पॅकेजिंग हवे गुणवत्तापूर्ण….!

पॅकेजिंग हवे गुणवत्तापूर्ण….!
सध्या बाजारपेठेत विविध प्रकारचा शेतमाल आणि प्रक्रिया पदार्थ आकर्षक पॅकिंगमध्ये आपल्याला दिसतात. एकाच प्रकारचे उत्पादन आपल्याला वेगवेगळ्या पॅकिंगमध्ये दिसते. उत्पादन आणि पॅकिंगची ठेवण पाहून ग्राहक त्याची खरेदी करतो. हा सध्याच्या बाजारपेठेचा ट्रेंड आहे.
पॅकिंगचे प्रकार   :-
१) दूध, फळांचे रस, स्वॅश, पेस्ट, चीज या सारख्या द्रव पदार्थांच्या पॅकिंगसाठी पॉलिबॅग, प्लॅस्टिक कंटेनर, पाउच, डबे, काचेच्या बाटल्यांचा वापर केला जातो.
२) धान्याचे पॅकिंग शक्‍यतो पॉलिबॅगमध्ये केलेले असते. या पॅकिंगमध्ये साठलेला वायू बाहेर पडेल अशा गुणवत्तेच्या पॉलिबॅग वापरल्या जातात.
३) मॉलमध्ये भाजीपाला विक्रीसाठी पाऊच, विणलेल्या पिशव्या वापरल्या जातात. काही देशांत विशिष्ट प्रकारचे बॉक्‍स वापरतात.
४) प्रक्रिया उद्योगामध्ये तयार झालेले पदार्थ बाजारपेठेत पाठविताना पत्र्याचे डबे, पाऊच किंवा काचेच्या बाटल्यात पॅक करतात.
५) शहरी बाजारपेठेत तयार धान्य पिठाची मागणी वाढते आहे. या पिठांच्या पॅकिंगसाठी पेपर बॅग, पाऊच, विणलेल्या पिशव्यांचा वापर केला जातो.
६) फळांच्या विक्रीसाठी प्रामुख्याने पेपर ट्रे, थर्मोफॉर्मड कंटेनर, सीएफबी बॉक्‍स, प्लॅस्टिक कंटेनरचा वापर होतो.
७) दूर अंतरावरच्या बाजारपेठेत फुले पाठविण्यासाठी “अपेडा’ने शिफारशीत केलेले सीएफबी बॉक्‍स वापरणे फायदेशीर ठरते. यामुळे फुलांची गुणवत्ता टिकून राहते. याचबरोबरीने कागद, प्लॅस्टिक कागदामध्येही फुले गुंडाळली जातात. निर्यातीसाठी फुले पाठविताना थर्मोफॉर्म कंटेनरचा वापर फायदेशीर ठरतो.
पॅकिंग करताना महत्त्वाचे मुद्दे  :
१) मार्केटची निवड –
आपले उत्पादन कोठे विकणार आहोत, हे प्रथम लक्षात घ्यावे. त्यानुसार पॅकिंग कसे करायचे याचे नियोजन करता येते. याचबरोबरीने ग्राहकाकडून एका वेळी किती प्रमाणात संबंधित पदार्थाची मागणी होते, हे देखील लक्षात घेऊन पॅकिंगचा आकार ठरवावा लागतो. पदार्थ सुरक्षित राहण्याबरोबरीने ग्राहकांना आकर्षित करणारे पॅकिंग असावे. त्यामुळे हाताळणी आणि वितरण सोपे जाते.
२) वाहतूक – पॅकेजिंगसाठी घटक निवडताना वाहतुक कशा पद्धतीने करणार आहोत हे लक्षात घेणे आवश्‍यक आहे. वाहतुकीच्यामध्ये पॅकिंग केलेले बॉक्‍स पुन्हा दुसऱ्या एखाद्या वाहनामध्ये भरणार असाल, तर याचाही विचार पॅकिंग करताना करावा. योग्य पॅकेजिंग घटक निवडल्याने उत्पादनाचे नुकसान होत नाही. योग्य ठिकाणी संबंधित माल चांगल्या स्थितीमध्ये पोचतो.
३) बऱ्याच ठिकाणी चांगल्या दर्जाच्या साठवण सुविधा उपलब्ध नाही. उत्पादनाच्या ठिकाणी शीतगृह, गोदामे असायला हवीत. तरच शेतमालाची गुणवत्ता टिकवून ठेवता येते. शेतमालाचे पॅकिंग करण्यासाठी गोदाम उपयोगी ठरतात.
