बॉक्स निर्मिती उद्योग -रोज मागणी असणारा उद्योग

बॉक्स निर्मिती उद्योग – Box manufacturing Business
Box manufacturing Business – आजचा जमाना हा branding आणि मार्केटिंग चा आहे. आज प्रत्येक छोटा, मोठा उद्योजक वेगवेगळ्या युक्त्या लढवून आपल्या ब्रांड चे मार्केटिंग करीत असतो पण फक्त मार्केटिंग करून जमत नाही तर मालाचे पेकेजिंग सुद्धा तितकेच चांगले हवे आणि माल किती जरी चागला असला तरी तो योग्य पद्धतीमध्ये ग्राहकांपर्यंत पोहोचणे सर्वात महत्वाचे  आहे आणि या कामासाठी सर्वात महत्वाचे ठरतात ते म्हणजे
कोरूगेटेड बॉक्स
 बाजारा मध्ये आपण विविध प्रकारचे बॉक्स पाहवयास मिळतात. या बॉक्स मध्ये प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. एक पुठ्ठाचा बॉक्स, तर दुसरा लाकडी बॉक्स. लाकडी बॉक्स पेक्षा पुठ्ठ्याच्या बॉक्सला फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे, आणि अत्यल्प भांडवलात हा व्यवसायही उभा राहतो. अनेक बेरोजगार युवकांसाठी हे उत्तम रोजगाराचे साधन म्हणून या उदयोगाची निर्मिती चांगल्या प्रकारे होऊ शकते. कमीत कमी भांडवलात, मागणी प्रमाणे पुरवठा करावयाचा असल्याने माल खराब होईल किंवा नुकसान होईल अशी भिती या उदयोगा मध्ये दिसून येत नाही.
बॉक्स निर्मिती उद्योग हा उद्योग सुरु करण्यापूर्वी  हे लक्षात घ्यायला हवे कि , आज अनेक व्यापारी ,कारखानदार आपली  वस्तूला पॅकींग करर्ण्यासाठी कोरूगेटेड बॉक्स वापरतात .चहा पावडर पॅकींग करण्यासाठी , स्विटमार्ट्समध्ये मिठाई पॅक करण्यासाठी , कापडाचे व्यापारी कापडपॅकींग  करण्यासाठी इलेक्ट्रीक साधने करण्यासाठी .काचेचे सामान पॅकींग करण्यासाठी , औषधाच्या कंपन्या औषधे पॅकींग करण्यासाठी, खाद्यपदार्थ .बिस्कुट .माचिस . अन्न प्रक्रीया उद्योग .फ्रीज टिव्हीसारखे महाग वस्तू सुद्धा बॉक्समधे पॅक करतात
आज मॉलमधे , मेडीकल दूकानात , स्विटमार्ट किंवा अगदी छोट्याश्या किराणा दुकानात  किंवा बेकरी मध्ये केक आणि इतर गोष्टी pack करण्यासाठी बॉक्स वापरतात .हे बॉक्स बनवण्यासाठी तयार शिटस् आणून बांधणी केली जाते .पुठ्याचे शिटस पाहीजे त्या आकारात  जर क्रीझींग मशिनच्या साहाय्याने कटपीस तयार केले व योग्य आकाराचे ठिकाणी मार्कींग करून बॉक्स फोल्डींग करून बॉक्स तयार केला तर कोरूगेटेड बॉक्स तयार होतो या कोरूगेटेड बॉक्समुळे मालाला सुरक्षीतता मिळते.कोरूगेटेड बॉक्स निर्मितीला आज चांगले दिवस आहेत .कमी जागेमधे जास्त प्रमाणात माल साठवण्यासाठी कोरूगेटेड बॉक्सचे उपयोग कारखानदार  लहान मोठे दुकानदार करत असतात.

