देशातील परिवहन उद्योगामध्ये क्रांती करत तो झाला ३५००० हजार कोटी चा मालक……

देशातील परिवहन उद्योगामध्ये क्रांती करत तो झाला ३५००० हजार कोटी चा मालक……
आज आम्ही आपणांस सांगणार आहोत, एका नव युवकांची गोष्ट त्यांनी आपल्या आयुष्या मध्ये सर्व काही कामविली. मात्र त्यांचे आपल्या करिअर मध्ये कोणत्याही प्रकारचे लक्ष लागत नव्हते. त्यामुळे त्यांनी अशी काही क्रांती केली की परिवहन उद्योग मोठ्या प्रमाणात भराभरीस आला. या व्यक्तीने आपल्या वेगवेगळ्या कल्पनाच्या जोरावर विविध शहरामध्ये कैब सारख्या अनेक सुविधा देण्यास सुरूवात केली. याच व्यवसायवर तो ३५ हजार कोटी रूपयाचा मालक झाला.  व्यवसाय सुरु करण्यासाठी विविध व्यवसायाचा विचार त्यांनी केला. मात्र  विविध व्यवसाया मध्ये त्याचे लक्ष लागत नव्हते.  मग त्याने विविध युक्ती कल्पना याचा वापर करून त्यांनी सर्वांन पेक्षा वेगळा असा व्यवसाय सुरु केला. भारतामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असल्यामुळे सर्वात मोठ्या समस्या वरच निदान केले. या लोकसंख्याची गरज ओळखून  एक उत्तम असा व्यवसाय उभारून  तो जवळ-जवळ ३५  हजार कोटी किंमत असलेल्या कंपनीचा मालक झाला.

 
ही गोष्ट आहे ओला कंपनीचे मालक व युवा उद्योजक भविष अग्रवाल याची. आपल्या देशातील लुधियाना येथील एका छोट्याशा परिवारा मध्ये भविषचा जन्म झाला. भविष हा लहानपणा पासून खूपच हुशार आणि शिक्षणा मध्ये अव्वल होता. आपले शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी  भारता मध्ये अत्यंत प्रतिष्ठित असलेल्या सामायिक परीक्षेच्या (JEE) गुणवत्ता यादी मध्ये येवून तो भारतीय प्रोद्योगिक संस्था मुंबई येथे प्रवेश घेऊन त्यांनी कॉप्युटर विज्ञान या विषयामध्ये इंजिनियरिंगची पदवी घेतली.  अत्यंत यशस्वीरित्या इंजिनियरिंगची पदवी पूर्ण झाल्यानंतर, भविष ने माइक्रोसॉफ्ट या नामांकित कंपनी मध्ये रिसर्च एसोसिएट मध्ये  नोकरी करण्यास सुरुवात केली. माइक्रोसॉफ्ट मध्ये नोकरी करत असताना दोन वर्षात भविषने व्यवसायामधील दोन पेटेंट सुध्दा मिळविले. तसेच भविषचे रिसर्च पेपर हे इंटरनॅशनल जर्नल मध्ये प्रकाशित सुध्दा झाले. या सर्व गोष्टी मिळविल्यानंतर सुध्दा भविषने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आपला स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याचा संकल्प केला.

भविष हा नवीन व्यवसाय काय करायाचा हा विचार तो करू लागला. तो आपल्या परिसरा मध्ये नवीन काय व्यवसाय सुरु करायाचा याचा शोध तो घेऊ लागला. त्याच कालावधी मध्ये भविष हा बंगलोर या ठिकाणी फिरण्यासाठी तो गेला. त्यावेळेस ड्रायव्हरचे  सोबत वाद झाले. यांचा गोष्टीवर विचार करता असतांना भविषने लोकांना कैब सारख्या गाड्या तयार करण्याचा निर्णय घेतला. याच कल्पनेला सोबत घेऊन तो पुढे चालू लागला.  हे काम करत असतांना अंकित नावाचा मित्र भेटला. सन २०१० मध्ये ओला कंपनी सुरु केली. काहीतरी नवीन करण्याच्या कल्पानेने त्यांने आपल्या टेक्नोलॉजी मार्फत सर्व बैकग्राउंडचा चांगला उपयोग करत  सर्विसेस आणि टेक्नोलॉजी या एकमेकांसोबत जोडण्याचा संकल्प केला. याच कल्पनेने एक चांगली क्रांती तयार झाली. त्याने आपल्या अनेक ग्राहकांसाठी वेबसाईट व मोबाईल अॅप तयार केले. याच जारोवर हजारो किलो मीटरचा प्रवासकरण्याठी  त्याने वातनाकूलित गाडीची सेवा सुरु केली. भविषने देशामध्ये एक मोठी अशी परिवहन उद्योगात क्रांती आणली. तीच ओला OLA आपण संपूर्ण देशात पाहात आहोत.

January 28, 2017

0 responses on "देशातील परिवहन उद्योगामध्ये क्रांती करत तो झाला ३५००० हजार कोटी चा मालक……"

  Leave a Message

  Your email address will not be published.

  All Right Reserved.
  Call Now ButtonCall Now
  Translate »
  error: Content is protected !!