व्यवसायाचे सकारात्मक व नकारात्मक पैलू

Positive And Negative Aspects Of Business

“कल्पना सत्यात उतरविण्यासाठी स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा”

कोणताही व्यवसाय सुरू करताना त्या व्यवसायाचे दोन पैलू हे असतातच एक सकारात्मक आणि दुसरा नकारात्मक , व्यवसाय करणे कठीण नसते मात्र तेवढे सोप्पे ही नसते. व्यवसाय आपण कोणत्या दृष्टिकोणाने करतोय आणि कशासाठी करतोय हे जाणून घेणं खूप महत्त्वाचे असते, कारण आपली उद्दिष्टे ठरली नसतील तर त्याचे दुष्परिणाम खूप भयानक होत असतात आणि मग ते आपल्याला आयुष्यभर भोगावे लागतात.त्यामुळे व्यवसाय सुरू करण्यापूर्वी सकारत्मकपणे आपल्या व्यवसायाची उद्दिष्टे ठरवून त्यावर काम केले पाहिजे.

 व्यवसायात सकारात्मक नव्हे तर नकारात्मक पैलू ही खुप काही शिकवतात, नकारात्मक पैलूंवर नीट लक्ष देऊन त्याचा अभ्यास केला आणि चुका सु्धारल्या  तर आपला व्यवसाय व्यवस्थितरित्या चालतो.

व्यवसायाचे सकारात्मक पैलू म्हणजे नेमकी काय ?

 “ज्या गोष्टींनी आपल्या व्यवसायाला चालना भेटते ज्याने आपला व्यवसाय व्यवस्थित चालतो ते पैलू होय ”

१)”स्व” बळावर व्यवसाय करणे –

‌       व्यवसायात पैश्याची गुंतवणूक आपण आपल्या परिस्थितीतीनुसार करतो, व्यवसाय हा आपलाच असतो आपणच त्याचे मालक असतो त्यामुळे आपण जेवढे काम करणार तेवढा आपल्याला नफा भेटणार आणि तेवढे आपले व्यवसायाचे नेटवर्क वाढणार. नेटवर्क वाढल्याने आपल्याला अनेक फायदे होणार, आपण आपल्या व्यवसायच्या शाखा(Franchise) काढू शकतो तसेच आपण आपला व्यवसाय आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थापित करू शकतो. आपला “स्वतःचा” व्यवसाय असल्यामुळे आपण व्यवस्थितरित्या जास्तीत जास्त काम करून आणि वेळ देऊन आपल्या व्यवसायाचे विपणन करून त्या व्यवसायाला विविध प्रकारे वाढवण्याचा प्रयत्न करू शकतो, त्यासाठी सर्वप्रथम बाजारपेठेत आपल्या व्यवसायाची  उत्कृष्ट प्रतिमा म्हणजेच ब्रँड निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे.आपल्या व्यवसायची उत्तम प्रतिमा बनवण्यासाठी जाणीवपूर्वक विशेष प्रयत्न केले पाहिजे आणि ते यशस्वी केले पाहिजे, सर्वप्रथम ग्राहकाच्या भावनिक प्रतिमेला प्राधान्य देऊन उत्पादनाची वेगळी आणि विश्वसनीय प्रतिमा निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत.

२) संकल्पना –

व्यवसाय व व्यवसायाची संकल्पना आपली स्वतःची असल्या कारणामुळे आपण आपल्या डोक्यात असलेल्या विविध संकल्पनांचा वापर करून आपण आपला व्यवसाय करू शकतो.विविध आकर्षित करणाऱ्या गोष्टीचा वापर करून व्यवसाय वाढवू शकतो, तसेच  ग्राहकांच्या दृष्टीने विविध उपक्रम त्याच्यासाठी राबवून त्यांना आपल्या व्यवसायातील उद्दिष्टे नेमकी काय आहेत ते विविध संदेशातून देऊ शकतो. अश्या विविध संकल्पानाचा वापर करून त्या राबवून आपण आपल्या व्यवसायाचे नेटवर्क वाढवू शकतो.योग्य विचारांच्या आणि यशस्वी लोकांच्या संपर्कात राहुन नेहमी प्रेरणा देणाऱ्या आणि आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे माणसे जोडुन आणि त्याच्या सानिध्यात राहुन त्यांच्याकडून व्यवसायाच्या अडचणी सोडवू शकतो. ज्यांना तुमचे मार्गदर्शन हवे आहे अश्या लोकांना वेळ द्या आपण एकमेकांना घेऊन पुढे चालणाऱ्या धोरणाचा अवलंब करा, त्यातून आपल्याला नवीन संधी शोधण्यास मदत  होते.

