डाळिंब प्रक्रिया उद्योग

एका बाजूला दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत असताना मात्र दुसरीकडे एका बळीराजाच्या मुलाने आपल्या कष्टातून एक आश्वासक वातावरण तयार केले आहे.
या शेतकऱ्याच्या मुलाने निसर्गाच्या प्रतिकूल आव्हानांना तोंड देत स्वताचा प्रक्रिया प्रकल्प सुरु केला आहे. हि गोष्ट आहे, सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील ‘निंबवडी’ या गावातील संदीप संभाजी पिंजारी या तरूणाची. लहानपणापासून घरची नाजूक परिस्थिती असल्यामुळे कसेबसे आपले M.B.A चे शिक्षण पूर्ण केले.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर संदीपने काही ठिकाणी नोकरी केली. मात्र संदीपचे नोकरीत मन रमत नव्हते.* घरी जेमतेम ५ एकर शेती मध्ये चांगल्या प्रकारची डाळिंबाची बाग होती. मात्र त्यातून हवे तेवढे उत्पन्न मिळत नव्हते. योग्य बाजारभाव नसल्याने डाळिंबाला चांगला भाव मिळत नव्हता. खर्च वजा करता त्यातून अत्यंत कमी उत्पन्न मिळत होते.
काही दिवस नोकरी करून संदीपने नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला. घरी आल्यावर अनेक दिवस विचार करत असताना त्यांच्या डोक्यात एक विचार आला, घरी डाळिंबाचे चांगले उत्पादन होते. त्यापासून आपल्याला कोणता व्यवसाय करता येऊ शकतो. याचा विचार संदीप करू लागला.
अनेक ठिकाणी डाळिंब प्रक्रिया उद्योग तयार करता येणाऱ्या उद्योगांची माहिती संदीप शोधत होता. शोध घेत असताना चावडी या संस्थेची माहिती आपल्या काही शेतकरी मित्रांकडून मिळाली.
चावडी संस्थेमार्फत डाळिंब प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण घेत त्यातील काढणी पश्चात तंत्रज्ञान, कच्चा माला उपलब्धता, कॉलीटी कंट्रोल, प्रक्रिया पध्दती, मशिनरी पुरवठा, पॅकेजिंग व लेबलिंग, परवाने विक्री पध्दती आदी सह विविध योजनेची माहिती घेवून प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर हा प्रक्रिया उद्योग कशा पध्दतीने केला जाते. याबाबत विविध ठिकाणी अजून माहिती गोळा केली .
त्यात काही उद्योजकांनी हा चांगला उद्योग आहे आणि भविष्यात संधी सुद्धा अधिक असतील असतील असे सांगतिले..मार्केट मध्ये डाळिंब प्रोडक्ट्स उपलब्ध असून हातोहात विकले जात आहेत हे प्रत्यक्षात बघितल्यावर आपण ही असाच उद्योग उभारायचा असा संकल्प केला. त्यातूनच संदीपला प्रेरणा मिळाली असे संदीपने सांगितले.
चावडी चे Affiliate बना,सोशल मिडिया वर मेसेज शेयर करा,अधिकचे उत्पन्न कमवा.अधिक माहितीसाठी या लिंक वर क्लिक करा.

*जागेची निवड :-*

संदीपने प्रक्रिया उद्योगासाठी जागेची निवड करताना, ज्या ठिकाणी वाहतूक, पाणी, वीज इत्यादीची उपलब्धता असल्याची खात्री केली. या सोबत त्याने जागेची निवड करताना एक चांगली काळजी घेतली. जेथे कच्चा माल सहज आणि मोठ्या प्रमाणात होईल आणि शिल्लक राहणाऱ्या टाकाऊ मालाची विल्हेवाट लावणे शक्य होण्यासाठी त्यांनी आपली रोड जवळील जागेची निवड संदीपने केली.

*डळिंबाची निवड :-*

चावडी च्या प्रशिक्षणात सांगितल्या प्रमाणे संदीपने फळाची निवड कशी करावी, फळे निवडताना आंबट चव, मोठा प्रकार रसाळ, गडल लाल रंगाचे दाणे व टॅनीनचे अत्यल्प प्रमाण (०.२५ टक्के पेक्षा कमी) इ. बाबी लक्षात ठेवून विविध डाळिंब निवड संदीपने केली.

