• No products in the cart.

Call To Action ने वाढवा सेल्स आणि कमी करा मार्केटिंग Budget

Call To Action ने वाढवा सेल्स आणि कमी करा मार्केटिंग Budget

मित्रांनो जर तुम्हाला सेल्समध्ये यश मिळवायचे असेल आणि जास्तीत जास्त ग्राहकांना तुमच्याकडे आकर्षित करायचे असेल तर कॉल टू ॲक्शन या कन्स्पेट वर काम करणे खरच गरजेचे आहे.

आपल्याला रस्त्यावरून जाताना जाहिरातींचे अनेक बोर्ड दिसतात.

एखादा बोर्ड सहज आठवून पहा ज्यावर फक्त लिहिले असेल की,

आमच्याकडील बर्गर खूप छान आहेत
अशावेळी ग्राहक म्हणून तुम्ही काय विचार कराल ; ठीक आहे पण मी काय करू..?

याऐवजी एखादा बोर्ड असं लिहिलेला असेल की चांगले बर्गर खाण्यासाठी पुढच्या दोन नंबरच्या गल्लीमध्ये थांबा…

अशावेळी आपल्याला तिथे जाउन थांबायचे आहे तेही चांगल्या बर्गर खाण्यासाठी हे आपल्या मनामध्ये अधोरेखित होईल.

बराच वेळ तुम्ही सोशल मीडिया वरती वेगवेगळ्या जाहिराती बघत असतात त्यामध्ये प्रकर्षाने एक गोष्ट सांगितली असते की , जाहिरातीनंतर खाली दिलेल्या नंबर वरती फोन करा किंवा तुमचं नाव आणि नंबर कमेंट करा हे म्हणजे आपल्या ग्राहकाला कामाला लावण्याची पद्धत ..

यामुळे आपण ग्राहकाला जाहिरात बघितल्यावर ती नेमके पुढे काय करायचे आहे हे सांगणे पसंत करतो यालाच म्हणतात कॉल टू ॲक्शन.

कोणतीही जाहिरात बघितल्यावर ती नंतर ग्राहकाने तात्काळ लगेच काय करणे अपेक्षित आहे यासाठी ती जाहिरात त्या प्रकारची बनवायला हवी ज्यामुळे जाहिरात बघितल्या बघितल्या त्यांनी तुम्हाला फोन करणे अपेक्षित असेल किंवा तुमच्या दुकानात एकदा व्हिजिट करणे अपेक्षित असेल किंवा अमुक अमुक गोष्ट हवी असेल तर हेच दुकान उत्तम आहे असा मेसेज ग्राहकाच्या डोक्यात फिट करायचा असेल तर कॉल टू ॲक्शन प्रणालीचा वापर फायदेशीर ठरू शकतो अनेक लघुउद्योजक या जाहिरातीच्या मॉडेल कडे फारसे लक्ष देत नाहीत त्यामुळे समजा तुम्ही तुमच्या उद्योगाची जाहिरात करताना होर्डिंग लावणार असाल तर तशा आशयाचे होल्डिंग हवे किंवा तुम्ही जर हॅन्डबिल बनवणार असाल तर फक्त तुमचा अमुक-अमुक कोचिंग क्लास किंवा तुमचे हॉटेल आणि त्याचा पत्ता एवढीच माहिती न टाकता आत्ताच्या आत्ता फोन करा आणि 50 टक्के डिस्काउंट मिळवा अशी ऑफर जर टाकली असेल तर ग्राहकाला तुम्ही कॉल टू ॲक्शन करायला लावली असा त्याचा अर्थ होईल.

यामध्ये बराच वेळा ऑफर आणि ग्राहकांमध्ये ती ऑफर त्याला मिळाली पाहिजे याविषयी उत्सुकता तयार केली तर कॉल टू ॲक्शन या मॉडेलचा चांगला फायदा होतो ..

तुम्हाला काय वाटतं?

तुम्ही तुमच्या उद्योगांमध्ये हे call To Action Tool कशा प्रकारे वापरू शकता कमेंट करून नक्की सांगा..

ज्यांना अजूनही आपला स्वतःचा बिझनेस कसा वाढवावा हे समजत नसेल त्यांच्यासाठी खास चावडी तर्फे हाउ टू ग्रो हा ट्रेनिंग प्रोग्राम मी सुरू केला आहे ज्यामध्ये व्यवसाय मध्ये मार्केटिंग ब्रँडिंग जाहिरात कशी करावी आपला उद्योग कसा वाढवावा याविषयी माहिती देण्यात आली आहे जर तुम्हाला सुद्धा या प्रोग्रामला ऍडमिशन घेऊन स्वतःचा बिझनेस वाढवायचा असेल तर आत्ताच्या आत्ता खाली दिलेल्या नंबर वरती संपर्क करा

7272 971 971

अमित मखरे

July 19, 2022

0 responses on "Call To Action ने वाढवा सेल्स आणि कमी करा मार्केटिंग Budget"

Leave a Message

All Right Reserved.