
Business Planning –
आपल्याकडे बरेच वेळा नवीन उद्योग सुरू करण्याचा ट्रेंड असतो..
घरगुती स्वरूपात मसाला उद्योग सुरू करणे हा त्यापैकीच सगळ्यात फेमस असलेला ट्रेंड आहे..
आमच्याकडे चावडीमध्ये सुद्धा मसाला उद्योगाचे प्रशिक्षण घ्यायला लोक येतात तेव्हा सर सध्या घरगुती स्वरूपात छोट्या लेव्हल ला सुरू करायचे आहे नंतर वाढले की मग बघू असे हमखास लोक सांगतात..
अर्थात सुरुवात ही छोटी असावी याबद्दल कोणतेही दुमत नाही मात्र त्यातून नक्की तुम्हाला काय साध्य करायचे आहे असा जर प्रश्न विचारला तर बऱ्याच लोकांना त्याचे उत्तर देता येत नाही..
ते म्हणतात म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला?
लक्षात घ्या माझा हा प्रश्न विचारण्याचा अर्थ असतो की तुम्हाला नक्की पैसे किती कमवायचे आहेत?
तर समोरील व्यक्ती म्हणते काय सर अजून बिजनेस सुरूच केला नाही आणि तुम्ही किती पैसे मिळवायचे याची भाषा करतात??
मग मी सांगत असतो कुठे नोकरी मिळवायची असेल तर पगार किती देणार तुम्ही असा प्रश्न आपण पहिली विचारतो किंबहुना मनाप्रमाणे अपेक्षित आकडा नसेल तर अनेक लोक इंटरव्यू ला सुद्धा जात नाहीत..
मग बिझनेस सुरु करताना असा हट्ट पहिल्या दिवसापासून का नको…
आज व्यवसाय सुरू करताना पारंपरिक कुणीतरी डोक्यात एक खूळ घालून ठेवले आहे की व्यवसायात पहिले अनेक दिवस काहीही उत्पन्न मिळत नाही सगळे अंगावर काढावे लागते ही कन्सेप्ट मार्केटमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात रुजली आहे की आता अनेक लोक त्यामुळे पहिले काही महिने खरं तर स्वतःहून काही सुद्धा efforts घेत नाहीत..
असे करून आपले घर कसे चालणार आपण आपल्या लोणचा हप्ता कसा फेडणार मुलांच्या फी कशा भरणार या सहा महिन्यात जर काही मेडिकल इमर्जन्सी आली तर ती कशी सोडवणार याचे उत्तर अनेक नवउद्योजकांकडे नसते..
मला असे वाटते पहिल्या दिवसापासून आपण आपला बिजनेस कसा वाटेल याच्यावरती विचार करायला हवा..
जसे नोकरीत सेटल व्हायला वेळ लागतो तसा थोडा वेळ आपल्याला व्यवसायात सेटल व्हायला लागेल ही खरी आहे मात्र आर्थिक तोटा प्रचंड सहन करावा लागेल हे मात्र अत्यंत चुकीचे आहे…
तुमची इच्छा असेल तर तुम्ही पहिल्या दिवसापासून व्यवसाय मध्ये पैसे कमवू शकतात मात्र त्यासाठी मानसिक तयारी असायला हवी..
खरं तर बिजनेस हा दुसरे काही नसून तुमच्या मनाची तयारी या एका गोष्टीवर ते सगळ्यात जास्त अवलंबून आहे असे मला स्पष्ट वाटते…
त्यामुळे day 1 पासून नक्की विकायचं कसं याचे परिपूर्ण नियोजन ( Business Planning ) आपल्याकडे असायलाच हवे मग तो मसाला उद्योग असो किंवा आपले एखादी छोटेसे दुकान असो..
किंबहुना बिझनेस सुरू करण्यापूर्वी विकायचे कसं याचा परिपूर्ण प्लॅन तुम्ही तयार करून ठेवायला हवा म्हणजेच सुरू झाल्यानंतर आता काय करायला हवे याच्या वरती विचार करण्याची फारशी गरज पडणार नाही..
आम्ही एवढ्यातच चावडीमध्ये विकायचं कसं असा स्पेशल प्रोग्राम सुरू केला आहे ज्यामध्ये प्रमुख्याने एखादा प्रॉडक्ट किंवा व्यवसाय निवडला तर ते प्रॉडक्ट विकायचे कसे किंवा त्या बिजनेस ची मार्केटिंग कशी करायची यावर ती guidance केला जातो.
तुम्हीसुद्धा चावडीच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात..
यासाठी तुम्हाला सोबत एक नंबर देत आहे 8788338221 या नंबर वर संपर्क साधा तुमच्या प्रॉडक्ट विषयी चर्चा करा आणि चावडीच्या paid zoom seminar मध्ये जॉईन करा..
फी 750 रुपये..
(फुकट किंमत नसते म्हणून ही किंमत आहे, वायफळ लोकांना दूर ठेवण्यासाठी सर्वोत्तम पर्याय)
विचार करा ..अवलंब करा स्वतःच्या उद्योगात वाढ करा..
अमित मखरे.
www.chawadi.com
Stay Updated…
Other Blogs
Follow Us On Facebook And Instagram
For More Information Please Call Us On 7272971971
0 responses on "बिझनेस करताना किती पैसे कमवायचे याचे नियोजन केले का ??"