• No products in the cart.

भारतीय अन्नप्रक्रिया उद्योगांची रचना

भारतीय अन्नप्रक्रिया(Food Processing)उद्योगांची रचना
अन्नप्रक्रिया(Food Processing) क्षेत्र  हे अनेक लहान लहान उद्योगांमध्ये विभागले गेले आहे. त्यामध्ये खालील उपविभागांचा समावेश होतो. फळे आणि भाजीपाला, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, मद्य, मांस, आणि कुक्कुटपालन, मत्स्योत्पादन, धान्य प्रक्रिया, पॅक केलेले अन्न पदार्थ आणि पेय इत्यादी या उद्योगामध्ये असलेले व्यापारी हे उत्पादन आणि उलाढाल याबाबतीत लहान आहेत. आणि ते मोठ्या प्रमाणात असंघटित आहेत. आकारमानाचा विचार केला तर हे क्षेत्र ७ टक्क्यांहून अधिक आहे आणि किंमतीच्या मानाने ५० टक्क्यांएवढे आह
अन्न प्रक्रिया(Food Processing) उद्योगात दडलेली भारताची क्षमता
                अन्न उत्पादनात भारताचा जगात चीननंतर दुसारा क्रमांक लागतो. तसेच अन्न आणि कृषी क्षेत्रातील त्याची क्षमता खूप मोठी आहे. एकून अदांजित अन्न बाजारपेठेच्या ९१.७ अब्ज अमेरिकन डॉलर पैकी अन्नप्रक्रिया क्षेत्राचा वाटा २९.४ अब्ज अमेरिकन डॉलर इतका आहे. भारतीय उद्योगक्षेत्रामध्ये अन्नप्रक्रिया उद्योग(Food Processing Business) हा एक मोठा उद्योग म्हणून गणला जातो. उत्पादन, वापर, निर्यात आणि संभाव्य वाढीच्या बाबतीत त्याचा सध्या १५ वा क्रमांक लागतो.
भारतीय उद्योग महासंघाटने असा अंदाज व्यक्त केले आहे की, अन्नप्रक्रिया क्षेत्रामध्ये ३३ अब्ज  अमेरिकन डॉलर इतकी गुंतवणूकी येत्या १० वर्षात होऊ शकते आणि त्यामुळे ९० लाख मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध होऊ शकतो. अन्नप्रक्रिया युनिट स्थापन करण्यासाठी आणि त्याचे आधुनिकीकरण करण्यासाठी, तसेच पायाभूत सुविधा निर्माण करणे संशोधन आणि विकासकामांना पाठिंबा देणे, मनुष्यबळ विकास व कामासाठी शासनाने अनेक योजना तयार केल्या आहेत आणि याचबरोबर अन्न प्रक्रिया उद्योगाच्या वाढीसाठी इतर अनेक प्रोत्सहानपर उपाययोजना राबविल्या आहेत.
हा उद्योग आकराने जरी मोठा असली तर वकासाच्या बाबतीत अजून तसा प्राथमिक अवस्थेत आहे. आपल्या देशाच्या एकून कृषी आणि अन्न उत्पादनाच्या फक्त दोन टक्के उत्पादनलावर प्रक्रिया केली जाते. सर्वात जास्त अन्नप्रक्रिया केला जाणारा विभाग म्हणजे डेअरी विभाग, तेथे एकून उत्पादनाच्या ३७ टक्के भाग प्रक्रिया केला जाते. यापैकी केवळ १५ टक्के  प्रक्रिया संघटीत उद्योगामार्फत केली जाते.

