• No products in the cart.

प्रवास किंवा सुट्टीमध्ये व्यवसाय कसा सांभाळावा.

How to Manage Business on Vacation – “कल्पना सत्यात उतरविण्यासाठी स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा”

व्यवसाय कसा सांभाळावा

तुमच्यावर उद्योगिक कार्यसंघ चालवण्याची जबाबदारी असेल, तर तुम्हाला काही अडचणीला सामोरे जावे लागत असेलच जसे की, व्यावसायिक प्रवास (business tours) किंवा फॅमिली टूर.

तुम्हाला वाटेल यात कोणती समस्या आहे. तर समस्या अशी की, तुम्ही प्रवासाला असताना तुमच्या पाठीमागे तुमच्या ऑफिस मध्ये कामे सुरळीत चालतात की नाही याची समस्या. परंतु यावर उपाय आहेत….ते आपण बघूया…..

काम सुरळीत चालत आहे का हे बघणे, कुणाला कुठले काम द्यायचे हे ठरवणे, आपल्या व्यवसायाचा मेल तपासणे, दिलेले काम पूर्ण झाले का, ते तपासणे किंवा ग्राहकांच्या समस्या सोडवणे हे सर्व कामे आपल्या फोनवरून केले जाऊ शकते. खरं तर, आज आपल्या फोनद्वारे जवळजवळ काहीही ऑनलाइन केले जाऊ शकते. हे तर तुम्हाला चांगल माहिती असेलच.

इंटरनेटमुळे हे सोपे झाले आहे. आधी आपण कुठे सुट्टीसाठी गेलो, तर डोक्यावर टेन्शन असायचं की, आपल्या मागे ऑफिसचे किंवा फॅक्टरीची कामे सुरळीत चालत आहे की नाही, की मी सुट्टीवर आणि माझ्या ऑफिसमधील कर्मचारी कामात हलगर्जीपणा करून टाइम पास तर करत नसेल ना?….इत्यादी इत्यादी….

त्यामुळे कुणी सुट्टीवर बाहेर फिरायला जायचं टाळत असे, आणि सुट्टीला गेलाच तर, वरील दिलेल्या कारणांनी तो बैचेन होत असे. आज आपण बघणार आहे की, ऑफिसमध्ये न राहता सर्व व्यवस्थापन हे बाहेर राहून कसे करता येईल. कारण तुम्ही एक उद्योकजक असला, तर तुम्हाला काही कामामुळे व्यावसायिक प्रवास किंवा पारिवारिक प्रवास हा करावाच लागतो. अश्या वेळेस ऑफिस पासून दूर असताना आपला व्यवसाय व्यवस्थापित करताना आपल्याला कोणत्या मुख्य कारणांचा विचार करणे आवश्यक आहे. हे आपण बघणार आहोत.

 

आपला व्यवसाय व्यवस्थापित करण्यासाठी मुख्य घटक:

नियमित सभा आयोजित करा (Conduct Regular Meetings)

चांगली सभा घेण्यासाठी प्रत्येकाला कॉन्फरन्स रूममध्ये अडकवण्याची आता गरज राहिलेली नाही; आपण फक्त इंटरनेट कनेक्शनसह दूरवर असलेले कर्मचारी, स्वतंत्ररित्या काम करणारे (फ्रीलन्सर) आणि ऑफिस मधील कर्मचारी याच्या सोबत तुम्ही कुठूनही काम करू शकता.

आपण प्रवास करीत असताना दररोज किंवा अगदी साप्ताहिक आधारावर भेटणे अवघड असू शकते. कारण तुम्ही जर एक उद्योगाचे नेतृत्व करत असाल, तर बहुतेक तुम्ही खूप व्यस्त आहात परंतु व्यावसायिक दैनंदिन ,साप्ताहिक किंवा मासिक मीटिंग(बैठक) घेणे हे तुमच्या उद्योगाच्या यशाच्या दृष्टीने महत्वाचे असतेच. तथापि, साप्ताहिक किंवा द्वि-साप्ताहिक व्यवस्थापकांसोबत बैठक केल्याने कार्यालयात आपल्या उपस्थितीचे आश्वासन मिळते आणि व्यवसायातील सर्व बाबींवर आपल्या देखरेखीची पुष्टी होते.

