व्यवसायाचे व्यवस्थापन

Business Management

व्यवसायाचे व्यवस्थापन

“कल्पना सत्यात उतरविण्यासाठी स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा”

  •       व्यवसायाचे व्यवस्थापन करताना नेहमीच व्यवसाय संबंधित असलेल्या माहितीचा विचारपूर्वक विचार करून त्याचे एक प्रकारे नियोजन आखून व्यवसाय केला गेला पाहिजे,जेणेकरून व्यवसायात ताळमेळ बसतो.आता नेमकं व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय? ते पाहू 

                  व्यवसायासाठी व्यवस्थितरीत्या केलेल्या कामाची, वेळेच्या नियोजनाची ,संघटनात्मक समन्वय आणि नियंत्रणाची एक सार्वत्रिक प्रक्रिया म्हणचेच व्यवस्थापन ”

क्षेत्र कोणतेही असो सामाजिक, राजकीय,संस्कृतीक व शैक्षणिक यात व्यवस्थापनेला सर्वाधिक महत्त्व दिले जाते.रोजच्या दैनंदिन जीवनात स्वतःच्या व्यवस्थापनाला ही खुप महत्त्व आहे, व्यवस्थापनाशिवाय कोणतीही गोष्ट पूर्णत्वाला व्यवस्थितरीत्या जात नसते, त्यामुळे व्यवस्थापन हे प्रत्येकालाच करावे लागते. व्यवस्थापनाप्रमाणेच नेहमी होईल असेही नसते.  व्यवस्थापन हे गतिमान व लवचिक असल्यामुळे केलेलं व्यवस्थापन काही अडचणीमुळे बदलू ही शकते. व्यवस्थापनाच्या अनेक संज्ञा आहेत, ज्यातून व्यवस्थापन म्हणजे काय हे कळते लोर्ड जॉर्ज यांच्या संज्ञा नुसार व्यवस्थापन म्हणजे “आपण हाती घेत असलेल्या प्रत्येक कृतीमध्ये समन्वय किंवा एकसंधपणा आणणारा एक घटक अंतर्भूत असतो.एकसंधपणाशिवाय आपल्या कृती परिणामशून्य,अडथळणाऱ्या स्वैर आणि अनुत्पादक होतील,आपल्या  कृतीमध्ये योजना,उद्दिष्टे व एकसंपणा आणणाऱ्या घटकाला व्यवस्थापन असे त्यांनी संबोधले आहे.” ही व्याख्या व्यवस्थापनाची कार्य स्पष्ट करते त्याचप्रमाणे उद्दिष्टेही कर्मचाऱ्यांच्या संघटित प्रयत्नांनीच गाठली जातात हे ही सांगते.

व्यवस्थापनेतील व्यवस्थापकाचे महत्व : 

 व्यवसाय कसा केला पाहिजे त्यात काय काय केलं पाहिजे हे ठरवण्यासाठी व्यवस्थापन जे करतात ते व्यवस्थापक असतात.मग व्यवस्थापक नेमकी करतात तरी काय? तर ते व्यवसाय वाढीसाठी तसेच व्यवसायच्या प्रगतीसाठी व्यवसायची धोरणे निश्चित करतात त्या  धोरणांची अंबलबजावणी आपल्या कर्मचाऱ्यांकडून करून घेणे ,त्यांसाठी  कर्मचाऱ्यांची संघटना राबवून आपल्या व्यवसायाची विविध कृतीतुन समनव्य साधने आपल्या कर्मचाऱ्यांच्या गटाचे नियोजन करून कामाचा मेळ घालणे इ. कामे व्यवस्थापक सर्वांना सांभाळून करत असतो. व्यवस्थापक निश्चित उद्दिष्टंच्या पुर्ततेच्या दिशेने त्याच्या कर्मचाऱ्यांच्या  प्रयत्नांचे संचालन करतो,त्यांना प्रेरणा देऊन,मार्गदर्शन करून त्यांच्यावर नियंत्रण ठेवून त्याच्याकडून कामे करून घेतो, तोच व्यवस्थापक असतो.व्यवस्थाच्या विकासासाठी एकत्रितपणे ,कर्मचाऱ्यांना एखाद्या व्यवसायाचे उद्दिष्टे गाठण्याच्या आणि त्या पूर्णत्वाला नेण्याची प्रक्रियांचे नियमन करत व्यवस्थापक त्या त्या गटांच्या कर्मचाऱ्यांना एकत्रितपणे घेऊन व्यवसायला वाढवत असतो.

व्यवस्थापनेचे तत्त्वे:

१) कार्याचे विभाजन –

आपल्या व्यवसायातील विविध कार्याची मांडणी त्या त्या व्यवसायेच्या विभाजेनेनुसार विभाजन करून प्रत्येक कृती एका किंवा अनेक त्या त्या क्षेत्रातील तज्ञ कर्मचाऱ्यांनकडे त्या त्या क्षेत्राची कामे सोपविल्यामुळे कामगारांच्या कार्यक्षेत्रात बरीच वाढ होते, या विभाजनामुळे विशेषीकारणाला वाव मिळते व उत्पादकता वाढ होते.

२) अधिकार व जबाबदारी –

व्यवसायात जेव्हा एखाद्या व्यक्तीवर जबाबदारी सोपवली जाते, तेव्हा त्या व्यक्तीला त्या अधिकारा देणे आवश्यक असते. त्या अधिकारशिवाय ती जबाबदारी पार पाडणे अशक्यच असते. अधिकार आणि जबाबदारी या एकाच पैलूंच्या दोन बाजू आहेत , त्याच्यात संतुलन टिकवून ठेवणे हे व्यवस्थापकाचे काम असते.

३) शिस्तबद्धता –

व्यवसायात सर्व कर्मचाऱ्यांकडून शिस्तबद्ध आचारणांची अपेक्षा ही व्यवस्थापकाला असते.त्या शिस्तीमुळे त्या व्यवस्थापकांची कार्याची आणि त्या गटाची योग्यता त्यांतून दिसुन येते.व्यवसायात शिस्त जोपासणे ही व्यवस्थापनाची जबाबदारी असते.

४) एकात्मता –

व्यवसायात सर्व कामगारांत जर एकीची भावना असेल तर त्या व्यवसायात उत्पादनात वाढ ही होतेच , व्यस्थापकाचे काम किंवा कार्य हे सामूहिक व संघटित प्रयत्नांचे फळ असते.यालाच एकी हेच बळ असे संबोधले जाते.

                                                                                        –  मधुरा जोशी

“व्यावसायिक ज्ञानाचा पाया भक्कम करा आणि स्वतःचा विकास घडवा.”

March 26, 2021

0 responses on "व्यवसायाचे व्यवस्थापन"

Leave a Message

All Right Reserved.