• No products in the cart.

शेतमाल निर्यात – सद्यस्थिती व भविष्यातील संधी…!!!

शेतमाल निर्यात(Agricultural Goods Export) – सद्यस्थिती व भविष्यातील संधी…!!!
देशाचा आर्थिक विकास आठ टक्क्यापेक्षा जास्त वेगाने करावयाचा तर शेतीक्षेत्राचा विकास किमान चार टक्क्याने व्हायला हवा असे तज्ञांचे मत आहे. कारण शेती हा आजही अनेकांना रोजगार पुरविणारा, त्यांची भुक भागविणारा, त्यांना जगण्याचे साधन उपलब्ध करून देणारा व्यवसाय आहे. साहजिकच शेतीचा विकास समाजाच्या एक मोठ्या भागाची क्रिया शक्ती वाढवून त्या इतर उद्योग सेवांच्या विकासाला गती देऊ शकतो या मुद्याचे सखोल विश्लेषण करतांना नियोजन आयोगला असे आढळून आले की शेतीचा विकास चार टक्कापर्यंत पाहोचला तरी केवळ उत्पादन वाढवून चालणार नाही तर त्यात सातत्य टिकवुन ठेवण्यासाठी शेती उत्पादनांच्या मागणीमध्ये वाढ होणे गरजेचे आहे. त्यासाठी एकतर निर्यातीचे प्रमाणत वाढविणे अथवा सर्वसमान्य जनतेचे शेतमालाच्य वापराचे प्रमाण वाढविणे असे दोन उपाय आहेत. पैकी सर्वसामान्य जनतेच्या मागणीत वाढ करण्यासाठी अनेक उपायोजना केल्या जात आहेत. मात्र हा थोडा किचकट आणि वेळखाऊ मार्ग आहे. कृषि निर्यातीमध्ये मात्र वेगाने प्रगती करण्याला मोठा वाव आहे.  हे क्षेत्र शेतकरी हाताळणी व प्रक्रिया उद्योग वाहतुक व इतर सुविधा आणि निर्यातदार यांच्यासाठी अत्यंत आकर्षक असे आहेत.
गेल्या  काही वर्षात शेतमालाच्या निर्यातीत सातत्याने वाढ होत असली तरी त्यामध्ये वैविध्य कमी दिसुन येते. काही ठराविकच मालाची निर्यात ठराविक देशांना होतांना दिसते. याचा अर्थ निर्यात ही शक्य आहे. दुसरा महत्वाचा भाग असा की बहुतेक शेतमाल व्यापाऱ्यांना मार्फत निर्यात होता.  हे व्यापारी निर्यातयोग्य माल निवडुन बाजुला काढतात. साहजिकच नफ्याचा मोठा हिस्सा व्यापाऱ्यांनाच मिळतो. उत्पादक शेतकऱ्याला निर्यातीमुळे अधिक उत्पन्न मिळत नाही. त्यासाठी शेतकऱ्यांनीच एकत्र येऊन निर्यातीसाठी शेतमाल पिकवणे व आपणच ती निर्यात करणे हाच मार्ग आहे.  युरोप आणि अमेरिकेसाहित अनेक देशांना निर्यात करतांना आता काही दर्जा व नियमाचे पालन करावे लागते. हे काम देखील शेतकरी गटांना एकत्र येऊन करू शकतात. त्यासाठी द्राक्ष, आंबा, डाळींब अशा काही पिकांची उदाहरणे आपल्यासमोर आहेत.

शेतमाला निर्यातीच्या(Agricultural Goods Export) संधी कशा आहेत याचा विचार करतांना आंबा, द्राक्षे, डाळींब, लिची अशी काही फळे आणि कांदा व इतर भाजीपाला ही नावे प्रामुख्याने डोळ्यासमोर येतात. यात अनेक नावांची भर निश्चित पडु शकतो. शेतकऱ्यांचा सहभाग आणि पायाभुत सुविधांचा विस्तार यातुन हे निश्चितच शक्य आहे.
निर्यातीच्या दृष्टीने आंबा हे सर्वात महत्वाचे फळ आहे. जगातिक उत्पादनामध्ये त्याचे उत्पादन भारतात  जास्त प्रमाणात  होते. जागतिक बाजारात भारतातला  प्रतिस्पर्धी निर्यातदार आहेत.  मेस्किको, केनिया, कोस्टारिका आणि बुर्किना फासो. शिवाय हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात पाकिस्तानचा आंबाही स्पर्धेत उतरतो. मोक्सिकोने आंबा निर्यातीसाठी मजबुत उभारणी करून ठेवलेली आहे. सर्वात महत्वाच्या अशा युरोपियन बाजारपेठेत भारताचा वाटा केवळ २.५ टक्के इतकाच आहे. कारण तेथील  ग्राहकांना इतर देशांतील आंब्याची ओळख झालेली आहे. त्या बाजारात भारताचा पिवळ्या गराचा आंबा फारसा परिचित नाही.  भारतातुन निर्यात करण्यामध्ये असलेल्या अडचणी मध्ये समुद्रमार्गे निर्यातीसाठी आवश्यक तंत्रज्ञान व सुविधेचा वानवा आहे. सुमार दर्जा, व्यवस्थापन, आक्रमन विक्रीचे तंत्र आणि पाकिस्तानासारखे  देशामध्ये होत असलेल्या भाड्यातील सवलती या प्रमुख अडचणी आहेत.
द्राक्ष हे जागतिक बाजारात मोठी उलाढाल करणारे फळ आहे. भारताचा वाटा मात्र एक टक्क्याहुनही कमी आहे. अमेरिका व युरोप या बरोबरच आखाती देश हे महत्वाचे आयातदार आहेत. भारतात जेव्हा हंगाम ऐन भरात असतो.  तेव्हाच चीन, द.आफ्रिका आणि इस्त्राईलची द्राक्षे बाजारात येतात. भारतातुन निर्यात होणारी दाक्षे मोठ्या प्रमाणावर आखतील देशांना जात असली तरी तिथे प्रामुख्याने अमेरिका, द आफ्रीका, ऑस्ट्रोलिया आणि चीनमधुन द्राक्षे येतात. युरोपातील जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड, नेदरलॉन्ड, बेल्जियम आणि स्विडन हे प्रमुख आयतदार असले तरी भारतीय द्राक्षे इंग्लड मध्ये काही  प्रमाणात जर्मनीच्या पालिकडे अद्याप पाहोचलेली नाहीत. इतरही शेतमालाच्या निर्यातदार व्यापाराचे असे विश्लेषण करता येईल. मात्र याचा अर्थ असा की भारताला निर्यातीसाठी अनेक संधी उपलब्ध असल्या तरी त्यांचा लाभ घेण्यामध्ये काही अडचणी आहेत.
कोणत्या शेतमालाच्या निर्यात व्यापाराचे असे विश्लेषण करता येईल. मात्र याचा अर्थ असा की भारताला निर्यातीसाठी अनेक संधी उपलब्ध असल्या तरी त्याचा लाभ घेण्यामध्ये काही अडचणी आहेत.