याकरिता आपण स्काईप (Skype) किंवा गूगल हँगआउट (Google Hangouts) द्वारे सहजपणे सभा आयोजित करू शकता, जिथे प्रत्येकजण एकमेकांना पाहू शकतो आणि आवश्यक असल्यास फायली सामायिक (share) देखील करू शकतो.  प्रात्यक्षिके (presentations) साठी आपली कॉम्पुटर स्क्रीन सर्वांसोबत सामायिक करू शकतो.

आपण कुठेही असलात तरी, आपल्या कर्मचार्‍यांशी नियमितपणे संवाद साधण्याची खात्री करा, तसेच त्यांच्यात आणि तुमच्यात विश्वास विकसित होईल असे त्यांच्याशी जवळचे संबंध निर्माण करा. जर हे साध्य केले, तर आपण दूर असताना आपल्यास व्यवसायाबद्दल चिंता करण्याची आवश्यकता राहणार नाही.

कामाची प्रगती आणि दिलेल्या वेळेत काम होत आहे का ते तपासा  (Follow-up on Work Progress & Hours)

आपण ऑफिसपासून दूर रहाण्याचा अर्थ असा कधीही होत नाही, की काम होत नाही, किंवा कामाला विराम दिला आहे. स्लॅकिंग किंवा आळशी कर्मचाऱ्यांसाठी टाइम(वेळ) ट्रॅकिंग सॉफ्टवेअर हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या प्रकारचे सॉफ्टवेअर आपल्याला कर्मचार्‍यांचे कामाचे तास ट्रॅक करण्यास अनुमती देते. जेणेकरून कोण उशीरा कामावर आले किंवा ओव्हरटाइम काम केले. त्याबद्दल आपल्याला त्याची नोंदणी मिळते.यामुळे कर्मचारी त्यांच्या कामाच्या प्रगतीवर त्यांची वेळ, ब्रेक आणि नोट्स ठेवण्यात सक्षम असतात.खूप प्रकारचे टाइम ट्रॅकिंग सॉफ्टवेअर आहेत, जसे की, क्लोकइन पोर्टल(ClockIn Portal) सारख्या कामाच्या तासांवर लक्ष ठेवतात, जे कामाची टाइमशीट आणि पेरोल (payroll) सिस्टमसह एकत्रित केले जाऊ शकतात.आपण बेसकॅम्प किंवा आसन (Asana) सारख्या आवश्यक प्रकल्प व्यवस्थापनासाठी सॉफ्टवेअरचा देखील वापर करू शकता. जे प्रामुख्याने कार्य पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करतात.

प्रोजेक्ट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आपल्याला कार्ये नियुक्त करण्यास (getting work done efficiently), टिप्पण्यां काढण्यास (update them with comments), कामाची मुदती निश्चित करण्यास (allows you to assign tasks), संलग्नके जोडण्यास (add attachments),आणि अखेरीस ती पूर्ण म्हणून चिन्हांकित करण्याची परवानगी देते. कामाचे तास आणि कामाच्या प्रगतीची एक सोपी ट्रॅकिंग पद्धत, कर्मचार्‍यांना लक्ष केंद्रित करतो आणि दिलेलं काम वेळेत करून घेतो.

व्यवसाय मेल त्वरित तपासा (Check Business Mail Instantly)

प्रवास करताना, आपले मेल अशी एक गोष्ट आहे, जी आपण विसरू नये. काही दिवस आपल्या मेलकडे दुर्लक्ष केल्यास मोठी समस्या उद्भवू शकते. रीड न केलेला मेल तुमच्या कंपनीचा सेवा घेणारा व्यक्ती (clients) कडील करार, भागीदार किंवा गुंतवणूकदारांकडील कागदपत्रे किंवा आपल्या ग्राहकांकडून मिळालेला अभिप्राय असू शकतात.

