वाढेल. तसेच आपल्या व्यवसायात आलेल्यांना देखरेखीसाठी खास आणि कौतुकपूर्ण मार्गाने ग्राहकांशी कसे वागता येईल ते कर्मचार्यांना शिकवले पाहिजे.

 जाहिरात (Promotion)

जाहिराती आणि विपणन ग्राहकांना बाजारात उपलब्ध उत्पादने किंवा सेवा यांचे अस्तित्व मिळवून देतात. जाहिरात अधिक ग्राहकांना आकर्षित करू शकतात तसेच जर त्यामध्ये आपण काही सूट दिली तर ती अधिक फायदेशीर ठरते.

विश्वासार्ह उत्पादने द्या ( Provide credible product )

विश्वासार्ह ही मुख्य कार्यांपैकी एक आहे. जी आपल्या उत्पादनांवर आणि सेवांद्वारे ग्राहकांना विश्वास ठेवायला मदत करते. आपल्या विक्रीत आपली विश्वासार्हता वाढविण्यासाठी जाहिरातींसारख्या तंत्राचा वापर करा. उदाहरणार्थ : ग्राहकांना आपल्या उत्पादनांवर विश्वास वाढविण्यासाठी प्रशस्तीपत्रे  (समजा कोणते खाण्याचे उत्पादन तुम्ही उत्पादित करत असाल तर त्याचे योग्य असलेले गव्हरमेंटचे प्रशस्तीपत्रक दाखवा).

आशा करते ही माहिती तुम्हाला आणि तुमच्या व्यवसायाच्या विक्री वाढ व्यवस्थापन नक्कीच मदत करेल.अशाच व्यवसायसंबंधी माहितीसाठी चावडीला भेट देत राहा.

-सुरेखा पवार.

“व्यावसायिक ज्ञानाचा पाया भक्कम करा आणि स्वतःचा विकास घडवा.”
Sales Growth Management

Stay Updated…
Other Blogs
Follow Us On Facebook And Instagram
For More Information Please Call Us On 7272971971

 

 

June 10, 2021

0 responses on "विक्री वाढ व्यवस्थापन"

Leave a Message

All Right Reserved.