
उन्हाळी भात, भुईमुगा पिक विमा योजना(Crop Insurance Scheme)….!!!
राज्यात रब्बी १९९९ हंगामापासून राष्ट्रीय कृषी विमा योजना चालू होती. मात्र सदर योजनेतील अनेक त्रुटी दूर करून खरीप २०१६ हंगामापासून राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केलेली आहे. गत काही वर्षांच्या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पीकविमा योजना ही शेतकऱ्यासाठी शिवार अभियानात झालेल्या राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानात झालेल्या विविध कामांचा जलसंधारणाच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे. मात्र नैसर्गिक असमोतलामुळे पिकांचे कधीही नुकसान होऊ शकते.
गारपीठ, अवकाळी पाऊस इ. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण, शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन, पिकांच्या नुकसानाच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, कृषी क्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखण्यासाठी पीकविमा योजनेत सहभागस प्राधान्यक्रम असला पाहिजे.
उन्हाळी भात व उन्हाळी भूईमूग पिकांसाठी आपण ३१-०३-२०१७ पर्यंत विमा योजनेत सहभागी होऊ शकता.
योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग :-
- अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित पिके घेणारे (कुठाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत.
- पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना योजना बंधनकारक आहे.
- बिकर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग एच्छिक राहील.
- बिगर कर्जदार शेतकऱ्याने आपला ७/१२ चा उतारा व पीक पेरणीचा दाखला घेऊन प्राधिकृत बँकेत विमा अर्ज देऊन व हप्ता भरून सहभाग घ्यावा. हप्ता भरलेली पोच पावती जपून ठेवावी.
नुकसान भरपाई मिळण्यासाठी :-
- नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे आकस्मात नुकसान झाल्यास ४८ तासांच्या आत याबाबत संबंधित विमा कंपनी, संबधित बँक, कृषी विभाग, महसूल विभाग यांना कळवावे.
- संपूर्ण हंगामात विविध कारणांमुळे अधिसूचित क्षेत्रातील पिकांच्या सरासरी उत्पादनात उंबरठा उत्पादनापेक्षा अधिक घट आल्यास सूत्रानुसार नुकसानभरपाईची रक्कम अंतिम केली जाते. सदर अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांकरिता विमा योजनेत भाग घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना तयाप्रमाणे नुकसानभरपाई त्याच्या बँक खात्यात जमा केली जाते.
रब्बी २०१५-१६ व रब्बी २०१६-१७ मधील पीक निहाय तुलनात्मक विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता दर.
पीक |
विमा संरक्षित रक्कम (रू./हे.) |
विमा हप्ता शेकडा प्रमाण |
रब्बी २०१६-१७ मध्ये शेतकऱ्यांने भरावयाचा सर्वसाधारण विमा हप्ता विमा (रू./हे.) |
||||
रब्बी २०१५ – १६ | रब्बी २०१६-१७ | फरक | रब्बी २०१५ – १६ | रब्बी २०१६-१७ |
फरक |
||
उ. भुईमूग |
४५,३०० | ३६,००० | -९३०० | २.०० | १.५० | -०.५० | ५४० |
उ.भात | ३०,१०० | ५१,००० | २०,९०० | २.०० | १.५० | -०.५० |
७६५ |
उन्हाळी भात विम संरक्षित रकमेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यामुळे पिकांचे पिकांचे चालू हंगामातील सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आसल्यास शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसानभरपाई रकमेत भरीव वाढ झाली आहे, तर शेतकऱ्यांनी भरावयाच्या पीकविमा हप्त्यातदेखील मोठ्या प्रमाणावर सवलत मिळाली आहे.
शेतकऱ्यांना भरावयाचा जिल्हा निहाय प्रति हेक्टरी विमा हप्ता :-
खालील जिल्हानिहाय विमा हप्ता दर हे स्पर्धात्मकरीत्या वास्तवदर्शी असे निश्चित केले जात असल्याने ज्या जिल्ह्यात ते १.५० टक्क्यापेक्षा कमी आले, तेथे ते आल्याप्रमाणे निश्चित केले, तर जया जिल्ह्यात ते १.५० टक्क्यांपेक्षा जास्त आले, त्या जिल्ह्यात ते १.५० टक्के प्रमाणे निश्चित केले आणि जास्त आलेली विमा हप्ता रक्कम ही शासनामार्फत अनुदान म्हणून दिली जाते, त्यामुळे जिल्हानिहाय विमा हप्ता हा वेगवेगळा येऊ शकतो.
उन्हाळी भात |
उन्हाळी भुईमूग | ||
जिल्हा |
विमा हप्ता रक्कम (रू.प्रति.हे.) |
जिल्हा |
विमा हप्ता रक्कम (रू.प्रति.हे.) |
ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. |
७६५ |
ठाणे, पालघर, रायगड, उस्मानाबाद, परभणी, अमरावती, जालना. |
५४० |
पालघर |
३३६.६० |
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वाशीम, धुळे नंदुरबार, जळगाव, नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, नांदेड, हिंगोली, वाशीम यवतमाळ |
२३७.६० |
कोल्हापूर |
३०६ |
||
अकोला |
२६६.४० |
पिक विमा योजना नुकसानभरपाई निश्चित करण्याची पध्दती :-
पिकांचे गेल्या सात वर्षांतील नैसार्गिक आपत्ती जाहीर झालेली दोन वर्षे वेगळून येणाऱ्या सरासरी उत्पादनास जोखीम स्तराने गुणून त्या पिकांचे उंबरठा उत्पादन निश्चित केले जाते. त्यानंतर चालू हंगामात महसूल मंडल/तालुक्यातील पीक कापणी प्रयोगाव्दारे आलेले उत्पादन हे उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आल्यास खालील सूत्रानुसार नुकसानभारपाईची रक्कम काढली जाते.
नुकसान भरपाई (रू.) = उंबरठा उत्पादन – प्रत्यक्ष आलेले सरासरी उत्पादन/ उंबरठा उत्पादन X विमा संरक्षित रक्कम (रू.)
पिक विमा योजना(Crop Insurance Scheme) च्या महितीसाठी संपर्क :-
- योजनेबाबतचा महाराष्ट्र शासन निर्णय वेबसाईट maharashtra.gov.in तसेच कृषी विभागाची वेबसाईट www.mahaagri.gov.in वर उपलब्ध आहे.
- स्थानिक मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
Stay Updated…
Other Blogs
Follow Us On Facebook And Instagram
For More Information Please Call Us On 7272971971
1 responses on "उन्हाळी भात, भुईमुगा पिक विमा योजना….!!!"
Leave a Message
You must be logged in to post a comment.
Mast