कृषी पर्यटन ……!!!!!!

कृषी पर्यटन(Agri Tourism)……!!!!!!
कृषी पर्यटन म्हणजे शेतावरील फेरफटका, आपल्या संस्कृतीची ओळख, आनंद, शहरी जीवनशैलीचा उबग आलेल्या लोकांनी चार दिवस शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन राहणे व शेतकऱ्याने शहरी लोकांचा सशुल्क पाहुणचार, आदरतिथ्य करणे म्हणजे कृषी पर्यटन होय. हा पर्यटनाचा नवीन, चेहरा, कृषी पर्यटनातून ग्रामीण विकास आणि ग्रामीण विकासातून महाराष्ट्राचा विकास या ब्रीद वाक्याला साजेसे कृषी पर्यटन. शेती व्यवसाय जोड व्यवसाची साथ देऊन उत्पादनांत भर घालता येणारा प्रकल्प म्हणजे कृषी पर्यटन होय.

कृषी पर्यटन(Agri Tourism) म्हणजे काय  ?
सध्या सर्वात मोठ्या व्यवसाय म्हणूल लोक पर्यटन या व्यवसायाकडे वळत आहे. त्यात प्रामुख्याने महाराष्ट्रात विविध कृषी पर्यटन(Agri Tourism) मोठ्या नावारूपास येत असल्याने मुळे अनेक लोक या पर्यटनास पसंती देत आहे.  त्यामुळेच सर्वत्र कृषी पर्यटन हा एक नवीन व्यवसाय उदयास येत आहे. कृषी पर्यटन या व्यवसायाची सुरूवात जगात ऑस्ट्रेलिया येथे ६५ वर्षापूर्वी झाली. तर महाराष्ट्रात प्रथम बारामती येथे कृषीतज्ञ स्व.आप्पासाहेब पवार यांनी केलेले शेतीमधील नवीन्यापूर्ण प्रयोग, कृषी संशोधन पाहण्यासाठी येणाऱ्या निशुल्क राहण्याची, भोजनाची सोय याच ठिकाणी केली जाते होती. मात्र आत शुल्क आकारून  प्रवेश दिला जात आहे. यालाच कृषी अभ्यास दौरा म्हणून सर्वत्र ओळखले जाते.

व्यवसाय :- 
१६ मे हा जागतिक ‘कृषी पर्यटन दिन’ म्हणून साजरा केला जातो. सध्या महाराष्ट्रात कृषी पर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढीस येत आहे. शेतकर्‍यांमध्ये होणारी जागृती, शेतीपूरक उत्पन्नाचे साधन म्हणून याकडे बघितले जात असल्याने दिवसेंदिवस कृषी पर्यटन व्यवसाय चांगलेच मूळ धरून बहरू लागला आहे.  सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात शहरी करण वाढत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांचा निसर्गाकडे जाण्याचा ओढा हा दिवसेदिवंस वाढत आहे.  कमी भांडवली खर्च करून हा शेतीपुरक व्यवसाय आपल्याल उभारता येतो. पर्यटना मध्ये निसर्गाची हानी न होऊ देता पर्यावरणाचा समतोल राखून पर्यटनांचा आनंद देणारे केंद्र विविध ठिकाणी सुरु झाली आहे. आज महाराष्ट्रात ३०० पेक्षा जास्त अधिक कृषी पर्यटन केंद्र सुरु आहेत. या व्यवसायाचा प्रमुख उद्देश म्हणजे विविध पर्यटकांना ग्रामीण जीवनाची ओळख, करून देणे व शहरातील पैसा हा ग्रामीण भागाकडे वळविणे हा प्रमुख उद्देश असते. तसेच या व्यवसायातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते. या कृषी पर्यटनाकडे जर आपण एक व्यवसायिक म्हणून बघितले तर आपल्याला शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्ना पेक्षा जास्त पैसा या व्यवसायातून मिळू शकते.

लोकप्रियता :-
या कृषी पर्यटन सध्या मोठ्या प्रमाणात नावारूपस येत आहे. या व्यवसायामुळे शेतकऱ्याला शेतीतून मिळणाऱ्या पैशा पेक्षा या व्यवसायाच्या माध्यामातून मोठ्या प्रमाणात तो पैसा उभारू शकते. त्यामुळेचे या कृषी पर्यटनालावाव मिळावा या हेतून शासनाने विविध योजना आणि भविष्यातील या क्षेत्रातील वाढती मागणी याची  दखल घेऊन आपल्या कडील प्रत्येक शेतकर्‍याने कृषी पर्यटनास सुरुवात करण्यासाठी शासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात योजना राबवत आहे. खरंतर कृषी पर्यटन ही परदेशी संकल्पना आहे. ब्राझील, न्यूझिलंड, ऑस्ट्रेलिया या देशात ती खूप लोकप्रिय आहे. आपल्या देशातही आता ही  मोठ्या नावारूपास येत आहे. मात्र योग्य नियोजन आणि दूरदृष्टीने या गोष्टीकडे पाहिले तर भारत हा कृषी पर्यटनात पहिल्या क्रमांकाचा देश म्हणून उदयास येण्यास जास्त वेळ लागणार नाही. असे अनेक प्रगतशील शेतकरी मोठ्या आभिमानाने सांगतात.

या गोष्टीसाठी मिळते कर्ज :-  
               जमीन सपाटीकरण, ऍप्रोच रोड, तलाव, शेततळी उभारणी, पाणी टाकी, पाइपलाइन, कॉटेज, रूम बांधणी, डायनिंग हॉल, फर्निचर खरेदी, किचनमधील उपकरणे खरेदी, झोपाळा, घसरगुंडी, नौकानयन, बैलगाडी, घोडागाडी, पर्यटकांना फिरविण्यासाठी वाहनखरेदी, सौर ऊर्जा, गोबरगॅस,  दैनंदिन खर्चासाठी कॅश क्रेडिट, मालतारण कर्ज. इ.

             प्रकल्प विषयक :-
हा पर्यटन व्यवसाय सुरु करण्यासाठी आपल्याला  कशा पध्दतीने पर्यटन स्थळ बनवायांचे हे त्या प्रकल्पावर अवलंबून असते. त्यामुळे या प्रकल्पास खर्चची कोणतीही मर्यादा नाही. आपण कशा पध्दतीने हा प्रकल्प उभारता त्यावर खर्च अंवलबून असतो. तसेच या प्रकल्पामध्ये आपणा कोण-कोणत्या गोष्टी उभारणार आहोत, त्याला विविध शासकीय अनुदान मिळू शकते. जर हा प्रकल्प आपण सुरु केल्यास आपल्याला भविष्यात आपण एक यशस्वी उद्योजक बनू शकता.

या व्यवसायाचे  मार्गदर्शन शिबिर चावडी तर्फे आयोजित केले आहे.
अधिक माहितीसाठी :-    7272971971

 

Stay Updated…
Other Blogs
Follow Us On Facebook And Instagram
For More Information Please Call Us On 7272971971

2 responses on "कृषी पर्यटन ......!!!!!!"

  1. Plz send detail about bc agrotourisum

  2. Vaibhav sudhakar AmrutkarJune 7, 2017 at 11:58 am

    Please send details projects for agri tourism.so I am also interested.

Leave a Message

All Right Reserved.