  • कोणत्या देशात कोणत्या मालाला मागणी आहे. याबाबत नेमक्या माहितीचा अभाव.
  • उत्पादन केंद्र आणि बंदरे यांना जोडणाऱ्या हाताळणी व वाहतुक सुविधांचा अभाव.
  • काढणीपुर्व व काढणीपश्चात व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना वाहतुक सुविधांचा अभाव.
  • काढणीपुर्व व काढणीपश्चात व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनाचा अभाव.
  • शेतमालाचे दर्जानुसार वर्गीकरण, योग्य  पॉकिंग इत्यादी बाबींसाठी माहिती, सुविधा व मार्गदर्शनाचा अभाव.

तसे पाहाता भारतातील सुपिक शेतजमीन, शेतमालाची  उत्पादनांतील विविधता, उपलब्ध असलेले मेहनत करणारे व तांत्रिक मनुष्यबळ, हवाई व सागरी बंदरांच्या सुविधा या सर्व बाबी निर्यातीला पोषक अशा आहेत. उत्पादक शेतकरी आणि धोरणकर्ते यांनी एकत्र येऊन वर उल्लेख केलेल्या अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न केल्यास भारताची शेतमाल निर्यात निश्चित वाढुन, शेतकऱ्यांना आधिक उत्पन्ना बरोबर देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल.
कृषिमाल निर्यात(Agricultural Goods Export)कोण करू शकतो
कृषिमालाची निर्यात स्वत:उतपादक शेतकरी, संस्था कंपनी, व्यापारी करू शकते.
कृषीकाल निर्यातदार बनण्याकरिता आवश्यक गोष्टी – नव्याने कृषीमाल निर्यात करताना निर्यातदाराच्या मनात प्रश्न निर्माण होतात, की खरेच आयातदार खात्रीचा आहे का व तो आपले पैसे देणारा किंवा नाही ? त्याप्रमाणे आयातदारदेखील नवीन निर्यातदाराकडून माला खेरेदी करताना त्याबाबत सांशक असतो. निर्यातदार खात्रीशीर व गुणवत्तेचा मालपुरवठा करणार का ? ज्या प्रमाणात मालाची आवश्यकता आहे, त्या प्रमाणात पुरवठा होईल का ?, विविध कागदपत्रांची व प्रमाणीकरणाची पूर्तता करणार का ? याची खात्री झाल्यावरच व्यवहार करण्यास तयार होतो.
         फळे भाजीपाल्याच्या निर्यातीसाठी :–
युरोपिय युनियनमध्ये फळे व भाजीपाला आयात होताना त्यांची योग्य प्रकारे प्रतवारी, तसेच योग्य ती प्रमाणपत्रेजोडली आहेत का ? याची तपासणी केली जाते, त्यानुसार फळे व भाजीपाल्याची निर्यात युरोपियन देशांना करताना अॅग् मार्क  प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात ओलेले आहे. गेल्या काही वर्षांपासूनत परदेशात फळे भाजीपाल्यांची निर्यात करताना विविध प्रमाणपत्रांची गरज लागते. त्यामध्ये अॅग् मार्क अत्यंत महत्व आहे. यासाठी विविध पातळ्यांवर कृषिमालाची तपासणी केली जाते.
भारताचा विचार करता युरोपियन कमिशनने कमिशन रेग्युलेश ईसी नं ७६१/२००३, दिनांक ३०/०४/२००३ अन्वये युरोपियान देशांना आयात करण्यात येणाऱ्या फळे व भाजीपाल्याकरिता तपासणी अथॉरिटी म्हणून विपनण व तपासणी संचालनालय, नवी दिल्ली यांना संमती दिलेली आहे.

 

Stay Updated…
Other Blogs
Follow Us On Facebook And Instagram
For More Information Please Call Us On 7272971971

March 31, 2021

0 responses on "शेतमाल निर्यात - सद्यस्थिती व भविष्यातील संधी…!!!"

Leave a Message

Contact Details

Contact No: +917272971971
Comany Name : Chawadi Training and Consultancy Pvt. Ltd.
Adress: First Floor, Radha House Building, Tapovan Rd, Nirmal Nagar, near Laxmi nagar kaman, Savedi, Tal. Nagar, Dist- Ahilyanagar 414003, maharashtra ,India
top
All Right Reserved.