राष्ट्रीय फलोत्पादन योजना…!

राष्ट्रीय फलोत्पादन योजना…!
व्यापारक्षम शेती प्रक्रियेने जागतिकीकरणाच्या धोरणात मुख्य स्थान मिळविले आहे. ठराविक क्षेत्रात किती उत्पादन काढले, यापेक्षा क्षेत्रात किती अधिक नफा मिळविने हे अधिक महत्वाचे आहे.  अनेक ठिकाणी बाजारपेठेच्या विचार करून व्यवसायिक तत्वावर अनेक ठिकाणी शेती करण्याकडे आज भर दिला जात आहे. यादृष्टिने फळपिके, फुलपिके, भाजीपाला पिके, औषधी व सुगंधी वनस्पतींची लागवड, प्रक्रिया व निर्यात या क्षेत्रात  फलोत्पादन अभियान हा कार्यक्रम सर्वत्र राबविण्यात येत आहे. त्याच प्रमाणे फळप्रक्रिया योजना सुध्दा आता वेळोवेळी जाहिर होत आहे.
योजना :-          
राज्य सहकारी संस्था, सहकारी, नोंदणीकृत संस्था, विश्वस्त संस्था, सहकारी समिती, फलोत्पादन संघ स्वयंसहाय्यता गट, शेतकारी माहिला गट तसेच सार्वजनिक क्षेत्रातील नोंदणीकृत कंपन्या या संस्था / कंपन्यांना अनुदान वगळता प्रकल्पाचा इतर खर्च स्वत उभारणार असल्यास त्यांना बँक कर्जाची अट असणार नाही, मात्र त्यांना तशा प्रकारचे पुरावे सादर करावे लागतील.

 • लाभार्थीने वाहनाची नोंद R.T.O कडे संबधित वाहानाचा वापराच्या उद्देशासह करणे बंधणकारक आहे.
 • रेफर व्हॅन साठी फलोत्पादीत पिकांची बॅकवर्ड व फॉरवर्ड लिंकेजेस असणे आवश्यक आहे.
 • प्रकल्पासाठी आवश्यक असणारे हमीपत्र लाभार्थीने प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे.

 
प्रकल्प खर्च  :-         साधारण २४ लाख रूपये.
अनुदा        :-         ग्राह्य खर्चाच्या.

 • सर्वसाधारण क्षेत्र                       :–       ४० टक्के.
 • डोंगराळ व अधिसूचित क्षेत्र        :–       ५५ टक्के.

प्राथमिक प्रक्रियामध्ये काजु प्रक्रिया केंद्र, वाळवणे, पल्प काढणे, भूकटी करणे इ. तसचे बेदाणा तयार करणे नैसर्गिक रंग, सुंगध तेल, इत्यादी सुका भाजीपाला व फळे, ताजे कापलेली फळे व भाजीपाला यांचे पॅकींग,  पल्पींग व कॅनींग इत्यादी घटकांचा विचार  होतो.
 
योजनेचा प्रमुख उद्दे

 • फुळे, फुले, भाजीपाला सारख्या नाशवंत मालाचे आयुष्य व दर्जा वाढविणे.
 • मोठया प्रमाणावर उत्पादीत होणाऱ्या फलोत्पादन मालाची आवक वाढून भाव कोसळणे या परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे.
 • कच्चा मालावर प्रक्रिया करून गुणात्मक वाढ, मूल्यवर्धन करण्यासाठी चालना देणे.
 • फलोत्पादनावर आधारित स्वयंरोजगार निर्मितीस चालना देणे.

अर्थसहाय्याचे स्वरूप    :
सर्वसाधारण क्षेत्रासाठी ग्राह्य प्रकल्प खर्चाच्या ४० टकके किंवा कमाल रू. ९.६० लाखापर्यँत आणि डोंगराळ व अधिसूचित क्षेत्रासाठी ग्राह्य प्रकल्प खर्चाच्या ५५ टक्के किंवा कमाल रू. १३.२० लाखापर्यँत अर्थसहाय्य मिळते. अर्थसहाय्यासाठी भांडवली खर्चाच्या बाबी ग्राह्य धरण्याल्या जातात.
     पात्र लाभार्थी    :-
   वैयक्तिक लाभार्थी                                           
वैयक्तिक लाभार्थ्यासाठी सदर अर्थसहाय्य हे बँक कर्जाशी निगडीत असून (Credit Liked Back Ended Subsidy) बँक कर्जाच्या परताव्याच्या स्वरूपात अनुदान देय राहील.
इतर लाभार्थी  :
राज्य सहकारी संस्था, सहकारी, नोंदणीकृत संस्था, विश्वस्त संस्था, फलोत्पादन संघ, स्वयंसहाय्यता गट ज्यामध्ये किमान २५ सदस्य असतील, शेतकारी महिला गट तसेच सार्वजनिक क्षेत्रातील नोंदणीकृत कंपन्या या संस्था,   कंपन्यांना अनुदान वगळता प्रकल्पाचा इतर खर्च स्वत: उभारणार असल्यास त्यांना बँक कर्जाची अट असणार नाही,   मात्र त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचे पुरावे सादर करावे लागतील.

 • फिरते प्रक्रिया केंद्रामध्ये शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन प्रक्रिया करणे अपेक्षित असुन यासाठी लागणाऱ्या वाहनाचा खर्च हा अनुदानासाठी ग्राह्य धरला जाईल. मात्र वाहनाची तशा प्रकारची नोंद R.T.O. कडे होने आवश्यक आहे.
 • F.P.O. लायसेन्सच्या धर्तीवर प्रक्रिया केंद्रात स्वच्छता ठेवणे व तयार होणाऱ्या मालाची गुणवत्ता ठेवणे आवश्यक आहे.
 • जिल्ह्यास मंजुर असलेल्या फळ पिक समुहामधील पिकांचीच प्राधान्याने प्रक्रिया करण्यासाठी प्रक्रिया प्रकल्प प्रास्तावित करावेत.
 • या घटकाचा लाभ होणाऱ्या लाभार्थींने विक्री करावयाच्या फलोत्पादीत माल फलोत्पादन संघ, फलोत्पादन घेणाऱ्या उत्पादकांची सहकारी संस्था यांचेकडुन घेणे आवश्यक आहे. अशाप्रकारची व्यवस्था असल्यासच लाभर्थी सदर अनुदानास पात्र राहतील. प्रकल्पासाठी आवश्यक असणारे हमीपत्र लाभर्थ्यीने प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे.

योजनेच्या अधिक माहितीसाठी जवळच्या जिल्हा कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
उद्योगांच्या अधिक माहितीसाठी :– 7249856424.

December 24, 2016

0 responses on "राष्ट्रीय फलोत्पादन योजना...!"

  Leave a Message

  Your email address will not be published.

  All Right Reserved.
  Call Now ButtonCall Now
  Translate »
  error: Content is protected !!