इन्स्टाग्राम बिझनेस मार्केटिंग

Instagram Business Marketing :-
“कल्पना सत्यात उतरविण्यासाठी स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा”

  इन्स्टाग्राम हे फोटो सामाईक करण्यासाठी तयार केलेले एक सामाजिक माध्यम आहे. हे  २०१० साली तयार करण्यात आले होते तेव्हा हे माध्यम एवढे प्रचलित नव्हते जेव्हा याला २०१२  मध्ये फेसबुक ने विकत घेतले व यामध्ये काही बदल केले तेव्हा पासून हे खूप प्रचलित झाले.

आज आपल्या भारतात इन्स्टाग्रामचे दहा कोटी वापरकर्ते आहेत.जे दिवसेंदिवस खूप झपाट्याने वाढत आहे  इंस्टाग्राम वापरकर्त्यांच्या संख्येमध्ये जास्तीत जास्त वर्ग हा तरुणांचा आहे आज तरुण वर्गाकडून इन्स्टाग्राम खूप पसंत केले जात आहे. हे फेसबुकपेक्षा थोडं वेगळं आहे म्हणजे तुम्ही जसे फेसबुकवर फोटो व माहिती सामाईक करता तसेच तुम्ही इन्स्टाग्रामवर सुद्धा सामाईक करू शकता. हे फेसबुकपेक्षा असे वेगळे काहे की यावर तुम्ही फक्त फोटो सामाईक करू शकता. हो, काही माहिती सामाईक करायची असेल तर ती तुम्ही फोटो सोबत  सामाईक करू शकता.

आज इन्स्टाग्राम चे वापरकर्ते ज्या प्रमाणे  वाढत आहे त्याचप्रमाणे उद्योजकांचे लक्ष आपल्या व्यवसायाचे विपणन करण्याकरिता इन्स्टाग्रामकडे वळत आहे.इन्स्टाग्रामवर त्यांना आपल्या व्यवसायाचे  विपणन करणे खूप स्वस्त व परवडणारे आहे व येथे त्यांना मोठ्या प्रमाणात ग्राहक वर्ग हा सहजरित्या मिळतो व तोही कोणतेही पैसे न देता.

तुम्ही पण इन्स्टाग्राम वर तुमच्या व्यवसायाचे विपणन करू शकता तेही कोणतेही पैसे न खर्च करता.चला तर मग पाहू  की इन्स्टाग्राम वर आपल्या व्यवसायाचे विपणन कश्या प्रकारे आपण करू शकता.इन्स्टाग्राम वर तुम्हाला तुमच्या व्यवसायाचे विपणन किंवा जाहिरात करायची असेल तर तुम्हाला आधी इन्स्टाग्राम चे खाते तयार करावे लागेल जे क्षणात तयार जाते .

चला तर मग खालील प्रकारे इन्स्टाग्राम चे खाते तयार करूया.

● आधी गूगल Play Store वरून इन्स्टाग्राम चे अँप डाउनलोड करा.

● नंतर अँप उघडून त्यामध्ये Create new account  यावर क्लिक करा. व तिथं तुमचा mobile number टाका व sing up वर क्लिक करा.

● नंतर एक Password तयार करा व नेक्स्ट करा.

आता तुमचे इन्स्टाग्राम खाते तयार झाले.हे झाले तुमचे वैयक्तिक खाते तयार परंतु तुम्हाला इन्स्टाग्रामवर तुमच्या व्यवसायाचे विपणन करण्याकरिता व्यावसायिक पृष्ठ पाहिजे.

तर आता आपण या खात्याला व्यावसायिक पृष्ठामध्ये बदलून घेऊ.

● इन्स्टाग्रामच्या अँप मध्ये दिसत असलेल्या वरील उजव्या बाजूस तीन रेषेवर क्लिक करा.

● त्यानंतर सेटिंगवर क्लिक करा व अकाऊंट हा पर्याय निवडा

●नंतर तुमचे फेसबुकचे जे व्यावसायिक पृष्ठ आहे ते याला जोडा.

●तुम्ही जर तुमचे फेसबुकचे व्यावसायिक पृष्ठ तयार केले नसेल तर तुम्ही ही पोस्ट वाचून तुमचे व्यावसायिक पृष्ठ तयार करू शकता.

● त्यानंतर तुमची सर्व व्यावसायिक माहिती तिथे लिहा व सेव करा.

आता तुमचे इन्स्टाग्रामचे व्यावसायिक खाते तयार झाले आहे.आता तुम्ही या व्यावसायिक पृष्ठाच्या सहाय्याने इन्स्टाग्राम वर तुमच्या व्यवसायाचे विपणन करू शकता.

तुम्हाला व्यावसायिक पृष्ठामध्ये काही पर्याय हे  मिळतात जे तुम्हाला वैयक्तिक खात्यामध्ये मिळत नाहीत.

ते खालील प्रमाणे.

● instagram inside
● instagram add
● instagram shopping
● contact information option

तुम्ही इन्स्टाग्रामवर जर वैयक्तिक खाते तयार केले असेल तर ते व्यवसाय पृष्ठामध्ये बदलून घ्या.

आता आपण पाहू की आपल्या व्यवसायाचे विपणन तुम्ही या पृष्ठाच्या साहाय्याने कसे करू शकता.

१) सर्वात आधी तुमचे मार्केटिंगचे ध्येय निश्चित करा.
लक्षात घ्या की इन्स्टाग्राम हे एक सामाजिक माध्यम आहे ज्याच्या मदतीने तुम्ही लाखो लोकांपर्यंत पोहचू शकता.

