पोल्ट्री फार्म मधून कमवतात वर्षाकाठी ४ लाख उत्पन्न

पोल्ट्री फार्म – Poultry Farm

नगर जिल्ह्यतील अगदी डोंगराळ भागातील गुंडेगावचा राहणारा मी एक माजी सैनिक. २०१२ च्या १ ऑगस्ट ला मी सेवानिवृत्त झालो. आणि दुसऱ्यादिवशी मखरे साहेबाना अहमदनगर येथील चावडी ऑफिस जाऊन भेटलो. एकदा सुट्टी ला घरी आल्यानंतर गावातल्या शेतकार्याकडून मला चावडी विषयी माहिती मिळाली होतीच. सरांशी चर्चा करून एक लक्ष्यात आले कि फक्त शेती करून चालणार नाही. काहीतरी शेती पूरक व्यवसाय केला पाहिजे.

अश्या वेळी साहेबांनी कुकुटपालन (पोल्ट्री फार्म) विषयी माहिती दिली. मग काय मनाशी एक गाठ बांधली कि शेतीपूरक व्यवसाय करायचा तर कुकुटपालनच करायचा. मग माहिती गोळा करायला सुरवात केली. सेन्ट्रल बँकेमध्ये कर्ज प्रकरण केले व ५ लाख कर्ज मिळवले. अश्या प्रकारे ३५०० पक्षी क्षमतेच्या शेडने मी कुकुटपालनाची सुरवात केली. अश्यातच २०१५ मध्ये सप्टेबर महिन्यात २५% सबसिडी हि मिळाली. सध्या माझ्याकडे ३५०० पक्षी क्षमतेचे दोन शेड आहेत..एका खाजगी कंपनी बरोबर कंत्राट केले आहे.ते पक्षी देतात खाद्य मेडिसिन देतात आणि तयार झालेला पक्षी वजनावर घेवून जातात . त्यातून मला वर्षा काठी ४ लाखाचा नफा होतो.

योग्य व्यवस्थापन हा “पोल्ट्रीचा पाया

पोल्ट्रीतील व्यवस्थापनाबाबत श्री. रतन हराळ  म्हणाले, की एका शेडमध्ये वर्षातून पाच ते सहा  बॅचेस निघतात. पक्षी जन्मल्यानंतर काही तासांत शेडमध्ये येतो. कंपनीच्या मागणीप्रमाणे जास्तीत जास्त वजनाचा व उच्च गुणवत्तेचा पक्षी निर्माण करणे, मरतूक कमी ठेवण्याचेही दडपण असते. काटेकोर व्यवस्थापन केल्यासच पक्ष्यांचे अपेक्षित वजन व गुणवत्ता मिळते. आम्ही घरचे लोक पोल्ट्री फार्म च्या व्यवस्थापनामध्ये असतो. नियोजनामध्ये मी स्वतः, लक्ष देतो. पोल्ट्रीमध्ये वेळेचे गणित अचूकपणे सांभाळावे लागते. मजुरांची टंचाई, वाढते भारनियमन, काही वेळा महत्त्वाच्या औषधांची खरेदी करावी लागते. त्याच बरोबरीने अचानक येणाऱ्या समस्या पोल्ट्री व्यवसायाला भेडसावतात. कामाची वेळ चुकल्यास नुकसान होते.

 

नफा वाढीवर लक्ष

प्रति पक्ष्यामागे औषधे, मजुरी, लसीकरण, बॅंकेचे व्याज, इतर व्यवस्थापन असा एकत्रित खर्च चार –सहा रुपये येतो. प्रति पक्षी 10 रुपये उत्पन्न मिळते म्हणजे प्रत्येक पक्ष्यामागे सरासरी चार रुपये निव्वळ उत्पन्न मिळते. बॅच प्रमाणे हे उत्पन्न कमी जास्त होते.

 

यशस्वी  पोल्ट्री फार्म साठी महत्त्वाची सूत्रे

उत्पादन खर्च कमी ठेवला.

पक्ष्यांच्या वजनात सातत्य.

मरतुकीचे प्रमाण तीन टक्‍क्‍यांच्या वर नाही.

पक्ष्यांच्या आहार आणि आरोग्यावर लक्ष ठेवले.

कुटुंबाच्या सहभागातून मजूरटंचाईवर मात.

शेडमधील व्यवस्थापन चांगले ठेवले.

चावडी चे Affiliate बना,सोशल मिडिया वर मेसेज शेयर करा,अधिकचे उत्पन्न कमवा.अधिक माहितीसाठी या लिंक वर क्लिक करा.

चावडी ने केले सहकार्य ::

मखरे पोल्ट्री फार्म साहेबांनी आम्हाला फार मदत केली अगदी माझ्या दुकानाचे उद्घाटन सुद्धा मी या भल्या माणसाच्या हातून केले आहे .बर फक्त माझे नाही आमच्या परिसरातील ५० पेक्षा जास्त लोकांचे प्रकल्प त्यांनी तयार करून दिले आहेत..त्यांची आहे तेवढी फी सोडून कुणाकडून चहा ची सुद्धा अपेक्षा या माणसाची नसते. उलट आम्हाला नाबार्ड ची सबसिडी मिळाल्यावर मी स्वत पेढे घेवून त्यांच्याकडे गेलो होतो ते बाहेर असल्याने भेट झाली नाही.पण नंतर फोन वरून त्यांनी आपुलकीने चौकशी केली. शेतकऱ्यांना सल्ला देण्यात आणि सहकार्य करण्यात या माणसाचा हात कुणीच धरू शकत नाही.

नवीन शेतकऱ्यासाठी एक मोलाचा सल्ला कि….. कुकुटपालन व्यवसायात यायचे असेल तर विजेची आणि पाण्याची सुविधा तर उत्तम प्रकारे असुद्याच…पण स्वतः कष्ठ करण्याची पण तयारी असुद्या……
रतन हराळ गुंडेगाव ता.जिल्हा अहमदनगर

Stay Updated…
Other Blogs
Follow Us On Facebook And Instagram
For More Information Please Call Us On 7272971971

2 responses on "पोल्ट्री फार्म मधून कमवतात वर्षाकाठी ४ लाख उत्पन्न"

  1. Give more information about vaxenation

Leave a Message

All Right Reserved.