• No products in the cart.

Pmfme scheme

[google-translator]

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना (PMFME) योजना  सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रमांना समर्थन देते. ही योजना अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने (MoFPI) आत्मनिर्भर भारत अभियानाचा भाग म्हणून सुरू केली आहे.सध्या कार्यरत असलेल्या व नवीन सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांचा विस्तार वाढविण्यासाठी आणि नवे सूक्ष्म अन्न प्रकिया उद्योग सुरु करण्यासाठी हि योजना दिली जाते. 

अनुदान :  प्रकल्प खर्चाच्या ३५% पर्यंत किंवा जास्तीत जास्त १० लाख रुपयांपर्यंत मिळते. 

PMFME Scheme ची उद्दिष्ट्ये

सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना, या उद्योगांमधील वैयक्तिक लाभार्थी, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO), बचत गट (Self Help Groups), सहकारी संस्था यांना कर्ज पुरवठा करणे.

अशा उद्योगांमध्ये पुरवठा साखळी मजबूत करणे.

असंघटित अन्न प्रक्रिया उद्योग नोंदणीकृत करणे.

सार्वजनिक किंवा सामाईक अन्न प्रक्रिया सुविधा निर्माण करणे.

साठवण क्षमता वाढवणे, गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळा उभारणे, पॅकेजिंग सुविधा उभारणे.

अन्न प्रक्रिया क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षण संस्थांचे सक्षमीकरण.

PMFME Scheme साठी पात्रता 

१. वैयक्तिक लाभार्थी

२. सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योजक

३. शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO)

४. बचत गट (Self Help Groups)

५. सहकारी संस्था

६. नवीन अन्न प्रक्रिया सुरु करू इच्छिणारे लाभार्थी.

७. प्रोप्रायटरशिप आणि पार्टनरशिप फर्म

८. लाभार्थीचे कमीत कमी वय १८वर्ष असावे

९. सुरवातीला लाभार्थी किमान आठवी पास असावा असा नियम होता परंतु आता शिक्षणाची कोणतीही अट नाही परंतु लाभार्थ्याला अन्न प्रक्रिया उद्योगाचा अनुभव असावा.

१०. एका कुटुंबातील एक व्यक्ती पात्र

PMFME योजनेअंतर्गत पात्र प्रकल्प (Eligible Projects under PMFME Scheme)

१. नवीन सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग

२. सध्या चालू असणारे सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग

३. प्रकल्पात १० पेक्षा कमी कामगार असावेत

४. प्रकल्पाची मालकी वैयक्तिक, प्रोप्रायटरशिप आणि पार्टनरशिप फर्म असावी.

५. सुरवातीला LLP व Pvt Ltd कंपन्या या योजनेत पात्र नव्हत्या परंतु २०२२ पासून यासुद्धा पात्र आहेत.

६. बिगर सरकारी संस्था (NGO)

PMFME कर्ज रक्कम 

या योजनेअंतर्गत ९०% पर्यंत कर्ज मिळू शकते. परंतु PMFME scheme subsidy अंतर्गत मिळणारे अनुदान प्रकल्प खर्चाच्या ३५% पर्यंत किंवा जास्तीत जास्त १० लाख रुपयांपर्यंत मिळते

म्हणजेच आपण जर ३० लाख रुपयांपर्यंतचा प्रकल्प उभारणार असाल तर आपल्याला ३५% व जास्तीत जास्त १० लाख अनुदान मिळू शकते.

PMFME स्वगुंतवणूक / मार्जिन मनी 

PMFME scheme अंतर्गत कर्जासाठी आपल्याला कमीत कमी १०% स्वगुंतवणुक करणे बंधनकारक आहे.

PMFME व्याजदर 

अन्न प्रक्रिया उद्योगासाठी बँकेमध्ये सरासरी ११% ते ११.५०% व्याजदर आहे. आपण जर आपल्या बँकेला विनंती केली कि आपले कर्ज “कृषी पायाभूत सुविधा उभारणी योजना (PMFME scheme with Agriculture Infrastructure Fund)” या योजनेला लिंक केले आणि आपले कर्ज या योजनेअंतर्गत पात्र झाले तर या योजनेअंतर्गत ९% व्याजदर लागू होतो. त्याउपर ३% व्याज परतावा मिळतो म्हणजेच आपल्याला हे कर्ज ६% व्याजदराने पडेल.

PMFME Scheme Subsidy अनुदान संरचना

या योजनेअंतर्गत प्रकल्प खर्चाच्या ३५% पर्यंत अनुदान मिळते. अनुदानासाठी अर्ज करण्याची सर्व प्रक्रिया ऑनलाईन आहे. PMFME Scheme Subsidy हि क्रेडिट लिंक सबसिडी (Credit Linked Subsidy)आहे म्हणजेच आपली सबसिडी आपल्या कर्ज असलेल्या बँकेला पाठवली जाते व ती सबसिडी आपल्या कर्जाला लिंक केली जाते व ३ वर्षानंतरच आपल्या कर्ज खात्याला जमा होते.