या करिता तुम्हाला आधी हे ठरवावे लागेल की तुम्ही इन्स्टाग्रामवर काय करणार आहात.

● तुमच्या उत्पादन विषयी जागरूकता निर्माण करू शकत
● नवीन ग्राहक मिळवण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता.
● तुमचे उत्पादन विकण्यासाठी.

यामधील तुम्हाला कोणती गोष्ट इन्स्टाग्रामवर करायची आहे ते आधी ठरून घ्या. तुम्ही या तिन्ही गोष्टी इन्स्टाग्रामवर करू शकता.

२) तुमचा ग्राहक वर्ग निश्चित करून घ्या.

आपण थोडे निरीक्षण केल्यास आपल्या लक्षात येईल की इन्स्टाग्रामवर अनेक वयोगटातील लोक आहेत त्यामधील तुम्हाला कोणत्या वयोगटातील लोकांना आपले उत्पादन विकायचे आहे किंवा दाखवायचे आहे हे ठरवून घ्या.

इन्स्टाग्राम वर 18 ते 29 वयोगटातील लोक मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत.

३) तुमची इन्स्टाग्रामची व्यावसायिक प्रोफाईल चांगली ठेवा.
बघा आजच्या काळात जे दिसत ते खपत ही म्हण या बाबतीत लागू होते जर तुमची प्रोफाइल ही चांगली नसेल तर तुमचे ग्राहक तुमच्यावर जास्त  विश्वास  ठेवणार नाहीत. तुम्हाला इन्स्टाग्राम मध्ये bio म्हणून एक पर्याय दिला असतो तिथे तुम्हाला 150 शब्दात तुमच्या व्यवसायाचे वर्णन करायचे असते.

ते अगदी विचार करून व काळजी पूर्वक लिहा कारण ते खूप लोक पाहतात त्यामधून तुमच्या व्यवसायाची माहिती लोकांना समजते.

तुम्हाला एकाच ठिकाणी खूप काही सांगायचे आहे.तर तुमच्या प्रोफाइल फोटो चांगला असायला हवा  सामान्यतः लोक त्यांचा व्यावसायिक प्रोफाईल फोटो हा त्याचे व्यावसायिक चिन्ह ठेवतात.
तुम्ही तुमच्या व्यवसायाचे चिन्ह ठेऊ शकता.
यामुळे तुमच्या ग्राहकांना तुमची प्रोफाईल शोधण्यास मदत होईल.
तुमची प्रोफाईल ही आकर्षित व सुंदर असायला हवी.

४) पोस्ट कश्या करायच्या.

इन्स्टाग्राम हे फोटो सामाईक करण्यासाठी एक सामाजिक माध्यम आहे यावर फोटोलाच महत्व आहे.  याकरिता तुम्हाला चांगल्या फोटोग्राफरची गरज नाही. यावर सामाईक करण्यासाठी तुम्ही स्वतः  फोटो तयार करू शकता फोटो तयार करण्यासाठी तुम्ही CANVA सारखे अँप वापरू शकता. तुम्ही तयार केलेल्या फोटोनी लोकांचे लक्ष केंद्रित केले पाहिजे.

त्याहूनही महत्वाचे म्हणजे तुम्ही फोटोमध्ये जे काही लिहले आहे ते माहिती देणारे असावे व तुमच्या व्यवसायाशी संलग्न असावे व फोटो आकर्षित असावा कारण या सर्व गोष्टी फोटोमध्ये नसतील तर तो फोटो आपल्या काही कामाचा नाही. शक्यतो इन्स्टाग्राम वर फोटो सामाईक करतांना फोटो हे इन्स्टाग्रामची जी फोटोची ठरलेले साइज आहे त्यामधेच असायला हवा.

५ ) पोस्ट करतांना माहिती कशी  लिहावी. 

हो इन्स्टाग्राम हे फोटो सामाईक करण्यासाठी वापरण्यात येणारे माध्यम आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला मग फोटो सोबत काही माहिती द्यावी लागणार नाही. तुमच्यासाठी फोटो सामाईक करतांना माहिती लिहणे आवश्यक आहे तुमच्या उत्पादनाच्या फोटो इतकीच त्याची माहिती पण महत्वाची आहे .
पोस्ट करतांना फोटो सोबत माहिती लिहावीच लागते.

या प्रकारे तुम्ही इन्स्टाग्राम वर तुमच्या बिझनेस मार्केटिंग करू शकता. व तुमचा व्यवसाय वाढवू शकता तुम्ही इन्स्टाग्रामवर खूप लवकर तुमचे उत्पादन प्रचलित करू शकता कारण आज हे तरुण  वर्गात खूप प्रचलित होत आहे.

आशा करतो तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर तुम्ही ही पोस्ट आपल्या मित्रांना सोबत सामाईक करू शकता. अशाच ऑनलाईन मार्केटिंग च्या माहितीसाठी चावडीला भेट देत राहा.

                                                                                                 – धिरज तायडे

“व्यावसायिक ज्ञानाचा पाया भक्कम करा आणि स्वतःचा विकास घडवा.”

Stay Updated…
Other Blogs
Follow Us On Facebook And Instagram
For More Information Please Call Us On 7272971971

Share this:
March 26, 2021

0 responses on "इन्स्टाग्राम बिझनेस मार्केटिंग"

    Leave a Message

    All Right Reserved.