फेसबुक जाहिरात

Facebook Ads
फेसबुक जाहिरात

“कल्पना सत्यात उतरविण्यासाठी स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा”

आपल्या व्यवसायाची ऑनलाईन जाहिरात  करण्यासाठी आज फेसबुक हे  एक चांगले माध्यम म्हणून समोर येत आहे. कारण आज फेसबुकवर १.६९ अब्ज लोक जोडलेले आहेत जे यावर रोज काही न काही माहिती व फोटो मोठ्या प्रमाणावर सामाईक करत असतात. आज मोठ्या – मोठ्या कंपनी या  फेसबुकवर  ऑनलाईन जाहिरात करत आहेत व आपला व्यवसाय वाढवत आहेत.

फेसबुक हे लोकांसाठी एक माहितीचा अफाट समुद्राप्रमाणे काम करीत आहे. जिथं लोक हे लोकांसाठी कोणतेही मुल्य न घेता माहिती टाकतात त्यामुळे रोज काही नवीन माहिती ही मोफत मिळत आहे त्यामुळे आज लोक रोज ऑनलाइन राहत आहेत.

फेसबुकवर जाहिरात करणे यामुळे पण सोपे आहे की तुम्हाला तुमचा ग्राहक वर्ग हा लवकर तिथं मिळून जातो. तो पण मोठ्या प्रमाणात व फेसबुक हे जाहिरात करण्यासाठी इतर माध्यमापेक्षा स्वस्त आहे व परवडणारे आहे. जिथं तुम्ही मोफत पण आपल्या व्यवसायाचे विपणन करू शकता.

चला तर मग आज आपण पाहू की फेसबुक पेज (page) तयार करून ऑनलाईन विपणन कशा प्रकारे करायचे.

फेसबुकवर व्यवसाय पेज तयार करण्यासाठी तुम्हाला आधी वैयक्तिक पेज तयार करणे आवश्यक आहे. परंतु एकदा आपल्याकडे ते तयार झाल्यानंतर आपण आपले व्यवसाय पृष्ठ तयार करू शकता. व्यवसाय पृष्ठ आपल्याला आपल्या व्यवसायाची सक्रियपणे जाहिरात करण्यास सक्षम करते तर वैयक्तिक पेज त्यासाठी वापरला जाऊ शकत नाही.फेसबुक व्यवसाय पेजच्या साहाय्याने विपणन करणे गरजेचे आहे .

 

आधी तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या नावाने एक फेसबुक चे व्यवसाय पेज (page) तयार करावे लागेल ते या प्रकारे तयार करायचे आहे.

 • तुमच्या फेसबुक मध्ये मुख्य मेनू मध्ये जाऊन तिथं पेज म्हणून एक पर्याय राहतो तो निवडा व क्रीयेट पेज करा.
 • पेज चे नाव लिहा व नेक्स्ट करा.
 • नंतर तुमचा व्यवसाय कोणत्या श्रेणी मध्ये मोडतो ती श्रेणी निवडा .
 • त्यानंतर तुम्हाला पेज वर एक फ़ोटो ठेवावा लागेल एक चांगला फोटो ज्यामध्ये तुमच्या व्यवसायाची माहिती असेल असा फोटो ठेवा व त्याच सोबत कव्हर फोटो पण ठेवा.
 • आता तुमचे पेज तयार झाले आहे.

पेज तयार झाल्या वर आता तुम्ही पोस्ट करू शकता.

फेसबुक पेज वरून ऑनलाईन विपणन करण्याचे दोन मार्ग आहेत एक मोफतदुसरा पैसे खर्च करून तर आपण या मधील मोफत असणारा  मार्ग पाहणार आहोत.

बघा फेसबुक वर तुम्ही जे तुमचे व्यवसायचे पेज तयार केले आहे त्यावर तुम्ही तुमच्या व्यवसाची महिती देणार आहात पण एक लक्षात घ्या फेसबुक वर जर तुम्ही फक्त जर तुमच्या व्यवसायची माहिती दिली तर तुमच्या पेजला लाईक कमी येतील त्या कारणाने तुमच्या पोस्ट वर पण लाईक कमी येतील व तुम्ही केलेल्या पोस्ट ह्या कमी लोकांना दिसतील.

तर एक गोष्ट आधी लक्षात घ्या की फेसबुक वर कोणत्या प्रकारचे पेज हे जास्त लवकर मोठे होतात ते पुढील प्रमाणे आहेत.

 • लोकांची मदत करणारी माहिती देणारे पेज.
 • प्रेरणा देणारी पेज
 • मनोरंजन करणारी पेज जसे की गाणे.
 • माहिती देणारी पेज जसे की सामान्य ज्ञान.
 • चालू घडामोडी देणारी पेज जसे की बातम्या.