भारतीय अन्नप्रक्रिया क्षेत्रात फळे आणि भाजीपाला, मांस व कुक्कुट उत्पादने, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, अल्कोहोलीक पेये, मत्स्योत्पादन, धान्य प्रक्रिया आणि इतर नित्योपयोगी उत्पादने उदाहरणार्थ मिठाई, चॉकलेटस्, कोक उत्पादने, सोयाबीन उत्पादने, मिनरल वॉटर, उच्च प्रथिनयुक्त अन्न पदार्थ इ.चा समावेश होतो.
शीतपेये बाटली बंद करणे, मिठाई उत्पादने, मत्स्यउद्योग, समुद्र उत्पादने, धान्य आणि त्यावर आधारित उत्पादने मांस व कुक्कुट प्रक्रिया, अल्कोहोलिक पेये, दुग्धप्रक्रिया, टोमॅटो उत्पादने, फास्ट फुउ खाण्यास तयार अशी न्याहारीसाठी कडधान्य, अन्नप्रक्रिया, अन्नाचे विविध पदार्थ आणि स्वाद इत्यादी  उपविभाग हे खूप आशादायक असे आहेत.
        भारतीयीकरण
परदेशातील फास्ट फूड ब्रॅन्डस् भारतामध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. नुकतेच इंग्लंडचे डिक्झी चिकन आणि पिझ्झा ऑऊटलेट, पापा जॉन या ब्रॅण्डने आपल्या बाजारपेठेत प्रवेश केला आहे. सिनाबोन आणि बार्नी हे यावर्षी पहिले स्टोअर सुर करीत आहेत. इतर अनेक कंपन्या   उदाहरणार्थ सुमो सॅलेड व पांडा एक्सप्रेस या स्थानिक भागीदार शोधाण्यासाठी पाहणी करीत आहेत.
उत्पान्नाचे अनेकविध  मार्ग आणि बदलती जीवनशैली या पार्श्वूमीवर भारतीय ग्राहक काबीज करण्यासाठी, फास्ट फूड रिटेल चेन उदाहरणार्थ के. एफ.सी, मॅग्डोनाल्ड, डॉमिनोज पिझ्झाहट आणि इतर अनेक कंपन्या बाजारपेठेचा बारकारईने अभ्यास करून लागल्या आहेत आणि आपली अनेक उत्पादने बाजारपेठेत आणीत आहेत. काही मोठे रिटेलेर्स, आपला फायदा वाढविण्यासाठी बहुविध उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या सहकार्याने ग्राहकांच्या मूलभूत गरजा ओळखून त्या पूर्ण करण्याचे धोरण आखतात.

प्रचंड स्पर्धा चालणाऱ्या बाजारपेठेत आपले पाय घट्ट रोवण्याच्या जीवघेण्या स्पर्धेत फास्ट फूडची किरकोळ विक्री करणाऱ्या दुकानांची साखळी मोठ्या प्रमाणात सुरु झाली आहे. यामध्ये यशस्वी होण्याच्या उद्देशाने शाळा, महाविद्यालये आणि कार्पोरेट ऑफिसमध्ये कॅन्टीन्स मोठ्या प्रमाणात उघडण्यात येत आहेत.
जागतिक बाजारपेठेतील मोठ्या मोठ्या कंपन्या उदाहरणार्थ वॉलमार्ट, टेस्के, करेफोर आणि इतर अनेक कंप्नया मोठ्या प्रमाणात आपलया देशातून प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ खेरीद करीत आहेत. त्यामुळे स्थानिक कंपन्या याक्षेत्रात आपला विस्तार करू शकतात. वस्तुत:अन्नप्रक्रिया उद्योग मंत्री  सुबोधकांत सहाय यांनी वर्षाच्या सुरुवातीला सांगितले होते, की ही परेदशी साखळी विक्री  दुकाने आपल्याकडून ३० अब्ज अमेरिकन डॉलर किंमतीचे प्रक्रिया केलेले अन्न खरेदी करू इच्छितात.
दूध आणि दुग्धजन्य उत्पादने :-
या क्षेत्राचा विशेष असा उल्लेख करावा लागेल. भारताचे दूध आणि दुग्धजन्या पदार्थांचे उत्पादन जागतिक  बाजारपेठेत आपली चांगल वाढ करू शकेल. जागतिक दूध आणि दुग्ध पदार्थांचे एकून उत्पादन २००६ पर्यंत २.६ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. भारतामध्ये ४ टक्क्यापर्यंत वाढ होण्याची अपेक्षा आहे. आशियातील अपेक्षित ५ टक्के वाढीपैकी निम्मी वाढही आपल्या देशात होणार आहे.

जगातील सर्वात मोठा एकमेव दुग्धोत्पादन करणारा देश म्हणून भारत सातत्याने भक्कमपणे ३ ते ४ टक्क्यापर्यंत वाढ दर्शवित आहे. हे मुख्यत्व: अंतर्गत मागणीतील वाढीला प्रतिसाद म्हणून आणि उत्पादनक्षमता कायम टिकवण्यामुळे होऊ शकेल. आशिया खंडातील एकूण २२६ दशलक्ष टन दूध उत्पादनात भारताचा वाढा सुमारे निम्मा आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नुकतीच चांगली किंमत मिळाल्यामुळे आता निर्यात बाजारपेठेत प्रवेश करण्यास सुरुवात झाली आहे. विशेषत: स्किम मिल्क पावडरसाठी ९८.८ दशलक्ष टन दूध व दुग्धजन्या पदार्थांपैकी ०.३ दशलक्ष दूध निर्यात होण्याची अपेक्षा आहे. २००५ मध्ये आपल्या देशात  ९५.१ दशलक्ष टन दुग्धजन्या पदार्थांचे उत्पादन झाले आहे.
गुजरात मिल्क को-ऑपरेटिव्ह संस्थाचे एकत्रीकरण झाल्यानंतर म्हणजेच सर्व जिल्हापातळीवरील संघ एकाच अमूल ब्रॅण्डखाली आल्यानंतर अमूल आता जगातील सर्वात मोठा दूधाचा ब्रॅण्ड बनला आहे. आतापर्यंत अमूलचा असा दावा आहे की ते आशिया खंडातील सर्वात मोठा मिल्क ब्रॅण्ड आहेत.

