सोयाबीनपासून आरोग्यवर्धक लोणी ..!!!(Soybean Processing करून बनवले जाणारे पदार्थ )
प्राणीज प्रथिनांच्या तुलनेमध्ये वनस्पतीजन्य प्रथिने किंवा मेद अधिक आरोग्यवर्धक असतात. त्यामुळे सोयबीनपासून लोणी तयार करण्याची पध्दत भोपाळ येथील केंद्रीय कृषी-अभियांत्रिकी संस्थने विकसित केली आहे.
सोयबीनमध्ये ४० टक्केपेक्षा अधिक प्रथिने असून ही, प्राणीज प्रथिनांप्रमाणचे असली तरी यातील फायटो रसायनामुळे ह्दयरोगांचा धोका कमी करणारी आहेत. तसेच त्यात वाढीसाठी आवश्यक ती अमिनो आम्ले आहेत. यामुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होत असून, रक्तवाहित्यांची लवचिकता वाढण्यास मदत होते. त्याचे प्रमाण कमी होत असून, रक्तवाहिन्यांची लवचिकता वाढण्यास मदत होते. त्याचे प्रमाणे ही फायटोरसायने, महिलांतील रजोनिवृत्तीदरम्यान येणाऱ्या ओस्टे ओपोरेसिसचे प्रमाण कमी करण्यास मदत करतात. यासाऱ्या आरोग्यवर्धक घटकांमुळे अमेरिकी अत्र व कृषी विभागाच्या वतीने सोयाबीन प्रथिनांचा मोठा पुरस्कार केला आहे. त्यांनी केलेल्या शिफारशीनुसार, रोजच्या आहारामध्ये २५ ग्रॅम सोयप्रथिने असलयास संपृक्त मेदाचे व कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होत असून, त्याचा फायदा एकूण एलडीएल कोलेस्टेरॉलचे योग्य प्रमाण राखण्यासाठी होऊ शकतो.

Soybean Processing करून सोयाबीनपासून आरोग्यवर्धक लोणी दूध, पनीर, मेदरहित पीठ किंवा पूर्ण मेदयुक्त पीठ, एक्सुट्डेड नगेटस् इत्यादी पदार्थ तयार करता येतात. प्रक्रिया करताना त्यातील संपूर्ण पोषक घटकांचा खाद्यापदार्थ रूपांतरीत होताना ऱ्हास होत नाही. याकडे लक्ष ठेवावे. लागते. यापैकीच एक पदार्थ म्हणजे सोयाबीन लोणी. हे लेणी शेंगदाण्याचे लोण्या प्रमाणेच असून, अमेरिकेसह विविध देशांमध्ये ब्रेडबरोबर खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाते. त्याच प्रमाणे आरोग्यवर्धक सॅन्डविचमध्येही त्याचा वापर होतो.
अशी असते ही प्रक्रिया….!!!

- घरातील मिक्सरच्या साह्याने दोन किलोपर्यंत सोय लोणी सहजपणे बनविता येते. एक किलो सोयाबीन पाण्यातून सुमारे ८०० ग्रॅमपर्यंत सोयी लोणी मिळू शकते. या लोण्याचा वापर घरगुती आणि विक्रीसाठीही होऊ शकतो.
- लहान आकाराच्या सोयाबीन लोणी निर्मिती प्रकल्पामध्ये सोयाबीन स्वच्छ करणारे यंत्र, ब्लांचिग व भाजण्यासाठी एक युनिट, कोलायडल मिल, शीतकरण युनिट आणि फिलिंग आणि पॅकेजिंग यंत्र ही यंत्रे असतात.
- स्वच्छ केलेले व आकाराने मोठे सोयाबीन दाण्यावरील साल काढली जाते. त्यानंतर ते भाजून घेतले जातात. भाजलेले दाणे कोलायडल मिलमध्ये टाकून बारीक पीठ केले जाते. त्यात गरजेनुसार तेल, मीठ आणि इमल्सिफायर मिसळले जाते. ही पेस्ट स्थिर होऊन त्यांचे लोण्यामध्ये रूपांतरीत होईपर्यंत तापवले जाते. मिळालेले लोणी थंड करून योग्य आकाराच्या पॅकेटमध्ये किंवा जारमध्ये पॅकेजिंग केले जाते.

- सोय लोण्यामध्ये आणखी चव आणण्यासाठी चिंच, आमचूर पावडर मिसळलेली जाते. त्यामुळे भारतीय लोकांच्या पसंतीस उतरत आहे. १०० ग्रॅम स्थिर केलेले लोण्यामध्ये ५१ ग्रॅम मेद, १४ ग्रॅम कर्बोदके आणि १६ ग्रॅम प्रथिने असतात. प्रथिनातून ६०० कॅलरी ऊर्जा, तर मेदापासून ३४० कॅलरी मिळतात.
- सोयाबीन लोणी बनविण्याच्या प्रक्रियेवर भोपाळ येथील सोयाबीन प्रक्रिया व वापर केंद्र, केंद्र कृषी अभियांत्रिकी संस्थेमध्ये संशोधन करण्यात आले आहे.
- संपूर्ण सोयाबीन दाणे चांगल्या प्रकारे भाजून त्यापासून सोय लोणी बनवले जाते. ही प्रक्रिया शेंगदाणे लोण्याप्रमाणेच असून, त्यांची चव व पोतही त्याप्रमाणेच असतो. मात्र त्यातील एकूण आणि संपूर्ण मेदाचे प्रमाण हे शेंग लोण्यापेक्षा कमी असते. ज्यांना शेंगदाण्यांच्या पदार्थांची अॅलर्जी असते. त्यांच्यासाठी सोय लोणी हे अत्यंत उपयुक्त असते.
चावडी विषयक :-
चावडी तर्फे सोयाबीन प्रक्रिया उद्योगा संबधी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले असून या प्रशिक्षणासाठी आगाऊ नाव-नोंदणी आवश्यक आहे.

नावनोंदणी व अधिक माहितीसाठी :- ७२ ७२ ९७१ ९७१
वाचा :- सोयाबीन तेल निर्मिती उद्योग.…!!!
संपूर्ण वाचण्यासाठी क्लिंक करा :- :- http://wp.me/p6Y2eu-1jZ
सुशिक्षित बेरोजगारांसाठी एक बिनभांडवली उद्योग-सोयाबीन प्रक्रिया उद्योग…..!!!
संपूर्ण वाचण्यासाठी क्लिंक करा :- :- http://wp.me/p6Y2eu-ue
Stay Updated…
Other Blogs
Follow Us On Facebook And Instagram
For More Information Please Call Us On 7272971971
2 responses on "सोयाबीनपासून आरोग्यवर्धक लोणी"
Leave a Message
You must be logged in to post a comment.












Nice information sir
नविन व्यवसाय सुरु करणाऱ्या उद्योजकांसाठी अत्यंत उपयुक्त माहिती.