PMFME कर्जाला तारण 

१. प्रकल्पाचे शेड, मशीन, कच्चा माल इ.

२. १० लाखांपर्यंत कोलॅटरल सेक्युरिटीची आवश्यकता नसते, १० लाखांपर्यंतची कर्जे मुद्रा योजनेअंतर्गत वर्गीकृत करून मुद्रा ग्यारंटी फंड अंतर्गत सुरक्षित केली जातात.

३. १० लाखवरच्या कर्जाला मालमत्ता तारण देऊ शकता किंवा CGTMSE तारण योजनेअंतर्गत कव्हर करू शकता.

४. कर्जाला तारण घेण्याच्या संबंधित सर्व निर्णय घेण्याचा अधिकार संबंधित बँकेला असतो.

PMFME परतफेड कालावधी 

1. PMFME Scheme अंतर्गत जास्तीत जास्त १० वर्ष परतफेड कालावधी मिळतो परंतु एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे परतफेड कालावधी हा प्रकल्पातून होणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून असतो त्यामुळे छोट्या प्रकल्पासाठी कदाचित बँक कमी परतडफेड कालावधी सुद्धा देऊ शकते.

2. उद्योगांना त्यांच्या क्षमतेचा वापर करण्यास मदत करते

3. उद्योगांना अपग्रेड आणि नवीन युनिट्स सेट अप करण्यात मदत करते

 

आवश्यक कागदपत्रे:

आधार कार्ड: अर्जदाराचे आणि कुटुंब सदस्यांचे आधार कार्ड.

राशन कार्ड: कुटुंबाचे राशन कार्ड.

जमीन ताब्याची पुरावे: (जर लागू असेल तर) जमीन खरेदीची पावती, ७/१२ उतारा इ.

बँक खाते तपशील: अर्जदाराच्या नावावर असलेल्या बँक खात्याचा पासबुक किंवा स्टेटमेंट.

शैक्षणिक पात्रता: जर लागू असेल तर शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे.

प्रकल्प अहवाल: प्रस्तावित प्रकल्पासाठी तयार केलेला विस्तृत प्रकल्प अहवाल.

बाजारपेठ अभ्यास: प्रस्तावित उत्पादनांच्या बाजारपेठेचा अभ्यास अहवाल.

फोटो: अर्जदाराचा पासपोर्ट साईजचा फोटो.

इतर कागदपत्रे: संबंधित अधिकारी यांच्याकडून सांगितलेली इतर कागदपत्रे.

अर्ज प्रक्रिया:

a) ऑनलाइन अर्ज:

अधिकृत PMFME वेबसाइटला भेट द्या: अधिकृत PMFME वेबसाइटवर प्रवेश करा.

नोंदणी: तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीसह नोंदणी करून खाते तयार करा.

लॉगिन करा आणि अर्ज करा: तुमच्या खात्यात लॉग इन करा आणि सर्व आवश्यक तपशीलांसह ऑनलाइन अर्ज भरा.

दस्तऐवज अपलोड करा: अर्जात नमूद केल्यानुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

अर्ज सबमिट करा: पूर्ण केलेला अर्ज ऑनलाइन सबमिट करा.

b) दस्तऐवज पडताळणी:

अर्ज आणि सहाय्यक दस्तऐवजांचे संबंधित अधिकाऱ्यांकडून पुनरावलोकन आणि पडताळणी केली जाईल.

c) पात्रता मूल्यांकन:

योजनेच्या निकषांवर आधारित तुमच्या अर्जाचे पात्रतेसाठी मूल्यांकन केले जाईल.

d) कर्ज प्रक्रिया:

पात्र असल्यास, तुम्ही सहभागी वित्तीय संस्थेकडून कर्जासाठी अर्ज करू शकता.

कर्ज अर्जावर बँकेच्या मानक प्रक्रियेनुसार प्रक्रिया केली जाईल.

e) अनुदानाचा दावा:

एकदा कर्ज मंजूर झाल्यानंतर आणि त्याचा वापर झाल्यानंतर, तुम्ही योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार क्रेडिट-लिंक्ड भांडवली सबसिडीचा दावा करू शकता.

 

कर्ज अटी:

पात्रता: या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची इच्छा असणारा व्यक्ती, गट किंवा संस्था असू शकते.

प्रकल्प खर्च: प्रकल्प खर्चानुसार कर्ज रक्कम ठरवली जाते.

व्याजदर: कर्जासाठी व्याजदर बँकांच्या नियमांनुसार ठरवला जातो.

परतफेड मुदत: कर्ज परतफेडची मुदत प्रकल्पाच्या आधारावर ठरवली जाते.

तारण: काही प्रकरणांमध्ये तारण मागणी केली जाऊ शकते.

प्रकल्प अहवाल: प्रकल्प अहवालात प्रकल्पाची संपूर्ण माहिती, खर्च, अपेक्षित उत्पन्न इत्यादी गोष्टींचा समावेश असतो.

September 30, 2025

0 responses on "Pmfme scheme"

Leave a Message

All Right Reserved.