ज्वारी प्रक्रिया उद्योग…..!

ज्वारी प्रक्रिया उद्योग…..!
महाराष्ट्रातील संकरित ज्वारी विशेषत:त खरिपात काढणीच्या वेळेस नेमकी पावसात सापडते व काळी पडते. चांगली संकरित ज्वारीसुध्दा ग्राहक आवडीने घेत नाही संकरित ज्वारी लवकर खराब होते. त्यास कीड लागते व भाकरी चांगली होत नाही. ज्वारीपासून स्टार्च, द्रव ग्लुकोज, फ्रुक्टोज, इन्व्हर्ट सिरप, स्टार्चपासून इतर विशिष्ट गुणधर्म असलेल्या स्टार्च, ज्वारीपासून माल्ट व माल्टपासून बिअर, व्हिस्की, माल्ट एक्स्ट्रॅक्ट माल्ट वापरून बालखाद्य, माल्टचा बेकरीत वापर, ज्वारीचे पोहे पॉप, ज्वारीपासून एक्स्ट्रुडेड स्नॅक्सचे पदार्थ, शेवया, ज्वारीचे ब्रेकफास्ट सिरियल, ज्वारीपासून रवा, मैदा व इतकेच नाही तर वाहनासाठी वापरता येणारे इथेनॉल इंधन तयार करणे इत्यादी. उत्पादनो ज्वारी पासून आपणांस तयार करता येतात. त्यातील काही उद्योग/ उत्पादने आपणांस पुढील प्रमाणे पाहता येतात.
 
ज्वारी पासून पोहे :-
तांदळाच्या पोह्याप्रमाणेच ज्वारीचे पोहे तयार केले जातात. ते जास्त पाचक, रेचक व मधुमेहाच्या रोग्यांना लाभदायक असतात. ज्वारीचे पोहेचा चिवडा करण्यासाठी वापरता येतात. याचा चिवड हलका व कमी तेल वापरून करता येतो. त्यामुळे ग्राहकाला तो पाचवण्यासाठी  चांगला असतो व तयार करताना तेलाची बचत होते. या उद्योगासाठी रोज ३०० किलो पोहे करण्यासाठी प्रकल्प खर्च रु. २ ते २.५० लाख येऊ शकतो. पोहे तयार करण्यासाठी प्रतिकिलो खर्च रू.१२ पर्यंत येऊ शकतो. विक्री मात्र रू.२० किंवा त्या पेक्षा जास्त किंमतीने करता येते. याची मशिनरी स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध आहे. अधिक क्षमतेचे प्रकलप सुध्दा उभे करता येतात.
प्रकल्प क्षमता  :-  ३०० कि/दिन, प्रकल्प खर्च रू. २.५० लाख रूपये
उत्पादन          :- १०० किलो ज्वारीपासून ८५ किलो पोहे.
 
 
 
 
प्रकल्प क्षमता :- ३०० कि / दिन. प्रकल्प खर्च : रू २.५० लाख
 उत्पादन :- १०० किलो ज्वारीपासून ८५ किलो पोहे.
 
 ज्वारीचे पॉपकॉर्न :-
पॉपकॉर्न सर्वांना माहित आहेत. जे रेल्वे, स्टेशन, बसस्टँड, सिनेमागृह इत्यादी ठिकाणी २५ ग्रॅम पॅकेटला रू. ४ ते ५ लाख देऊन म्हणजे किलोचा भाव आहे. रू. १६० या मक्याचा लाह्याप्रमाणे ज्वारीच्या लाह्या तयार करून विक्री केल्यास रू. १० प्रति कि.ग्रॅ.ची ज्वारी रू. १५० प्रति किलोप्रमाणे त्याच ज्वारीच्या लाह्याव्दारे विक्री करून कमवता येतील. ज्वारीचे पॉप करण्याची पध्दती पॉपकॉर्नप्रमाणे मशिनव्दारे सुध्दा करता येतात. ब्रँडींग करून उत्कृष्ट वेष्टने वापरून २५ ग्रॅम, ५० ग्रॅम किंवा १०० ग्रॅमची पाकिटे करून विक्री करता येतात. ज्वारी लाह्यापीठ तयार करून सुध्दा विक्री करता येतात.
 
