• No products in the cart.

मत्स्यव्यवसाय करा आर्थिक प्रगती साधा !!!

    Fish Farming Business – सगळेच शेतकरी मत्स्य पालन करू शकत नाहीत. मत्स्य व्यवसाय हा समुद्रात करायचा व्यवसाय आहे आणि मच्छीमार लोक तो व्यवसाय परंपरेने करत आलेले आहेत. त्यामुळे सर्वसाधारण शेतकर्‍यांना हा व्यवसाय करणे शक्य नाही. असे असले तरी नैसर्गिक तळी, तलाव, पाझर तलाव आणि धरणांची जलाशये यांच्यातही मत्स्य व्यवसाय करणे शक्य झालेले आहे.

सरकार आणि शेतकरी यांचे या गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायाकडे म्हणावे तेवढे लक्ष नाही.देशामध्ये होणार्‍या एकूण मत्स्य व्यवसायात गोड्या पाण्यातील आणि शेतकर्‍यांनी करावयाच्या मत्स्योत्पादनाचे प्रमाण वाढवण्यास भरपूर वाव आहे. परंतु ते प्रमाण म्हणावे तेवढे वाढत नाही. ते वाढवल्यास शेतकर्‍यांना मत्स्य व्यवसाय आणि कोळंबी संवर्धन हा व्यवसाय विकसित होऊ शकतो.

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात शेतकरी आणि मच्छिमार यांव्या जीवनात बदल करण्याचा निर्धार केला असल्याने येत्या काही दिवसांत या दोन व्यवसायात सरकारची मोठी गुंतवणूक होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात मत्स्य व्यवसायाला मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

 

मत्स्यव्यवसाय काय आहे ?

आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे ७२ टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला असून फक्त २९ टक्के भागात जमीन आहे. माणुस जमिनीवर राहत असल्यामुळे त्याला जमिनीवरचे उत्पत्र मिळविण्याचे जास्त आकर्षण वाटणे साहजिकच आहे. परंतु जमिनीच्या दुप्पटीपेक्षा जास्त असलेल्या पाण्याच्या विस्ताराकडे सुध्दा मासे हा  महत्वाचा घटक मिळविणे वाढत्या लोकसंख्येचा विस्तार व अन्नाची गरज लक्षात घेता. महत्वाचे आहे. अशा पाण्यातून सजीव पदार्थ मिळविण्याच्या व्यवसाय म्हणजे मत्स्य पालन होय.

 

Fish Farming Business खालील प्रकारा मध्ये करता येतो

गाव-तळ्यातील मत्स्य संवर्धन  –

विदर्भात माल-गुजारी तलाव, तर राज्याच्या इतर भागांत गावतळी या नावाने बऱ्याच खेड्यांमध्ये अशी तळी किंवा तलाव असतात. हे तलाव सार्वजनिक असतात किंवा काही ठिकाणी ग्राम पंचायतीच्या मालकीची असतात. गावातील लोक एकत्र येऊन येथे मत्स्य संवर्धन करू शकतात. बहुतेक वेळा असे तलाव अत्यंत सुपीक असतात. त्यामुळे येथे माशांचे भरपूर उत्पादन मिळते.

 

क्षारपड भागात मत्स्य संवर्धन –

राज्यात बऱ्याच शेत जमिनी अति पाण्याच्या वापरामुळे क्षारपड किंवा चोपण झालेल्या आहेत. या जमिनी नापिक झाल्यामुळे शेतीला उपयोगाच्या नाहीत. अशा ठिकाणी तलाव खोदून या तलावात झिंगा (कोळंबी) संवर्धन करता येते. अशा प्रकारे तलाव सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत केले असून, त्यात झिंग्याचे चांगले उत्पादन मिळते. झिंग्याला बाजारात 300 ते 500 रु. किलो एवढा दर मिळतो.