या प्रकाराची पेज फेसबुक  वर खूप मोठ्या प्रमाणात पसंत केली जातात. तर तुम्हाला पण मोफत  तुमचे पेज लवकर मोठे करायचे असेल तर तुम्हाला पण या प्रकारची माहिती तुमच्या पेजमधून द्यावी लागेल.

तुम्ही फेसबुकवर आधीच असलेल्या पेजवर पण आपल्या व्यवसायाची जाहिरात करू शकता ते तुम्ही मोफत करू शकता व पैसे देऊन करू शकता हे ते ज्याचे पेज असेल त्याच्यावर अवलंबून आहे.

व ही माहिती देताना तुम्हाला तुमच्या उत्पादनाची माहिती द्यावी लागेल.

काही नवीन उद्योजक फेसबुक पेज जाहिरात  तयार करतात व त्यावर सुरवातीलाच आपल्या उत्पादनाची माहिती देतात व रोज फक्त उत्पादनाची माहिती देतात. तर या कारणाने त्यांच्या पेज ला जुळलेले लोक हे त्यांच्या पेज ला दुर्लक्षित करू लागतात.

कारण सामाजिक माध्यमान वर लोक हे तुमचे ग्राहक म्हणून येत नाहीत तर ते तिथं माहिती घ्यायला येतात किंवा मनोरंजनासाठी.

हे सर्व समजून घेण्यासाठी तुम्ही  https://www.facebook.com/chawadiInfo/?ti=as हे फेसबुक पेज पाहू शकता. चावडी हे  पेज कसे चालवतात तुम्ही ते पाहू शकता.

 

फेसबुक पेजवर कोणत्या व कश्या पोस्ट कराव्या.

१) दीर्घ काळ चालणाऱ्या पोस्ट तयार करा.

फेसबुक पोस्ट तयार करताना अशा पोस्ट तयार करा ज्या दीर्घ काळ चालतील. व तुम्ही त्या पोस्ट कुठे पण सामाईक करू शकाल.

२) व्हिडिओ पोस्ट करा.

तुम्ही मोठे व्हिडीओ यावर पोस्ट करू शकता व त्या व्हिडीओमध्ये तुमच्या उत्पादनाची जाहिरात देऊ शकता. तुम्ही या प्रकारचे व्हिडीओ पोस्ट करू शकता.
● प्रेरणा देणारे व्हिडीओ,
● हास्य व्हिडीओ,
● माहिती देणारे व्हिडीओ
● तुम्ही बातम्याचे व्हिडीओ टाकू शकता.

विडिओ पोस्ट करण्याआधी त्या व्हिडीओमध्ये सुधारणा करून तुमच्या उत्पादनाची माहिती त्यात टाका.

सुधारणा करीत असताना तुम्ही त्या व्हिडीओमध्ये वरील बाजूस व्हिडीओ कशा बद्दल आहे व खालील बाजूस पण त्या व्हिडीओ बद्दल माहिती द्या.

3) अभिप्राय पोस्ट सामाईक करा.

तुम्ही तुमच्या ग्राहकांचे अभिप्राय घेत राहा व त्यामधील काही चांगले अभिप्राय वेळो वेळी तुमच्या ग्राहकांसोबत सामाईक करा यामुळे तुमच्यावर ग्राहकांचा विश्वास वाढेल.

शक्य झाल्यास एखाद्या मोठ्या नामवंत व्यक्तीचा अभिप्राय तुमच्या पेजवर सामाईक करा हा अभिप्राय व्हिडिओ स्वरूपात असायला हवा.

४) फोटो पोस्ट करा.

फोटो पोस्ट करतांना नेहमी लक्षात ठेवा की फोटो हे चांगले असायला हवे व फोटोमध्ये लिहलेले मजकूर हे फोटो च्या २० टक्केच असायला हवे.

या प्रकारे तुम्ही फेसबुक पेज तयार करून आपल्या व्यवसायाचे विपणन करू शकता व आपला व्यवसाय वाढवू शकता. तुम्हाला फेसबुक चे पेज तयार करण्यात काही अडचण आल्यास किंवा पोस्ट कशा करायच्या या बद्दल अधिक महितीसाठी तुम्ही कंमेंट करू शकता.

ही माहिती आवडल्यास तुमच्या मित्रांना शेयर करा ,अशाच माहितीसाठी चावडीला भेट देत राहा.

                                                                                           – धिरज तायडे   

“व्यावसायिक ज्ञानाचा पाया भक्कम करा आणि स्वतःचा विकास घडवा”

Stay Updated…
Other Blogs
Follow Us On Facebook And Instagram
For More Information Please Call Us On 7272971971

Share this:
March 26, 2021

0 responses on "फेसबुक जाहिरात"

  Leave a Message

  All Right Reserved.