Online Marketing In less Budget –
“कल्पना सत्यात उतरविण्यासाठी स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा”
कमी पैशात जाहिरात –
आज बाजारात जर आपण आपले नवीन उत्पादन आणत असाल तर आपल्याला त्या नवीन उत्पादनांची ऑनलाइन जाहिरात करावी लागते पण यासाठी आपल्याला बरेचसे पैसे मोजावे लागतात व कधी-कधी ऐवढे पैसे खर्च करून सुद्धा आपल्या उत्पादनाची जाहिरात आपल्याला जशी पाहिजे तशी होत नाही तर मनात एक पश्चातापाची भावना येतो कि एवढे पैसे खर्च करून सुद्धा आपला व्यवसाय का वाढत नाही आहे. या कारणामुळे आपण ऑनलाइन जाहिरात करणे बंद करतो.
आज कोणत्याही उद्योजकाला वाटते की कमी गुंतवणुकीमध्ये आपण जास्त उत्पन्न घ्यावे तसेच ऑनलाइन जाहिरात क्षेत्रातही आहे. यामध्ये कमी पैसे गुंतवून चांगला प्रतिसाद मिळायला हवा जेणे करून तुमच्या उत्पादनाचा चांगला खप होउन तुमचा व्यवसाय वाढेल.
तर या करीता मी तुम्हाला काही कमी गुंतवणूकीमधे होणाऱ्या जाहिराती बद्दल माहिती देणार आहे. ज्या पद्धतीमध्ये तुमचे पैसे हे कमी लागतील व तुमच्या व्यवसायाची जाहीरातही होइल.
१) तुमच्या व्यवसायाचा ब्लॉग तयार करा.
तुम्ही तुमच्या उत्पादनाबद्दल माहिती जमा करा व ती माहिती तुमच्या ब्लॉग वर लिहा जो ब्लॉग कमी पैशात तयार होऊन जातो. गुगल चे एक ब्लॉगर म्हणून संकेतस्थळ आहे तेथे तुम्ही तुमचा ब्लॉग तयार करु शकता.
२) गुगल नकाशामध्ये तुमचा व्यवसाय समाविष्ट करा.
(google map registration)
तुम्ही जर अँड्रॉइड मोबाईल वापरात असाल तर तुम्हाला गुगल नकाशा माहित असेलच. त्यावर तुमचा व्यवसाय समाविष्ट करा. ज्यामुळे ग्राहक तुमच्या व्यवसायायाचा पत्ता गुगल मॅपवर शोधेल आणि त्याला तुमचा पत्ता लवकर सापडेल.
३) जुन्या ग्राहकांना पुनर्विपणन करा.(old customer Remarketing)
तुमचे जे जुने ग्राहक आहेत जे तुमच्याशी एकनिष्ठ आहेत त्यांचे Watsapp नंबर व ई-मेल पत्ता घ्या व तुमच्या नवीन उत्पादनाविषयी त्यांना वेळोवेळी माहिती देत राहा. यामुळे ते ग्राहक तुम्हाला विसरणार नाहीत व त्यांना तुम्ही पाठवत असलेली माहिती ही नेहमी खरी ठेवा फसवी आश्वासने त्याना देवू नका कारण ते तुमचे विश्वसनीय ग्राहक आहेत जे तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्याशी जुळले आहेत.
तुम्ही जर watsapp वर उत्पादनाची माहीती देत असाल तर माहीती ही आपल्या उत्पादना विषयीच असावी हे निश्चित करा.
याला ऑनलाइन जाहिरात क्षेत्रात रीमार्केटिंग(remarketing) असे म्हणतात.
४) ऑनलाइन उद्योजकीय मासिकात लेख लिहा.
तुमचा उद्योग ज्या प्रकारचा असेल त्याच्या संबंधित काही मासिके प्रकाशित होतात त्या मासिकांमध्ये तुमच्या व्यवसायाशी संबंधित माहितीपूर्वक लेख लिहा. व तुमच्या उत्पादनाची माहिती त्या लेखमध्ये द्या कारण तुम्ही जे उत्पादन विक्री करत आहात ते ग्राहक ऑनलाइन पध्दतीने कसे खरेदी करु शकतो हे ग्राहकांना सांगणे खुप महत्वाचे आहे. हे तुम्ही या मासिकांमधुन सांगु शकता कारण काही मासिके ऑनलाईन तसेच ऑफलाईन पब्लिश होत असतात यामुळे तुम्ही नियोजित ग्राहकांपर्यंत पोहचू शकता जे मोबाईल वापरत नाहीत.
५) ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रमानां भेट द्या.
काही मोठ्या कंपन्या नवउद्योजकांनसाठी ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम ठेवतात तर तुम्ही तिथे जाऊन आपल्या उत्पादनाबद्दल माहिती देऊ शकता.
६) जुन्या ग्राहकांसाठी अॅफिलियेट प्रोग्राम तयार करा.
(Affiliate Program)
तुमच्या जुन्या ग्राहकांसाठी तुम्ही अॅफिलियेट प्रोग्राम तयार करा.अॅफिलियेट प्रोग्राम म्हणजे तुम्ही जे उत्पादन विक्री करत आहात ते उत्पादन तुमच्या ग्राहकाला विक्री करायला लावणे व त्यांना त्यांनी विक्री केलेल्या उत्पादनामधुन आलेल्या नफ्यातील काही पैसे देणे म्हणजेच अॅफिलियेट प्रोग्रॅम होय. त्यांनी विक्री केलेल्या उत्पादनावर चांगल्या प्रकारे पैसे द्या. यामुळे तुमचे जुने ग्राहकही राहतील व ते नवीन ग्राहकपण जोडतील.