व्हर्च्युअल मेलबॉक्ससह (virtual mailbox) आपण जिथे जिथे जाल तिथे आपण आपले मेल घेऊन जाऊ शकता आणि मेल बॉक्स तुम्ही मोबाईल मधूनही वापरू शकता. मेल वापरण्याची सुविधा आता सर्व अँन्ड्रॉईड मोबाईलमध्ये उपलब्ध आहे.  

व्हर्च्युअल मेलबॉक्स म्हणजेच ई-मेल(E-mail) असतो, जो आपण ऑनलाइन वापरू शकता आणि आपले मेल हाताळू शकता. कोणतेही दस्तऐवज  किंवा पॅकेजेस फॉरवर्ड करणे, उघडणे, संग्रहण (save) करणे किंवा काही मिनिटांत मेल डाऊनलोड करणे या सर्व गोष्टी तुम्ही ई-मेलद्वारे करू शकता.

तर केवळ आपल्या महत्वाच्या मेलवर नाही, तर ते मेलरूमची गरजही दूर करते (it eliminates the need for a mailroom), सरळ सोप्या भाषेत याचा अर्थ कमी पेपर चा वापर, यासाठी कोणताही मेल ऑपरेटर लागत नाही आणि लवकरात लवकर मेल ऑपरेट होतो.

तुम्हाला भविष्यातील पत्त्यात बदल करणे किंवा वारंवार प्रवासासाठी दूर जाणे, यात कोणतीही अडचण उद्भवणार नाही. याची हमी पोस्टस्केन मेल (PostScan Mail) देतो. तो आपले मेल प्राप्त करतो, आऊट साईड स्कॅन करतो आणि आपल्याला ऑनलाइन सतर्क (inform) करतो.

त्यानंतर आपण आपले स्कॅन केलेले मेल पाहू आणि इंटरनेटशी कनेक्ट असलेल्या कोणत्याही डिव्हाइसद्वारे मेल आणि पॅकेजेस दूरस्थपणे व्यवस्थापित करू शकता. आपल्या विनंतीनुसार, ते आपल्या पत्राची सामग्री स्कॅन करू शकतात, जंक मेल रीसायकल करू शकतात, आपल्या वस्तूला आपण निवडलेल्या पत्त्यावर पाठवू शकतात किंवा आपल्या इच्छेपर्यंत आपल्या मेलवर सुविधा देऊ शकतात, सर्व काही फक्त एका क्लिकने हे साध्य झालेले आहे.

या सर्वांचे तात्पर्य असे की, तुम्ही एक व्यावसायिक कार्यसंघ नेतृत्व करत असाल आणि तुम्हाला प्रवास करायचा असल्यास किंवा सुट्टीवर जायचे असल्यास तर आत्ता घाबरण्याची काही गरज नाही. तुम्ही तुमचे आवश्यक कामे ऑनलाईन करू शकता.

व्यवसाय कसा सांभाळावा तर आपल्या व्यवसायातील सर्व आवश्यक गोष्टींबरोबरच, कामाच्या मागे पडण्याची किंवा अयोग्यतेने आपला व्यवसाय व्यवस्थापित करण्याची चिंता न करता आपण सहजपणे प्रवास करू शकता. या घटकांचे अनुसरण करून आपण आपली कार्ये व्यवस्थापित करू शकता आणि आपल्या सुट्टीचा आनंद घेऊ शकता.

                                                                                                                 – सागर राऊत

“व्यावसायिक ज्ञानाचा पाया भक्कम करा आणि स्वतःचा विकास घडवा.”

Stay Updated…
Other Blogs
Follow Us On Facebook And Instagram
For More Information Please Call Us On 7272971971

March 26, 2021

0 responses on "प्रवास किंवा सुट्टीमध्ये व्यवसाय कसा सांभाळावा."

Leave a Message

Contact Details

Contact No: +917272971971
Comany Name : Chawadi Training and Consultancy Pvt. Ltd.
Adress: First Floor, Radha House Building, Tapovan Rd, Nirmal Nagar, near Laxmi nagar kaman, Savedi, Tal. Nagar, Dist- Ahilyanagar 414003, maharashtra ,India
top
All Right Reserved.