केळीच्या खुंटापासून फायबर बनविणे…!

केळीच्या खुंटापासून फायबर बनविणे…!
भारतात केळीच्या खुंटापासून फायबन बनविणे हा नवीन उपक्रम आहे. काही यंत्रमाग संस्थांनी केलेल्या संशोधनावरून लक्षात येते की, केळीच्या खुंटापासून बनविलेले फायबर हे विविध प्रकारे उपयुक्त ठरू शकते. केळीच्या खुंटापासून बनविलेले फायबर फिलीपाईन्स मध्ये वापरले गेले आहे. व त्यांच्या उपयुक्तेमुळे त्याला मनिला ‘हेम्प’ हे नाव पडले.  तसेच याला  ‘अबाका’  या जातीच्या केळीच्या खुटांपासून बनविले जाते.
उदयोग  :
केळीच्या खुंटापासून फायबर हे मोठ्या प्रमाणात बनविली जातात. हे प्रमुख्याने बॅकनिस पध्दत व लोईनिट पध्दती नुसार ही फायबर बनविली जातात.

 • बॅकनिस पध्दत :-

या पध्दतीमध्ये फायबर केळाच्या वाया गेलेल्या खुंटापासून तयार केला जाते. फायबर हा खुंटाच्या आतील बाजूला आढळतो आणि ५ ते ८ से.मी रूंद रिबिन्स आणि २-४ मि.मी च्या आकारात ओढून काढला जातो. या प्रक्रियेला टाक्सिईंग म्हणतात.

 • लोईनिट पध्दत

या पध्दतीमध्ये एक एक करून टक्सिज काढल्या जातात.  वरील दोन्ही पध्दतींमध्ये टक्सिज २३ ते २७ किलोच्या बंडल्समध्ये बांधल्या जातात.  टक्सिज सुरीच्या पात्याखाली ओढल्या जातात, नंतर जोरात दाबले जाते, ज्यामुळे फायबर सुटे होण्यास मदत होते. नंतर हे फायबर स्वच्छ हवेत सुकविले जातात आणि त्याचे ग्रोडिंग केले जाते आणि बंडल्स बनविले जातात.
 
बाजारपेठ :-
दक्षिण भारतात हे फायबर जास्त प्रमाणात वापरले जाते. या फायबरचा वापर नोटा बनविण्यासाठी  होतो. पॉलिहाऊस च्या आच्छादनासाठी यांच प्रकारच्या फायबरचा उपयोग केला जाते. तसेच जहाजावंर जे मोठे दोरखंड असतात. ते याच प्रकारच्या फायबरपासून बनविलेले असतात. संपूर्ण जगातील केळीचे उत्पादन ७० मिलियन टन होते. फिलिपाईन्स आणि जपानमध्ये यंत्रामागापासून बनविण्यात येणाऱ्या वस्तूंसाठी या प्रकाराच्या फायबरचा उपयोग हा आधिक प्रमाणत केला जातो. फिलिपाईन्समध्ये या पासून तयार कपडे बनवून जपान, सिंगापूर, तैवानमध्ये निर्यात केले जातात. तसचे कापड उद्योगात अशा प्रकारच्या फायबरला जास्त मागणी सर्वत्र दिसून येते.  संपूर्ण जगाच्या केळी एकून उत्पादना पैकी ११ टक्के केळी उत्पादन भारतात होते. त्यामुळे भारतात या व्यवसायास चांगला वाव आहे.
 प्रकल्पविषय :-
हा उद्योग उभारणीसाठी साधाण १० ते १२ लाख रूपये खर्च येतो. तसेच बॅंक सुध्दा आपली पत पाहून योग्य दरानुसार कर्ज पुरवठा करते. हा उद्योग उभारल्यास आपणांस चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो.
   अधिक माहितीसाठी :- 7249856424
 

December 27, 2016

0 responses on "केळीच्या खुंटापासून फायबर बनविणे…!"

  Leave a Message

  Your email address will not be published.

  All Right Reserved.
  Call Now ButtonCall Now
  Translate »
  error: Content is protected !!