३) व्यवसाय वाढ –

                     व्यवसाय वाढीनुसार आपल्या उत्पन्नाची वाढ होत असते. जेवढा व्यवसाय वाढेल तेवढी आपल्या उत्पनाची वाढ होत असते.त्यासाठी आपण सतत काम करून आपल्या व्यवसाय वाढीवर लक्ष ठेवून उत्पनाची वाढ केली पाहिजे. जेणेकरून आपल्याला व्यवसाय वाढवता येईल.तसेच स्पष्ट उद्दिष्टे ठेवून भक्कम विचारधारा ठेवून आपण प्रतिस्पर्धीना व्यवस्थितरित्या उत्तर देऊ शकतो.तसेच लोकांच्या संपर्कात राहून ग्राहकांपर्यत पोहचवणे, चांगले संबंध बनवून ठेवने ,त्यामुळे एक व्यावहारिक समाधान प्राप्त होते.

आपण नेहमीच ऐकतो किंवा म्हणतो ही “शून्यातून विश्व निर्माण होत” याचाच अर्थ  असा आहे कि “आपण ते करूच शकतो” , काही रहस्य असे सांगून जातात जर तुम्ही सकारात्मकपणे व्यवसायाची सुरुवात केली तर तुम्ही नक्कीच व्यवसाय करून उत्पनाची वाढ करू शकता आणि व्यवसाय वाढवु शकता. सकारात्मकच काय तर दृष्टिकोन जर बदलून आपण नकारात्मक गोष्टीचा सकारात्मक विचारांनी  अभ्यास केला तर  आपण आपल्या व्यवसायात वाढ करू शकतो.

नकारात्मक पैलू म्हणजे नेमकी काय ?

तर अश्या गोष्टी “ज्यामुळे व्यवसायात अचानक तुटवडा जाणवतो किंवा त्या गोष्टींमुळे आपल्या व्यवसायच्या उत्पनात घट होतो”.

१) तेजी-मंदीचा फटका-

                        तेजी-मंदीचा फटका म्हणजे नेमकी काय तर व्यवसायासाठी व्यापक भांडवल नसणे. गुंतवणुकीतून अपेक्षित उत्पन्न न येणे, व्यवसायाची माहिती लोकांपर्यंत न पोहचणे, लोकांशी व्यवहाराबाबत चांगले संबंध न ठेवणे, अश्या अनेक गोष्टींमुळे व्यवसायात मंदीचा फटका बसतो.

२) नैसर्गिक आपत्तीचा परिणाम –

                  विकसित व्यवसाय असो वा विकसनशील व्यवसाय,नैसर्गिक आपत्ती कोसळते तेव्हा त्या व्यवसायाचे नुकसान हे होतेच आणि व्यवसायाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम हा होतोच. वातावरणीय बदलांनुसार महापूर,दुष्काळ,भूकंप,चक्रीवादळ इ. नैसर्गिक आपत्तीमुळे व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता असते.छोट्या,मोठ्या व्यवसायावर आपत्तीमुळे जास्त प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते.उदा. छोटे दुकानदार ,मच्छिमार,  लहान लहान कारागीर अशांचे रोजगार अश्या आपत्तीमध्ये बुडतात. त्यामुळे व्यवसायात ही नैसर्गिकरित्या मंदी उद्भावते.

३) भांडवल आणि मनुष्यबळाचा तुडवडा –

              व्यवसाय करताना पूरक असे मनुष्यबळ नसल्यास व्यवसायात ताण तणाव निर्माण होतो,भांडवल आणि मनुष्यबळ यांचा पूरक पुरवठा पुरेसा प्रमाणात नसेल तर त्यामुळे उत्पनाचे स्रोत कमी होते आणि भांडवलाची आणि मनुष्यबळाची देवाण-घेवाण सकुंचन पावते.

आज  तंत्रज्ञानाच्या युगात व्यवसायाचे सकारात्मक व नकारात्मक पैलू समजावून घेऊन उद्योगात यशस्वी प्रगती साधता येते.

                                         – मधुरा जोशी

“व्यावसायिक ज्ञानाचा पाया भक्कम करा आणि स्वतःचा विकास घडवा.”

Stay Updated…
Other Blogs
Follow Us On Facebook And Instagram
For More Information Please Call Us On 7272971971

Share this:
June 10, 2021

0 responses on "व्यवसायाचे सकारात्मक व नकारात्मक पैलू"

    Leave a Message

    All Right Reserved.