७) जाहीरातीसाठी फेसबुकचा वापर करा.
फेसबुक वर तुमच्या व्यवसायाच्या नावाने ग्रुप व पेज तयार करा परंतू एक गोष्ट लक्षात घ्या आधी तुम्ही जो ग्रुप किंवा पेज तयार कराल त्या पेज वर तुम्ही जर फक्त तुमच्या उत्पादनाविषयी माहिती द्याल तर तुम्हाला जास्त ग्राहक आकर्षित करता येणार नाहीत कारण फेसबुक हे एक सामाजिक संकेतस्थळ आहे ज्यावर लोक हे काही खरेदी करण्याच्या हेतुने येत नाहीत. तर तुम्हाला त्यांना तुमचे उत्पादन खरेदी करण्यासाठी आकर्षित करावे लागेल. जे तुम्ही फक्त आपल्या उत्पादना विषयीच माहीती देवुन करु शकत नाही यामुळे तुम्हाला कमी लोक जोडतील तर यासाठी तुम्हाला तुमच्या फेसबुक पेजवर इतर गोष्टी पण सामायिक कराव्या लागतात. जसे विनोद, बातम्या, काही सामाजिक पोस्ट कराव्या लागतील यामध्ये तुम्ही मधोमध तुमच्या उत्पादनाची माहिती सामायिक करु शकता. व त्यावर तुम्हाला येत असलेल्या कमेंट व मॅसेज ला उत्तर देत रहा. यामुळे तुमचे तुमच्या ग्राहकांशी सबंध वाढतील व ग्राहकांच्या समस्या तुमच्या लक्षात येतील व तुम्ही त्यांच्या समस्या सोडवून ते ग्राहक नेहमीसाठी तुमच्याशी जोडले जातील.
८) ऑनलाइन व्हिजिटिंग कार्ड.
ऑनलाइन व्हिजिटिंग कार्ड तयार करा जे एका लिंकने तुमची सर्व माहिती दुसर्या व्यक्तीला सहजरीत्या पाठवता येते. जे कमी खर्चात तयार होते.
९) सामाजिक माध्यमातून रोज माहीती द्या.
फेसबुक व इतर सामाजिक माध्यमावर तुमच्या व्यवसायाबद्दल माहिती देत राहा. कारण तुम्ही जर चार महिने खूप माहिती दिली वर नंतर माहिती टाकणे बंद केल तर लोक तुम्हाला विसरतात कारण या माध्यमांवर रोज काही नवीन येत राहते. मोठ्या प्रमाणात नवीन उदयोजक हीच चुक करतात नवीन असताना या माध्यमांवर रोज काही सामायिक करतात व काही दिवसांनी काहीच पोस्ट करत नाहीत एक गोष्ट लक्षात घ्या सामाजिक माध्यमांवर जाहीरात करणे हा एक प्रवास आहे जो तुम्ही बंद केला की तुम्ही हरले. कारण यावर तुमची जागा ही स्थायी नाही.
10) ऑनलाइन सवलत कार्यक्रम तयार करा.
( online discount programme )
तुम्ही जर ऑनलाइन जाहिरात करत असाल तर तुम्हाला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तुमच्या उत्पादनामध्ये सवलत ही द्यावीच लागेल. कारण आज ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांनी ऑनलाइन ग्राहकांना सवलतीची सवय लावली आहे. तुम्ही तुमच्या उत्पादनावर देत असलेल्या सवलतीमध्ये जास्त प्रमाणात अटी ठेवू नका. ही सवलत त्याच ग्राहकांनाच द्या जे तुमच्याजवळुन पहिल्यांदा खरेदी करत आहेत. पण सवलत देत असताना त्या ग्राहकांची माहीती तुमच्याकडे जतन करा जी तुम्हाला पुनर्विपणन करतांना कामात येईल.
या प्रकारे ऑनलाइन जाहिरात करा तुमचे पैसे पण वाचतील व हे सर्व माध्यम परवडणारे ठरतील जे तुमच्या बजेटमध्ये पण बसतील अशा विविध मार्गांचा विचार करा. जे तुम्हाला परवडतील तुमचे सध्याचे जाहिरात बजेट न वाढवता पण जाहिरात करण्याचे बरेचसे मार्ग आहेत इतर उद्योजकीय संकेत स्थळावर अतिथी पोस्ट लिहा तसेच तुम्ही तयार केलेल्या ब्लॉगवर माहिती देत रहा व ती माहिती सामाजिक माध्यमावर रोज टाकत राहणे याच प्रकारे तुम्ही कमी पैशात तुमची ऑनलाइन जाहिरात करु शकता.
आशा करतो की वरील दिलेल्या माहितीवरून तुम्हाला हे कळले असेल की कमी पैशात ऑनलाइन जाहिरात कशी करायची. अशाच उद्योजकीय माहितीसाठी चावडी ला भेट देत राहा.
– धिरज तायडे.
“व्यावसायिक ज्ञानाचा पाया भक्कम करा आणि स्वतःचा विकास घडवा.”
0 responses on "कमी पैशात ऑनलाइन जाहिरातीच्या दहा पध्दती"