गूगल ऍडचे व्यावसायिक फायदे

Advantages of Google Ads –
“कल्पना सत्यात उतरविण्यासाठी स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा”

आज या तंत्रज्ञानाच्या युगात तुम्हाला कोणतीही माहिती सहज उपलब्ध होत आहे त्याचे कारण म्हणजे “गूगल” आज कोणतीही माहिती तुम्ही गुगलच्या साहाय्याने क्षणात शोधून काढु शकता. गुगल हे एक प्रकारचे सर्च इंजिन आहे जे तुम्हाला हवी आलेलेली माहिती इंटरनेटवरून शोधून काढते.

गूगल याकरिता कोणत्याच प्रकारचे पैसे घेत नाही.गूगल तुम्हाला खूप सेवा ह्या मोफत देत आहे जसे   G-mail, Google Drive, Google Map, ह्या सेवा गूगल मोफत देते मग तुम्हाला विचार येत असेल की गूगल एवढी मोठी कंपनी आहे ती पैसे कसे कमावत असेल.तर या प्रश्नाचे उत्तर आहे “गूगल ऍड” ज्याच्या साहाय्याने उद्योजक आपल्या व्यवसायाची जाहिरात गूगलवर करतात व गुगल याकरीता पैसे घेते.

गूगलने गूगल ऍड हे माध्यम 2000 साली चालू केले तेव्हापासून यामध्ये गूगलने बरेचसे बदल केले व आज हे जाहिरात करण्याकरीता खूप प्रगत मानले जाते.भारतामध्ये गुगल चे 696 लाख वापरकर्ते आहेत जे गूगलवर रोज काही न काही शोधत असतात. व जर कोणी कोणते उत्पादन शोधत असेल तर यामधील 65% लोक हे गूगल ऍडवर क्लिक करतात.

तुम्ही जर एक उद्योजक असाल व 696 लाख गुगल वापरकर्त्यांचा फायदा घेऊन आपल्या व्यवसायाची जाहिरात करायची असेल तर याकरिता तुम्हाला आधी गूगल ऍड समजून घ्यावे लागेल कारण गूगल ऍड हे ऑनलाईन जाहिरात करण्यासाठी खूप मोठे माध्यम आहे ज्यामध्ये तुमच्या व्यवसायाची ऑनलाईन जाहिरात करायला खूप पर्याय दिले आहेत.

आज खूप मोठ्या प्रमाणात गूगलवर जाहिराती केल्या जात आहे गूगल हे ऑनलाईन जाहिरातीसाठी उद्योजकांचे आवडते माध्यम आहे. असायलाच पाहिजे कारण इतर माध्यमापेक्षा हे माध्यम उद्योजकांना परवडणारे आहे.

कारण गूगल हे PPC ( pay per click ) या मॉडेलवर काम करते म्हणजेच तुम्ही दिलेल्या जाहिरातीवर कुणी क्लिक केले तरच तुम्हाला त्याचे पैसे द्यावे लागतात तुमची जाहिरात किती लोकांना दिसली याचे पैसे तुम्हाला द्यावे लागत नाही.

गूगल तुम्ही दिलेली जाहिरात ही जवळपास 20 लाख संकेतस्थळावर आणि 670000 अँप सोबतच Youtube , G-mail वर चालवते आता तुम्ही समजू शकता की गूगल ऍड किती मोठे जाळे आहे. गूगल ऍडच्या साहाय्याने असे समजा इंटरनेटवर तुम्ही जेथे पाहिजे तेथे तुमची जाहिरात करू शकता.चला तर मग आता आपण पाहू की गूगलचे जाहिरात खाते कसे तयार करायचे.

गूगल ऍड खाते कसे तयार करायचे.

गुगल तुम्हाला जाहिरात करण्याकरीता 2000 रु देते. ते तुम्हाला ऑफर कोडच्या माध्यमातून दिले जातात ते फक्त तुम्ही जाहिरात करण्यासाठी वापरू शकता.त्याकरिता तुम्हाला आधी 500 रुपयाची जाहिरात चालू करावी लागेल.गूगल ऍड अकाउंट तयार करण्यासाठी तुमच्याकडे गूगलचा Gmail id असणे आवश्यक आहे.

 bit.ly/3clF5lH  या लिंकवर क्लिक करून तुम्ही गूगल ऍडच्या संकेतस्थळावर जाऊ शकता.

● या संकेतस्थळावर गेल्यावर तुम्हाला तुमच्या Gmail id ने लॉग इन करायचे आहे. हे केल्यानंतर तुम्हाला पुढील पेज वर Create new add account हा पर्याय निवडायचा आहे .

● आता तुम्हाला तेथे Start Advertising हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

● त्यानंतर पुढील पेज व तुम्हाला दोन पर्याय दिसतील त्यातील Individual हा पर्याय निवडा व Next करा.

● पुढील पेज वर तुमच्या संकेतस्थळाचे नाव टाका व नेक्स्ट करा.

तुमचे गूगल ऍडचे खाते तयार झाले आहे आता तुम्ही तुमच्या व्यवसायाची जाहिरात  गूगल ऍडच्या साहाय्याने  करू शकता.आता आपण गुगल वरिल जाहिरातीचे प्रकार समजून घेऊ.

गूगल ऍडचे प्रकार

१)  Search Ads :-

सर्च ऍड म्हणजेच त्या जाहिराती ज्या तुम्ही गूगलवर काही शोध केल्यावर तुम्हाला गूगलच्या पहिल्या पानावर दिसतात याला सर्च इंजिन मार्केटिंग असेही म्हटले जाते. या जाहिराती त्या लोकांसाठी असतात जे गूगलवर काही शोधतात.

