शेळीच्या दुधापासून बनवा विविध पदार्थ
शेळीच्या दुधात चांगली पोषणमूल्य तसेच काही औषधी गुणधर्मही आहेत. आपल्याकडी शेळीचे दूध उत्पादन क्षमता बघता थोड्या प्रमाणात का होईना दूध व दुग्ध पदार्थांची निर्मिती करून, शेळीच्या दुधापासूनचे पदार्थ दूध व दुग्ध पदार्थांची निर्मिती करून, शेळीच्या दुधापासूनचे पदार्थ म्हणून जास्त दराने विकणे शक्य आहे.
शेळीच्या दुधाचे उत्पादन महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे. शेळीला ‘ गरिबाची गाय ’ म्हणून संबोधले जाते. शेळी कोणत्याही आजाराला लवकर बळी पडत नाही. शेळी हा कटक प्राणी आहे. शेळीपासून आपल्याला दूध आणि खतही मिळते. शेळीच्या दुधापासून दही, चक्क, श्रीखंड, खवा, छत्रा, लोणी, तूप आदी पदार्थ बनवता येतात. शेळीच्या दुधापासून विविध पदार्थांची निर्मिती करून संशोधकांनी त्याच्या चाचण्या घेतल्या आहे. या उत्पादनांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसादही मिळला आहे. गाई, म्हशींच्या दुधाचे पदार्थ तयार करण्याच्या प्रचलित पध्दतीने शेळीच्या स्पिरीट गोट सोप हा शेळीच्या दूध व वनस्पती तेल एकत्रित करून बनवतात. लोशन आणि पोशन (औषधी) मध्ये देखील मॉईश्ररायझिंग लोशन, क्रिम बनविण्यासाठी शेळीचा दुधाचावापर होतो. सौंदर्य प्रसाधने तयार करण्यासाठी शेळीच्या दुधाचा वापर होतो.
परदेशात काही कंपन्या, हँडमेंडट गोट मिल्क, सोप, गोट मिल्क लोशन, वूमेन्स बॉडी आईल, गोट मिल्क शाम्पू बार ’, गोट मिल्क स्कीन केअर क्रिम, शेविंग सोप, बेबी स्किन केअर व सौदर्यप्रसाधने बनवतात.
विविध दुग्धपदार्थ :-
- छन्ना :-
छन्ना तयार करण्यासाठी म्हशीच्या दुधापेक्षा गाईचे दुध जास्त पसंत केले जाते. संशोधनाअंती असे निदर्शनास
आले, की शेळीच्या दुधापासून मऊ अंगबांधणीचा छन्ना मिळतो. शरीरासाठी अति उत्तम असा छन्ना आपल्याला शेळीच्या दुधापासून मिळतो. मऊ छन्न्यासाठीच गाईचे दूध, म्हशीच्या दुधापेक्षा जास्त वापरले जाते. मऊ छन्न्यामुळे उत्तम गुणवत्तेचा रसगुल्ला शेळीच्या दुधापासूनच्या रसगुल्ला हा अधिक पांढऱ्या रंगाचा तयार होतो. मऊ, नरम, गुळगुळीत पोत असलेला सौम्य आम्लता असलेला रसगुल्ला शेळीच्या दुधापासून बनवता येतो.
शेळीच्या दुधापासून छन्न्यात ५५.३७ टक्के आर्द्रता २३.९२ टक्के फॅट, १७.२६ टक्के प्रथिने आणि २.२१ टक्के लॅक्टोज (साखर) आणि १.६३ टक्के राखेचे प्रमाणे आढळते.गाईच्या व शेळीच्या दुधापासून बनविलेला (संदेश) (बंगाली पदार्थ) हा सर्व बाबतीत सारखच आढळतो.
- चक्का, श्रीखंड :-
- गाईच्या दुधापासूनचे आणि शेळीच्या दुधापासूनचे दही चव, दुधाचे पदार्थ बनवले जातात. त्यासाठी वेगळया साधन सामग्रीची व पध्दतीची गरज नाही.
परदेशातील उत्पादने :-
शेळीच्या दुधापासून युरोपात चीज तर रशियात केफीर बनवतात. ग्रीस आणि फ्रान्समध्ये शेळीच्यादुधापासूनचे चीज मोठ्या प्रमाणावर बनवले जाते. शेळीच्या दुधातील फॅटी ऑसिडच्या घटकातील फरकामुळे एक वेगळीच चव त्या चीजला मिळतो. हे चीज पांढऱ्या रंगाचे असते, कारण शेळीच्या दुधात कॅरोटीन नसते.
