बिझनेस वाढवण्यासाठी बूस्टर टिप्स – Booster Tips to Grow Business
आज प्रत्येक उद्योजक आपल्या परीने उद्योग वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो. आजपर्यंत चावडी च्या माध्यमातून उद्योजकांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. यापुढे ज्यांनी आपला व्यवसाय सुरू केला केला आहे आणि आता वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्यांसाठी खास मार्गदर्शनपर पोस्ट केल्या जाणार आहेत.
तुम्हाला हे माहीतच असेल की, तोंडी जाहिरातीच्या माध्यमातून व्यवसायाची प्रसिद्धी करणे हा तुमचा Business वाढविण्याचा सर्वात जबरदस्त मार्ग आहे.
चावडी चे Affiliate बना,सोशल मिडिया वर मेसेज शेयर करा,अधिकचे उत्पन्न कमवा.अधिक माहितीसाठी या लिंक वर क्लिक करा.
त्या बरोबरच आणखी काही मार्गांची माहिती सोबत देत आहे.ज्याचा तुम्हाला बिझनेस वाढीसाठी मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
- जे लोक आजवर तुम्हाला सहकार्य करतात किंवा तुम्हाला इतर कुणाकडे refer करतात त्यांना अत्यंत कमी रेट मध्ये किंवा शक्य असेल तर मोफत सेवा द्या.–
समाजातील प्रतिष्ठीत लोकांना आणि सेवा प्रदात्यांना मोफत सेवा देणे म्हणजेच लोकांमध्ये प्रसिद्ध होण्याचा आणि बिझनेस वाढवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. जो तुमचा संभाव्य क्लायंट आहे त्यासाठी तुम्ही अशी सेवा दिल्यास त्याचा मोठा फायदा होईल.
- मोफत किंवा सवलतीमध्ये सेवा देण्यासाठी गिफ्ट कार्ड्स द्या –
विविध संघटना ,संस्था ,मंडळे ,सांस्कृतिक कार्यक्रम आयोजक नेहमी विशेष कार्यक्रमांसाठी कुठून निधी मिळतोय का ते पाहत असतात. तुम्ही दिवसाची, आठवड्याची किंवा वर्षाची कोणतीही वेळ निवडून कार्यक्रमावेळी लोकांना मोफत गिफ्ट कार्ड्स देऊ शकता किंवा सवलतीमध्ये आपल्या सेवा प्रदान करू शकता. असे केल्याने तुमच्या नावाचा त्या संस्थेकडून प्रचार केला जाईल आणि जेव्हा तुम्ही मोफत सेवा द्याल तेव्हा तुमचा व्यवसाय इतर उद्योजकांच्या नजरेस येईल. जर तुम्ही तुमच्या सेवा उत्तमरीत्या प्रदान केल्या तर तुम्हाला कदाचित क्लायंट मिळू शकतो किंवा कोणी तुमची शिफारस करू शकते. आणि जर नशीब मेहरबान असेल तर या दोन्ही गोष्टी तुमच्या पदरात पडू शकतात.
- दुसऱ्या उद्योजकांना मदत करा ते तुम्हाला मदत करतील.-
हा निसर्गाचा नियम आहे .तुम्ही इतर कुणाला मदत केली तर आज किंवा उद्या तोही तुम्हाला मदत करेल
- अभिप्राय मिळवा –
तुम्ही जेथे कुठे तुमची सेवा प्रदान कराल तेव्हा दरवेळेस तेथून तुमच्या सेवेबद्दल अभिप्राय घेण्यास विसरू नका. अनेक क्लायंट्स त्यांचा अभिप्राय देत नाहीत कारण तुम्ही अभिप्राय देण्याइतकं त्यांना खुश केलेलं नसतं. तुमच्या भेटीवेळी किंवा फोन कॉल वेळी फक्त एक पेन आणि पेपर घेऊन बसा आणि तुमच्या क्लायंटला विचारा की तुमच्या सेवा किंवा उत्पादनांमुळे त्यांना कसा फायदा झाला. त्यांचे अभिप्राय लिहून घ्या आणि पुन्हा ते टाईप करून त्यांची मंजुरी घेण्यासाठी त्यांना इमेलद्वारे पाठवा.
- शक्यतो तुमच्याकडील उत्पादने इतरांना भेटवस्तू म्हणून द्या.
जर तुम्ही एखाद्या वस्तूचे उत्पादन करत असाल तर कोणत्याही शुभकार्याला जाताना मग ते लग्न असो वाढदिवस असो काही आनंदाचा प्रसंग असो तुम्ही भेटवस्तू घेऊन जातात बुके घेऊन जातात त्या ऐवजी जर तुमच्याकडे उत्पादित केलेले प्रॉडक्ट जर तुम्ही भेट म्हणून दिले तर आपोआप तुमच्या उत्पादनांचे मार्केटिंग होतो आणि तुमचे उत्पादन सगळ्यांच्या सहज लक्षात राहते..
तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचं असेल तर चावडीच्या CBN नेटवर्कमध्ये सामिल व्हा आणि 10X पटीने वाढवा. माहितीसाठी कस्टमर केअरला फोन करा ..
Stay Updated…
Other Blogs
Follow Us On Facebook And Instagram
For More Information Please Call Us On 7272971971
0 responses on "बिझनेस वाढवण्यासाठी काही बूस्टर टिप्स"