*उद्योग उभारणी :-*

चावडी मधून सर्व माहिती प्राप्त झाल्यावर संदीपने डाळिंब प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी प्रयत्न करू लागला. प्रथम घरच्यांनी या प्रक्रिया उद्योगास विरोध दर्शविला. काही दिवसानंतर संदीपची जिद्द व चिकाटी पाहून घरच्यांनी या उद्योगासाठी पाठिंबा दिला. विविध यंत्रसामग्रीची माहिती घेऊन त्यांने यंत्रे सामग्री खरेदी केली. तसेच प्रथम कमी प्रमाणात डाळिंब ज्युसची निर्मित करून उद्योगास सुरुवात केली. काही कालावधी नंतर त्यांच्या उत्पादनाला मोठ्या प्रमाणात मागणी वाढू लागली. म्हणून त्यांनी उद्योग स्वरूप तो हळूहळू त्यांचा विस्तार करू लागला

*कुटुंबाची साथ :-*

डाळिंब प्रक्रिया उद्योगामध्ये संदीपच्या कुटुंबाचा मोठा हातभार त्याला लाभला आहे. संदीपची आई, वडील, भाऊ यांनी त्यांच्या उद्योगासाठी समर्थ साथ देत आहेत. या प्रक्रिया उद्योगात सर्व घरची मंडळी असल्यामुळे या उद्योगा मधील कष्ट हालके होत आहे.

*आर्थिक नियोजन :-*

व्यवसायातील नफा वाढवायाचा तर आर्थिक नियोजन चांगले जमले पाहिजे. हे संदीपने ओळखले. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात डाळिंबचे उत्पादन होत असल्यामुळे डाळिंबावर प्रक्रिया युक्त पॅकिग ज्युस तयार करण्याचे ठरविले. डाळिंबावर प्रक्रिया करुन त्यापासून आरोग्यावर्धक ज्युस तयार करू लागला. त्याच्या या आरोग्यासाठी चांगले असणारे डाळिंब ज्युसला विविध जिल्ह्यातून चांगली मागणी येत असल्यामुळे संदीपला त्यांचा चांगला फायदा होत आहे. त्यातून चांगला नफाही तो कमवित आहे.

*डाळिंब ज्युसचे पॅकेजिंग :-*

डाळिंबाचा ज्युस तयार झाल्यावर त्यांचे पॅकेंजिंग कसे करावे ? हा एक प्रश्न संदीपला मोठ्या प्रमाणात सतावत होता. तसेच M.B.A चे शिक्षण घेतले असल्यामुळे त्याला पॅकेजिंगचे बाबत थोडीफार माहिती होती. त्याने विविध फळांच्या ज्युसचे पॅकिंग कसे असावे ? या बाबत संदीपने अभ्यास केला ? तसेच आपण तयार केलेल्या डाळिंब ज्युसचे पॅकिंग कसे करायला हवे ? ते कशा प्रकारे आकर्षित करता येईल. यांचा अभ्यास त्यांने केला. त्यानुसार त्याने आकर्षक व सुदर अशी पॅकिंग केली.
pomegranate processing packing| chawadi
*मार्केटिंग :-* डाळिंबाचा ज्युस तयार झाल्यावर त्याचे मार्केटिंग कसे करावे ? हा संदीप पुढे प्रश्न निर्माण झाला. येथे त्याच्या शिक्षणाचा फायदा संदीपला झाला. त्याने कमी खर्चात चांगले मार्केटिंग केले. सध्या सांगली आणि आसपास च्या भागात विविध ठिकाणी जाऊन आपल्या उत्पादनाची माहिती सांगून उत्पादन विक्रीसाठी ठेवले. तसेच विविध दुकान, हॉटेल, रेस्टोरेंट आदी सह विविध ठिकाणी डाळिंब ज्युसला मोठ्या प्रमाणात आर्डर संदीपला मिळू लागली. तसेच त्याने बाजारपेठे मध्ये आपल्या डाळिंब ज्युसची एक वेगळी ओळख निर्माण केली. .
*इतर शेतकऱ्यांच्या मुलांना करून घेणार सहभागी..* संदीप ने सांगितले कि , त्याने आता इतर शेतकऱ्यांच्या मुलांना सुद्धा यात सहभागी करण्याचे ठरविले असून त्यांना वितरक म्हणून काम करण्याची संधी देणार आहे. त्याचे मार्गदर्शन सुद्धा तो स्वत करणार आहे.

*संदीप पिंजारी* *7588167432* *

Stay Updated…
Other Blogs
Follow Us On Facebook And Instagram
For More Information Please Call Us On 7272971971

Share this:
March 30, 2021

1 responses on "डाळिंब प्रक्रिया उद्योग"

  1. संत्रा जुस बाबत तंत्रज्ञान देणे.

Leave a Message

All Right Reserved.