जिल्हा पातळीवरील सर्व ब्रॅण्डस् एकत्रित झाल्यानंतर अमुल दूधाची बाजारपेठ ३.६ ते ३.८ दशलक्ष लीटर प्रतिदिन वरून ४.५ ते ४.६ दशलक्ष प्रतिदिन इतकी वाढू शकेल. पेपर बॉक्स पॅकींगमधील दूधाबरोबर पाऊचमध्येही विक्री केली तर अमूल मिल्कची बाजारपेठ आणखी दोन लाख लिटरने वाढेल..

२००५ – २००६ मध्ये देशातील सागरी उत्पादनांची निर्यात ११ टक्क्यांनी वाढली. युरोपियन, चीन आणि पश्चिम आशिया यांच्या वाढत्या मागण्यांमुळे  हे घडण्यास मदत झाली. सागरी उत्पादनांची निर्यात १.५ अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा अधिक होण्याची देशातील ही पहिलीच वेळ आहे. गेल्या वर्षाची निर्यात १.४७ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी आहे.
पुढील १० वर्षात भारतातील अन्न उत्पादन दुप्पट होण्याची शक्यता आहे. अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान, कौशल्य, उपकरण, विशेष:त कॅनिंग, दूध आणि अन्नप्रक्रिया, विशेष प्रक्रिया, पॅकेजिंग, गोठवलेले अन्न शीतकरण, थर्मोप्रोसेसींग यामध्ये मोठी गुंतवणूक होण्याची  शक्यता आहे. फळे व भाजीपाला, मत्स्यव्यवसाय, दूध आणि दुग्धजन्य उत्पादने, मांस आणि कुक्कुट उत्पादने, पॅक केलेले अन्न, अल्कोहोलीक पेये, शीत पेये, धान्य यामहत्वाच्या अन्नप्रक्रिया उद्योगात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची संधी आहे. आरोग्यदायी अन्न आणि पुरवणी अन्न हा या उद्योगातील वेगाने क्षेत्र आरोग्यविषयी जागृत सणाऱ्या लोकांत लोकप्रिय होत आहे.

या क्षेत्रातील गुंतवणुकीमध्ये येणारे अडथळे दूर करण्यासाठी अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालय पुढे आले आहे. आणि व्यापारासाठी भांडवल, तसेच पुरवठा साखळीतील विविध घटकांसाठी म्युचुअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करीत आहे. मंत्रालयाने रॅबो बँकेच्या शिफारशी यासाठी स्विकारल्या आहेत की, ज्यामुळे ३३.४ अब्ज अमेरिकन डॉलर पर्यंतची गुंतवणूक या क्षेत्रात पुढील १० वर्षात व्हावी.
या क्षेत्रातील प्रचंड वाढीची क्षमता पहाता अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या या संधीचा फायदा घेण्यासाठी भारतामध्ये प्रवेश करू लागल्या आहेत. युनिलिव्हर नेस्टले, पेप्सी व कॅडबरी या त्यातील काही मोठ्या कंपन्या आहेत. त्यांना भारतातील नामवंत कंपन्याशी टक्कर द्यावी लागत आहे.
अन्नप्रक्रिया आणि बेकरी उत्पादन क्षेत्राने स्टॉक मार्केटला चर्चेकरिता एक विषय दिला आहे. या धिम्या गतीने चालणाऱ्या क्षेत्रातील प्रमुख कंपन्या उत्तम कार्य करीत आहेत. अल्प नफा मिळत असल्यामुळे या कंपन्यांना दोन वर्षापर्यंत बाजारात टिकून राहण्यासाठी मोठ्या प्रमाणात व्यापर करावा लागत असला तरी पुढे दिर्घकालीन भवितव्य चांगले आशादाशक असते. कारण ग्रामीण भागात बाजारपेठ खूल्या होत आहेत. आणि ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात विस्तारत असल्यामुळे व्यवसायवृध्दी निश्चित होण्याची खात्री आहे.

 

Stay Updated…
Other Blogs
Follow Us On Facebook And Instagram
For More Information Please Call Us On 7272971971

0 responses on "भारतीय अन्नप्रक्रिया उद्योगांची रचना"

Leave a Message

Contact Details

Contact No: +917272971971
Comany Name : Chawadi Training and Consultancy Pvt. Ltd.
Adress: First Floor, Radha House Building, Tapovan Rd, Nirmal Nagar, near Laxmi nagar kaman, Savedi, Tal. Nagar, Dist- Ahilyanagar 414003, maharashtra ,India
top
All Right Reserved.