 

शेततळ्यात मत्स्य संवर्धन –

शेतीकरिता पाणी साठविण्याकरिता शेततळी करण्याकरिता सरकार प्रोत्साहन देत आहे. या शेततळ्यांचे क्षेत्र 0.05 ते 0.5 हेक्‍टर एवढे असते. यात योग्य पद्धतीने मासे वाढविले तर माशांचे चांगले उत्पन्न मिळते. राज्यातील विविध भागांतील शेतकऱ्यांनी अशा शेततळ्यांमध्ये कटला, रोहू, पंकज इत्यादी माशांचे उत्पन्न घेतले आहे. तलावाची खोली कमी असेल तर माशांची बोटुकली या शेततळ्यात तयार करता येतात.

 

चारमाही तलावात मत्स्य संवर्धन –

बऱ्याच ठिकाणी पावसाळ्याचे केवळ चार ते पाच महिनेच छोट्या तळ्यांमध्ये पाणी राहते. अशा तळ्यात योग्य व्यवस्थापन केले, तर माशांच्या पिल्लांपासून (मत्स्य जिऱ्यापासून) मत्स्य बोटुकली तयार करता येते. ही बोटुकली मोठ्या तलावांमध्ये किंवा जलाशयांमध्ये वाढण्याकरिता सोडता येते.

 

तंत्र –

मत्स्यशेती म्हणजे तळ्यात योग्य जातीचे योग्य प्रमाणत मत्स्यबीज सोडणे व मासे मोठे झाल्यावर ते पकडणे एवढेच नसून, त्या मत्स्यबीजाच्या वाढीसाठी अनुकुलस्थिती तळ्यात निर्माण करते.

 

जागेची निवड –

 तलावाची जागा सपाट किंवा संखल भागात असावी. त्यामुळे खोदकामाचा खर्च कमी येतो. पाणथळ किंवा पाण्याचा निचरा न होणारी जमीन योग्य असते. मातीमध्ये चिकणमाती व गाळ यांचे मिश्रण पेक्षा जास्त असावे.यासाठी साधारण १ एकर ते १ हेक्टर आकारमानाचा २ ते ३ मीटर पाण्याची खोली असलेली जागा निवडावी.

 

बाजारपेठ –

सध्या मोठया प्रमाण लोकसंख्या वाढत असल्याने अन्नाची सुध्दा गरज दररोज वाढत आहे. त्यामुळे माशाची दररोज मागणी ही वाढत आहे. मत्स्य व्यवसायासाठी स्थानिक ते आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे.

 

शासकीय योजना

या उदयोगासाठी मुद्रा अंतर्गत मत्स्य पालन साठी कर्ज सुविधा उपलब्ध आहे. तसेच मासे ही नाशवंत वस्तु असल्याने ती खराब न होता लवकरच बाजारपेठेत जावून तिला चांगला भाव मिळावा यासाठी मच्छिमार सहकारी संस्थास मासळी व बर्फ वाहतुकीसाठी ट्रक, डिझेल, वाहुतकीसाठी टँकर खरेदीसाठी राष्ट्रीय सहकार विकास अंतर्गत अनुदान मिळते.

 

प्रकल्पासाठी खर्च

    हा उद्योग सुरू करण्यासाठी सुरूवातीला अंदाजे ४ ते ५ लाख  रूपये खर्च येतो. तसेच क्षमतेनुसार  आणि  मागणी नुसार प्रकल्पाची किंमत कमी अधिक होऊ शकते. या उदयोगासाठी मुद्रा कर्ज सुविधा उपलब्ध आहे. तसेच शासनाकडून प्रोत्साहानपर अनुदान उपलब्ध असते. बँक सुध्दा आपली पत पाहून कर्ज पुरवठा करते. हा उदयोग सुरु केल्यास आपणांस अधिक फायदा होऊ शकतो.

अधिक माहितीसाठी 7272971971 या क्रमांकावर संपर्क साधावा..

Stay Updated…
Other Blogs
Follow Us On Facebook And Instagram
For More Information Please Call Us On 7272971971

March 31, 2021

0 responses on "मत्स्यव्यवसाय करा आर्थिक प्रगती साधा !!!"

Leave a Message

All Right Reserved.
wpChatIcon
wpChatIcon