प्रकल्प क्षमता :- किलोपासून टन प्रतिदिन
प्रकल्प खर्च     :-      रू. १०० पासून रू. दोन लाखापर्यंत
 
 ज्वारीपासून स्नॅक्स :-
एक्सटुडर यंत्राचा वापर करून उत्कृष्ट कुरकरीत पणा असणारे चवदार पदार्थ तयार करता येतात. सरळ खाण्यासाठी तयार पदार्थ किंवा तळून खाण्याच्या चिप्ससारखे पदार्थ किंवा तळून खाण्याच्या चिप्ससारखे पदार्थ ज्वारी वापरून तयार  करता येतात. यासाठी एक्सटुडर मशिनची आवश्यकता असते. ज्वारीचे पीठ करून ज्वारी पिठात इतर पोष्टिक पदार्थांचे मिश्रण केले जातात. त्यात खास मसाल्याचे किंवा सुवासासिक पदार्थ टाकले जातात व मशिनमधून त्यावर प्रक्रिया करून त्याला आकर्षक, पाहिजे तो आकार दिला जातो. मशिनमधून हा पदार्थ बाहेर आल्यानंतर तो सुकवून पॅक केला जातो. हा पदार्थ तळून किंवा तसाच दोन्ही प्रकारांनी तयार करून खाण्यासाठी दिला जातो. हे पौष्टिक करण्यासाठी त्यात सोयाबीनचे पीठ, शेंगदाण्याचा चुरा, तीळ किंवा इतर प्रथिनयुक्त पदार्थ टाकता येतात व मुलांना खाण्यासाठी अत्यंत चांगले असून आरोग्यासाठी उपयोगी पदार्थ आहे.
प्रकल्प क्षमता :– १ टन प्रतिदिन.
प्रकल्प खर्च रू :– २० लाख.
  
ज्वारीपासून माल्ट, सर्च व तत्सम पदार्थ :-
परदेशात आणि हिंदुस्थानात सध्या माल्ट हा बार्ली या धान्यापासून केला जातो. आपल्या राज्यात बार्लीचे उत्पादन फारच कमी असल्यामुळे विविध कारखान्यात लागणारा माल्ट हा इतर प्रांतातून किंवा परदेशातून आयात केला जातो. बार्ली माल्टप्रमाणे ज्वारीपासून सुध्दा माल्ट तयार करता येतो. माल तयार करण्यासाठी काही वाण. उदा. सीएसएच – १,५,९ मालदांडी व काही आफ्रिकेहून आणलेल्या ज्वारीचे वाण माल्ट तयार करण्यासाठी उपयुक्त आहेत. या माल्टचा वापर बिअर बालहार व बिस्किटात करता येतो. माल्ट तयार करून त्यांची विक्री इतर कारखान्यांना करता येते किंवा माल्टचा वापर आपल्याच कारखान्यात विविध पदार्थ तयार करण्यासाठी करता येतो. माल्ट हा ज्वारीपेक्षा खूप पाचक असल्यामुळे त्यास महत्व आहे.
प्रकल्पक्षमता   :- १ टन प्रतिदिन.
प्रकल्पखर्च    :- २० लाख रूपये.
प्रकल्पविषय :-
ज्वारी पासून विविध प्रक्रिया उद्योग सुरु करण्यासाठी वेगवेगळ्या उत्पादनानुसार खर्च येत. उद्योग सुरु झाल्यावर खर्च कमी अधिक प्रमाणात होऊ शकतो. बँक सुध्दा आपणांस पत पाहून कर्ज पुरवठ  करते. वरील प्रक्रिया उद्योग सुरु केल्यास आपणांस चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो.
अधिक माहितीसाठी :- 7249856424

January 17, 2017

0 responses on "ज्वारी प्रक्रिया उद्योग.....!"

  Leave a Message

  Your email address will not be published.

  All Right Reserved.
  Call Now ButtonCall Now
  Translate »
  error: Content is protected !!