२ टक्के फॅट आणि १०.५ टक्के एस.एन. एफ ने प्रमाणित करून शेळीच्या दुधापासून आंबवून बनविलेले पदार्थ बनविलेले पदार्थ युरोप, अमेरिकेत प्रसिध्द आहेत. हे पदार्थ सामान्यत: व्हिटॅमिन ‘ए’ आणि व्हिटॅमिन ‘डी’ मिसळून पोषण मूल्य वाढवून विकतात. परदेशात शेळीचे दूध आइस्क्रीम तयार करण्यासाठी वापरले जाते. शिवाय किंमतही जात असते. रंग, वास, अंगबांधणी इत्यादी समान आढळते.
शेळीच्या दुधापासून तयार केलेल्या दह्याचा रंग गाईच्या दुधापासून तयार केलेल्या थोडा उजळलेला पांढरा असतो. हे दही थोडे मऊ असते. शेळीच्या दुधापासूनच्या चक्क्यात मात्र जास्तीची आर्द्रता (७१.४२ टक्के) तर गाईच्या दुधापासूनच्या चक्क्यात (४४.४३ टक्के) कमी आर्द्रता असते. यामुळेच शेळीच्या दुधापासूनचा चक्का मऊ आणि कमकुवत अंगबांधणीचा होतो. गाईच्या दुधापेक्षा (४५.४३) शेळीच्या दुधापासूनच्या श्रीखंडात जास्त आर्द्रता (४९.८८) आढळते. उत्तम अंगबांधणीचा चक्का तयार होण्यासाठी शेळीचे दूध थोडे जास्त वेळ उकळावे म्हणजे चक्क्यात येणारी आर्द्रता कमी राहील.
- बटर :-
शेळीच्या दुधातील घटकांमुळे शेळीच्या दुधापासूनच्या बटरमध्ये नेहमीपेक्षा किंवा नेहमीच्या बटरपेक्षा वितळण बिंदू कमी आढळतो. यामुळे बटर पसरवणे सोपे जाते. यामुळेच आइस्क्रीममध्ये याचा वापर करणे साईस्कर ठरते. शेळीच्या दुधात कॅरोटीन नसल्यामुळे बटरला छान पांढरा रंग येतो.
शेळीच्या दुधापासून तयार केलेल्या बटरवर वापर आइस्क्रीम, सौदर्यप्रसाधन आणि रूची आणण्यासाठी अनेक अत्रपदार्थ निर्मिती केटरिंग सॉसेस, मांस तळण्यासाठी होतो.
- चीज :-
चीजचे विविध प्रकार तयार करण्यासाठी शेळीच्या दुधाचा वापर योग्य आहे. शेळीचे दूध वापरून बनविलेले मऊ प्रकारचे चीज फ्रान्स, युरोप, अमेरिका, स्पेन, ययुगोस्लाव्हिया, इटलीत प्रसिध्द आहे. शेळीचे दूध म्हशीच्या दुधासोबत एकत्र करून मोझरेला चीजसाठी वापरता येते.
खवा :-
शेळीच्या दुधापासूनचा खवा किंचिंत थोडासा पिवळसर आणि कठीण असा असतो. शेळीच्या दुधापासूनच्या खव्यास थोडी खारट चव मिळते. ही चव तशी स्वीकारार्ह होत नाही. दुधात जास्तीच्या क्लोराईडमुळे खारट चव येते. शेळीच्या दुधापासूनचा खवा करत असताना जवळपास शेवटच्या टप्प्यात तो चिकट होतो. शेवटच्या टप्प्यात फ्री फॅट मुक्त होत नाहीत किंवा सुटत नाही. जे गाईच्या आणि म्हशीच्या दुधात प्रामुख्याने आढळून येते.
खवा चिकट न होण्यासाठी शेळीचे आणि म्हशीचे दूध १:१ या प्रमाणात घेऊन खवा बनवावा. या प्रकारच्या मिक्स दुधात कमीत कमी ५ टकके फॅट व ९ ते १० टक्के एस.एन.एफ असावे. या प्रकारच्या खव्यात २९.८५ टक्के आर्द्रता, २५ टक्के फॅट, १८.२८ टक्के प्रथिने आणि ३:५ टक्के ऑश असते. शेळीच्या दुधापासूनचा खवा थोडासा रवाळ तयार होतो.
0 responses on "शेळीच्या दुधापासून बनवा विविध पदार्थ"