Changing Nature Of Business –
“कल्पना सत्यात उतरविण्यासाठी स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा”
व्यवसायाचे बदलते स्वरूप (Changing Nature Of Business) व्यवसाय कोणताही असो, कुठेही असो,कितीही भांडवलाचा असो, त्याचे यश हे त्या व्यवस्थापन कसे होते आहे याच्यावर अवलंबुन असते.हे व्यवस्थापन आपणच करत असतो.
अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत जागतिक आणि स्थानिक बाजारपेठेत वस्तूचे उत्पादन लहान प्रमाणावर होते, जे उत्पादन केले जात होते त्याची देवाणघेवाणीचे क्षेत्रही मर्यादित होते.औद्योगिक क्रांतीनंतर उत्पादकआणि व्यापारी एकत्रितरित्या येऊन नवनवीन संकल्पनाचा वापर करून स्पर्धा करत व्यापार संघ स्थापन करू लागले.याच काळात ब्रिटिश व्यापार कंपनी भारतात स्थापन झाली.त्यामुळे हस्तव्यवसाय उत्पादनाचे प्रमाणीकरण होण्यात मदत होत गेली , विक्रीवर नियंत्रण राहत होते त्यामुळे त्यांच्या कामकाजाच्या तासात व विक्री व्यवस्थेत नियमितता होती.परंतु औद्योगिक क्रांतीचे सत्तेचे एकीकरण,राजकीय अस्थिरता ,ब्रिटिशांकडून लादलेले पारतंत्र असे अनावश्यक परिणाम दिसून आले .
एकोणिसाव्या शतकातील औद्योगिक क्रांतीमध्ये अर्थव्यवस्थेत अनेक बदल झाले, व्यापाऱ्यांच्या संख्या वाढल्या उत्पादनाचे अनेक पर्याय खुले झाले.व्यावसायिकांमध्ये स्पर्धा वाढल्या, यांत्रिकीकरणामुळे व्यापाराचा वेग वाढला,गुंतवणूक व उत्पादन करण्यासाठी अनेक कंपन्या अस्तित्वात आल्या,त्यातून अनेक कंपन्यांचे काम करण्यासाठी तज्ञ प्रशासकांचा वर्ग निर्माण झाला. त्यानंतर व्यवसाय हा एक पेशाच बनला.व्यवसायाच्या यशस्वीतेसाठी व्यवस्थापनाच्या पायऱ्या त्या त्या दशकानुसार बदलत गेल्या यामुळे विविध उपाययोजना तसेच नवनवीन यांत्रिकीकारणही वाढवले गेले आणि व्यवसाय जास्त प्रमाणात वाढू लागला.स्वातंत्र्य काळानंतर उत्पादन वाढ हे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर असणाऱ्या मुख्य आवाहन होते स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय आणीबाणी, रोगराई आणि आर्थिक योजनांची अंमलबजावणी या सर्व समस्यांना तोंड देत उत्पादन वाढ परिणामकारक पद्धतीने वाढणे अपेक्षित होते. एकोणिसाव्या शतकातील उत्तरोत्तर काळात(१९८०-१९९९) व्यवसाय प्रशासनापुढे गंभीर व अनपेक्षित अशी नवनवी आव्हाने उभी करणारा झाला ती पेलण्यासाठी प्रभावी परिणामकारक व्यवस्थापन योग्य प्रकारे होण्यासाठी अनेक नवीन धोरणे आता निर्माण झाली. एवढंच काय तर प्रशासक किंवा व्यस्थापक यांनाही व्यावसायिक असे संबोधले जाऊ लागले. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात उच्च दर्जाचे उत्पादनआणि संबधित व्यवसायाची स्थानिक बाजारपेढ्याच्या मागण्या जास्त प्रमाणावर वाढत गेल्या.त्यामुळे अर्थव्यवथा उत्पा दनाभिमुख झाली.आणि व्यवसायाचे जागतिक स्थलांतर होऊ लागले.
इंटरनेट
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अनेक मोठे बदल हे व्यवसायात होत गेले, त्यात आधुनिक यंत्र आली तसेच औदयोगिकरणाचा मोठ्या प्रमाणात विकास झाला.नवनवीन संधी तरुनांना मिळाल्या परिणामतः आपले सध्याचे जीवन हे यांत्रिकीकरणावर अवलंबू झाले.या सोयी सुविधामुळे आपले जीवन जास्त प्रमाणात सोपे झाले.हे सर्व इंटरनेट सेवामधील वाढीमुळे शक्य झाले. २०१० नंतर इंटरनेट सुविधा व्यापक होत गेल्या. आणि व्यवसायाच्या डिजिटल युगाची सुरुवात झाली.
सध्याच्या व्यवसायाचे डिजिटल धोरण
आपला स्वतःचा व्यवसाय हा आपण इंटनेटच्या माध्यमातून घर बसल्या सुरू करू शकतो, इंटरनेटवर असलेल्या लोकप्रिय खरेदी विक्रीचे (उदा.फ्लिपकार्टआणि मेशो), इ.अश्या असलेल्या अनेक ऍपद्वारेआपण सर्व प्रकारच्या गोष्टी ह्या घर बसल्या ऑनलाइन पद्धतीने विक्री करू शकतो.
घरबसल्या इंटनेटवरून आज आपण आपला व्यवसाय करू शकतो त्यासाठी माहिती आवश्यक असणाऱ्या गोष्टी
– आपल्या हातात स्मार्ट फोन पाहिजे ज्यात इंटरनेट कनेक्शन असेल.
-ऑनलाईन पेमेंटसाठी आपल्याकडे गुगल पे,फोन पे,तेज या प्रकारचे अँप पाहिजे. ज्यातून आपण अगदी सहजरित्या ५ मिनिटात पेमेंट मोबाइल वरून करू शकतो.
-आपण करत असलेल्या व्यवसायाचे कच्चा माल पुरवठादारांची माहिती असणे आवश्यक आहे ,जेणेकरून तुम्हाला कमी दारात तुमचा कच्चा माल भेटेल.
-तसेच कुरियर कंपनिशी विक्री सेवेसाठी करार करणे आवश्यक आहे.
– त्यानंतर -त्यानंतर विविध वेबसाईट किंवा अँप शोधून त्या वर आपले अकाउंट उघडून तिथे जाऊन त्याची किंमत व फोटो टाकून त्यावर आपल्या मालाची माहिती देऊन आपल्या तयार मालाची विक्री करू शकतो.
– आपल्याला ऑर्डर मिळाल्यानंतर कुरियर कंपनीकडे आपल्या ग्राहकांनी दिलेल्या त्यांच्या पत्त्याची माहिती व फोन नंबर देऊन माल वेळेत पोहचवीला गेला पाहिजे.
– त्यानंतर मुळ किंमतीला पडलेल्या मालाची किंमत +कुरीयर चा खर्च हे वगळून उरलेल्या रक्कम म्हणजे तुमचा नफा ,असा घरबसल्या आपण आज कोणीहीव्यवसाय करू शकतो.
तंत्रज्ञानामुळे घरबसल्या आज आपण व्यवसाय करू शकतो आणि आपला व्यवसाय वाढू शकतो.
– मधुरा जोशी
“व्यावसायिक ज्ञानाचा पाया भक्कम करा आणि स्वतःचा विकास घडवा.”
Stay Updated…
Other Blogs
Follow Us On Facebook And Instagram
For More Information Please Call Us On 7272971971
0 responses on "व्यवसायाचे बदलते स्वरूप"