बॉक्स विषयक –

पुठ्ठाचा बॉक्स तयार करण्यासाठी मोठया प्रमाणात पुठ्याची गरज भासत असते. तर बॉक्स तयार झाल्यावर तो आकर्षक बनविण्यासाठी रंगीत कागदाची सुध्दा अधिक प्रमाणात गरज भासते. कागद बनविणाऱ्या कंपन्याकडे किंवा ठोक विक्रेत्यांकडे आपणांस हव्या त्या जाडीच्या, बॉक्स साईजप्रमाणे  हाताने कटिंग करूनही तयार करतात.थोड्या प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. मोठे बॉक्सेस तयार करण्याकिरता बॉक्स स्टिचींग मशिन, क्रीझिंग व कटींग मशीन बोर्ड शिअरिंग मशीन, कोपरे कटींग करणेचे मशीन अशा यंत्रीची आवश्यकता असते.

सर्व प्रकारचे उद्योजक उत्यादक .व्यापारी  .विक्रेते .यांचेकडून कोरूगेटेड बॉक्सला नियमित मागणी आहे .वरती सांगितल्याप्रमाणे जिथे जिथे बॉक्स लागतात अशा लोकांना तुम्ही भेटून जर तुम्ही चौकशी केली तर तुमच्या लक्षात येईल कि यासर्व लोकांना नियमित  पॅकींग मटेरीयल लागते. सर्वसाधारण या उद्योगात  १५-२० % मार्जिन आहे .

 प्रत्येक व्यापाऱ्याला, दुकानदाराला, कंपनी, कारखाने, छोटे व मोठे लघुउद्योग यांना आपल्या उत्पादनाच्या, मालाच्या पॅकिंगकरिता अत्यावश्यक असणारी गरज बॉक्स पॅकिंग. अनेक ठिकाणी आपण दैनंदिन गरजेकरिता बरीचशी उत्पादने खरेदी करत असतो, त्यावेळी बराचसा माल आपल्याला बॉक्स पॅकिंगमध्ये येतो. उदा. मिठाई, औषधे, पिझ्झासारखे अन्नपदार्थ, बेकरी उत्पादन, चप्पलस्, शुज, टाचण्या, बिस्कीट, स्टेशनरी, साहित्य इत्यादी. बॉक्स पॅकिंगमध्ये मिळतात. त्यामुळे यांची मागणी मोठया प्रमाणात दिसून येते.

प्रकल्प विषयक –

इन्व्हेस्टमेंट

हा उदयोग आपणांस मोठ्या स्वरूपात  उभारायचा असेल तर अंदाजे ४-५  लाख रूपया पर्यंत खर्च येते, यात क्रीझींग मशिन, स्टीचिंग मशिनची गरज भासते. या उदयोगासाठी साधारण २ ते ३ लोकांचे मनुष्यबळाची आवश्यकता असते.

    या उदयोगासाठी बँक आपली पत पाहून कर्ज पुरवठा करते.  हा उदयोग उभारल्यास आपणास चांगला फायदा होऊ शकतो तसेच आपण यशस्वी उदयोजक बनू शकता.

बँक कर्ज आणि शासकीय योजना 
हो तुमची पत पाहून बँक कर्ज मिळू शकते तसेच जिल्हा उद्योग केंद्र किंवा खादी ग्राम विभागकडून हा प्रकल्प उभा करण्यासाठी शासकीय मदत सुद्धा उपलब्ध होवू शकेल.

या अनुषंगाने चावडी ने पुणे येथे २ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला असून त्या मध्ये या उद्योगाविषयी जसेकी कच्चा माल कुठून घ्यावा , मशिनरी , शेड ,बनवण्याची प्रक्रिया , बाजारपेठ ,तसेच बँक कर्ज ,अनुदान विषयी योजना याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.

जेवणाची सोय चावडी तर्फे करण्यात येणार असून प्रशिक्षण प्रमाणपत्र देण्यात येईल.

अडमिशन घेण्याची अंतिम तारीख २३ जुलै असून आजच आपला प्रवेश निश्चित करावा.

त्या साठी खाली दिलेल्या ग्रीन बटन वर क्लिक करा.

March 30, 2021

5 responses on "बॉक्स निर्मिती उद्योग -रोज मागणी असणारा उद्योग"

  1. खौप छान माहीती ..प्रशिक्षण कुठे भेटेल माहीती द्या

  2. Ajun mahiti pahije

  3. Nice work

  4. I’m interested in doing this business. Need more information. Where and when can I meet you?

  5. हयाला invesment कितीआणि कसे सहभागी व्हायचे

Leave a Message

All Right Reserved.