जसे की तुम्ही गूगलवर CAR IN PUNE हे शोधले असता तुम्हाला गूगल काही संकेतस्थळ दाखवतो त्यामधील पाहिल्या चार ह्या जाहिराती असतात.

२) Display Ads :-

तुम्ही गूगल ऍडमध्ये लावलेले जाहिरात ही त्याच्या सोबत adsene या माध्यमाने जुळलेल्या संकेतस्थळावर  दाखवते.तुम्ही जर कधी कोणत्या संकेतस्थळावर गेले असाल तर  तुम्हाला तिथे काही जाहिराती दिसतात त्या जाहिराती गुगलने लावलेल्या असतात. ते संकेतस्थळ हे गूगलचे नसतात.त्या संकेतस्थळावर जाहिरात Google Adsense च्या साहाय्याने दाखवली जाते.

३)  Video Ads :-

तुम्ही गूगलवर विडिओ ऍड चालवू शकता त्या ऍड गूगल Youtube सामाजिक माध्यमवर तुमची जाहिरात ते दाखवतात व सोबतच त्याच्या सोबत जुळलेल्या संकेतस्थळावर पण दाखवतात.

४) Shopping Ads :-

 जर तुम्हाला तुमचे काही उत्पादन गूगलवर विकायचे असेल तर तुम्ही या पर्यायाने ते उत्पादन जास्त लोकांनपर्यत पोहचवू शकता व ते विक्री करू शकता.

हे आहेत गूगल ऍड चे ४ प्रकार ज्याच्या साहाय्याने  तुम्ही गूगलवर जाहिरात करू शकता. व आपल्या उत्पादनाची माहिती लोकांपर्यंत पोहचवू शकता.

बघा, गुगलवर जाहिरात करण्यासाठी तसे तर त्यातील तज्ञ लोकांकडूनच जाहिरात करून घ्यावी पण तुमचे जर बजेट कमी असेल व तुम्हाला गुगलवर जाहिरात करायची असेल तर तुमच्यासाठी एक पर्याय आहे.तो म्हणजे गूगल स्मार्ट ऍड यामध्ये तुम्हाला खूप कमी माहिती भरावी लागते ज्यामुळे तुम्ही हे स्वतः करू शकता. तुम्हाला जर या क्षेत्रातील थोडी माहिती असेल तर  तुम्ही स्मार्ट डिस्प्ले ऍड हा पर्याय वापरू शकता.

Smart Display Add कशी तयार करावी .

Create add वर क्लिक करा.

त्यातील Create display add वर क्लिक करा.

नंतर Create smart display add वर क्लिक करा.

यानंतर तुमच्या समोर Google add चे Dashboard येईल.

यामध्ये तुम्हाला काही माहीती भरावी लागेल.

तुम्हाला कोणत्या ठिकाणासाठी ही जाहिरात करायची आहे ते ठरवून घ्या व तेथे ते सिलेक्ट करा.

त्यानंतर बजेट सेट करा तुम्हाला  किती दिवस आणि किती रुपये ऍडमध्ये गुंतवायचे आहे ते बरोबर सिलेक्ट करा.

आता तुमची ऍड ज्या ग्राहकांना दिसायला हवी ते सेट करा.

एक चांगला फोटो किंवा लोगो निवडा. तुम्ही येथे विडिओ सुद्धा लावू शकता विडिओ हा छोटा असावा.

नंतर यामध्ये तुम्हाला एक चांगले शीर्षक लिहावे लागेल लक्षात ठेवा शीर्षकामध्ये तुम्ही तुमचा संपर्क क्रमांक नाही टाकू शकत.हे शीर्षक खूप विचार पूर्वक लिहा कारण या शीर्षकावरूनच तुमची जाहिरात ही किती लोकांना दाखवायची हे गूगल ठरवते कारण ही सर्व प्रक्रिया स्वयंचलित असते.

यानंतर तुमच्या उत्पादनाबद्दल माहिती देणारे वर्णन लिहा ते पण तुम्हाला थोड्या शब्दात लिहायचे आहे. चांगले लिहा जेणेकरून ग्राहक तुमच्या जाहिरातीवर क्लिक करेल.

 नंतर तुमचे संकेतस्थळाचे URL टाका.

हे सर्व तुम्ही सेट केल्यावर तुमची ऍड तुम्ही पब्लिश करू शकता.

हो, smart display add चे काही तोटे सुद्धा आहेत ते म्हणजे यामध्ये सर्व हे गूगल स्वयंचलित आहे.लक्षात घ्या तुम्हाला जर याबद्दल काहीही माहिती नसेल तर यामध्ये जास्त पैसे लावू नका ही जाहिरात तज्ञांकडून करून घ्या. तुम्ही जर माहिती न घेता यामध्ये पैसे लावले तर त्याचा काहीच फायदा होणार नाही कारण यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्पर्धा चालते.सर्वांना आपली जाहिरात ही गुगलच्या पहिल्या पेजवर पहिल्या क्रमांकावर दाखवायची आहे. व जास्तीत जास्त ग्राहकापर्यंत पोहचायचे असते तुम्ही यामध्ये मागे राहू शकता.

आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्की आवडली असेल काही अडचण आल्यास तुम्ही कंमेंट करू शकता चावडी तुम्हाला नक्की तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यास मदत करेल. अश्याच माहितीसाठी चावडीला भेट देत राहा.     

                                                                                            – धिरज तायडे 

“व्यावसायिक ज्ञानाचा पाया भक्कम करा आणि स्वतःचा विकास घडवा.”

Stay Updated…
Other Blogs
Follow Us On Facebook And Instagram
For More Information Please Call Us On 7272971971
                                                                         

Share this:
March 26, 2021

0 responses on "गूगल ऍडचे व्यावसायिक फायदे"

    Leave a Message

    All Right Reserved.