४) आपण केलेले उत्पादन कशा पद्धतीने आणि किती टप्प्यामध्ये वितरित केले जाणार आहे हे माहिती करून त्यानुसार पॅकेजिंग करावे लागते. त्यामुळे वाहतूक, साठवण आणि वितरणामध्ये होणारे नुकसान टाळता येते.
५) आपले उत्पादन खरेदीदाराच्या डोळ्यांसमोर राहण्यासाठी विक्रीच्या ठिकाणी सातत्याने असावे लागते. त्यासाठी आकर्षक पॅकिंगबरोबरीने संबंधित घटकांची माहिती छापलेली असावी. त्यामुळे ग्राहकाला उत्पादनाची गुणवत्ता समजते.
उत्पादनाची गरज :-
१) प्रत्येक उत्पादनाचा नैसर्गिक गुणधर्म असतो. काही उत्पादने हवेतील ओलावा शोषून घेतात. काही उत्पादनांवर वातावरणातील वायूचा परिणाम होतो. त्यामुळे उत्पादनाचा नैसर्गिक गुणधर्म ठेवण लक्षात घेऊन पॅकेजिंगसाठी योग्य घटक वापरावे लागतात.
२) बाजारपेठेत आपल्या उत्पादनासारखी बरीच उत्पादने विक्रीस आलेली असतात. तेव्हा ग्राहकाचे लक्ष वेधून घेईल अशा पद्धतीचे पॅकिंग करावे.
३) उत्पादनाची साठवणूक क्षमता चांगली असेल तर विक्रीच्यादृष्टीने फायदेशीर ठरते. योग्य प्रकारचे पॅकिंग असले तर संबंधित उत्पादन हे आर्द्रता, हवेतील वायुंपासून संरक्षित राहते. त्याचा फायदा उत्पादकाला मिळतो.
४) सरकारी नियमानुसारच उत्पादनाचे पॅकिंग आणि ब्रॅडिंग करावे. उत्पादनाचे वजन, त्याची गुणवत्ता ही नियमानुसारच असायला हवी. ते पॅकिंगवर नमूद केलेले असावे.
पॅकिंगची गुणवत्ता :-
१) उत्पादनाच्या विक्रीमध्ये पॅकिंग हा महत्त्वाचा घटक आहे. चांगल्या दर्जाचे पॅकिंग, देखणेपणामुळे ग्राहकाचे लक्ष वेधले जाते. पॅकिंगसाठी वापरलेल्या घटकाची गुणवत्ता चांगली असावी. त्यावर योग्य पद्धतीने छपाई करता आली पाहिजे. पॅकिंग हे योग्य पद्धतीने हाताळता आले पाहिजे.
२) ग्राहकाचे लक्ष वेधून घेणारी पॅकिंगच्या घटकांची रंगसंगती असावी
३) पॅकिंगवर संबंधित उत्पादनाची मुदत छापलेली असावी.
पॅकेजिंग घटकाची तांत्रिक गुणवत्ता :-
१) पॅकिंगसाठी वापरलेले साहित्य हे योग्य गुणवत्तेचे असावे. शिफारशीप्रमाणे त्याची जाडी,तन्यता, रचना, रासायनिक आणि भौतिक गुणधर्म, ताण सहन करण्याची ताकद, आर्द्रतेमध्येही टिकण्याची क्षमता हे तपासून घेणे आवश्‍यक आहे.
२) उत्पादनाच्या गुणवत्तेसाठी “आयएसआय’ तसेच “बीआयएस’ मानकाप्रमाणे आपल्या उत्पादनाची आणि पॅकेजिंगची गुणवत्ता असावी. त्यानुसारच ग्राहकाची पसंती आपल्या उत्पादनाला मिळते.
अधिक माहितीसाठी :- 7249856424

December 27, 2016

0 responses on "पॅकेजिंग हवे गुणवत्तापूर्ण....!"

  Leave a Message

  Your email address will not be published.

  All Right Reserved.
  Call Now ButtonCall Now
  Translate »
  error: Content is protected !!