• No products in the cart.

हॉटेलचा बिझनेस वाढवण्यासाठी चे 5 महत्वपूर्ण फॅक्टर

हॉटेलचा बिझनेस वाढवण्यासाठी चे 5 महत्वपूर्ण फॅक्टर

हॉटेल व्यवसाय अनेक वर्षानुवर्षे आपल्या महाराष्ट्रमध्ये पसंतीचा विषय राहिला आहे ..

माझा एक मित्र आहे तो सध्या शासकीय नोकरी मध्ये आहे त्याच्या भावाने एक छोटेसे हॉटेल सुरू केले मी सहज एक दिवस हॉटेलवर गेलो होतो तर हा आमचा शासकीय नोकरी वाला मित्र तिथे आला होता आणि चहा बनवत होता तो मला म्हणाला यार माझी खूप वर्षांची इच्छा होती की आपले असे एखाद्या छोटंसं हॉटेल असावे..

मित्रांनो , माझा एखादा छोटासा व्यवसाय असावा असे बरेच लोकांना वाटते फक्त मला वैयक्तिक जर विचाराल तर मला असे वाटते की व्यवसाय असावा म्हणून तो सुरु करून उपयोग नाही तर तो टिकावा म्हणून काहीतरी केले पाहिजे..

हॉटेल टाकण्याची चढाओढ आपल्याकडे आहेच पण सगळ्यांचेच हॉटेल चालतात असं नाही..

चावडी च्या माध्यमातून सध्या मी काही हॉटेल व्यवसायिकांना त्यांचा व्यवसाय कसा वाढवावा याबाबत मार्गदर्शन करतोय , त्यांच्याशी आणि तेथील येणाऱ्या ग्राहकांशी चर्चा केल्यावर ती मला ज्या काही गोष्टी जाणवल्या त्या खास मी तुमच्यासोबत शेअर करतोय

हॉटेल चालण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे..

  1. अर्थात सगळ्यात पहिले टेस्ट
  2. दुसरं महत्त्वाचं म्हणजे शहरातील जर हॉटेल असेल तर ambience. कारण शहरात लोक घरातल्या वातावरणाला बदल हवा म्हणून हॉटेलमध्ये जाणं पसंत करतात अशा वेळी जर ambience असेल तर मनःशांती मिळते असे अनेक ग्राहक सांगतात.
  3. सेवा – ग्राहकाला हॉटेलमध्ये गेल्यावर आदरातिथ्य करून घ्यायला आवडतं त्यामुळे सेवा महत्त्वाची आहे
  4. आता सर्वात महत्त्वाचं आलेला ग्राहक पुन्हा पुन्हा यावा यासाठी वेगवेगळे उपक्रम उदा.. लहान मुलांसाठी खेळण्या लेडीज साठी मेहंदीचा कार्यक्रम ई.
  5. वेगवेगळ्या सेगमेंट मधल्या ग्राहकांना attract करण्याची स्ट्रॅटेजी …
    उदा: जर हायवेवरील हॉटेल असेल तर रोडवरील लोकांना थांबवण्यासाठी टारगेट कस्टमर ट्रक ड्रायव्हर असेल तर आपण रोटी ची किंमत कमी करू शकतो

जसे की रोटी फक्त पाच रुपये बरेच लोक आकर्षित होतील

शहरामध्ये पुढच्या वेळी येण्यासाठी 20% कॅशबॅक कुपन अनेक लोकांना आवडेल

तरुण मुलांसाठी काही स्पेशल दिवशी कोल्ड कॉफी फ्रेंडशिप डे सारख्या दिवशी स्पेशल डिस्काउंट..इ इ…

मित्रांनो वरती चे पाच मुद्दे सांगितले आहेत त्यातील पहिली चार मुद्दे तुम्हाला माहिती आहेत; महत्त्वाचा पाचवा मुद्दा आहे कारण ग्राहकांनी माझ्याकडेच का यावे आणि त्याने परत परत माझ्याकडेच येत राहावे या दोन गोष्टींवर ती प्रचंड काम करणे आवश्यक आहे .. मी माझ्या बिजनेस ब्ल्यू प्रिंट या हाऊ टू ग्रो बिझनेस ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सुद्धा अशा वेगवेगळ्या गोष्टी आवर्जून प्रत्येक उद्योजकाला सध्या शिकवण्यावर भर देतोय कारण जर पहिले चार मुद्दे म्हणजे टेस्ट सर्विस अंबिएन्स ही जरी दिले पण ग्राहकच आला नाही तर आपल्या कष्टाला काहीही उपयोग नाही..

तुम्हालाकाय वाटतं?

अमित मखरे

July 16, 2022

0 responses on "हॉटेलचा बिझनेस वाढवण्यासाठी चे 5 महत्वपूर्ण फॅक्टर"

Leave a Message

Contact Details

Contact No: +917272971971
Comany Name : Chawadi Training and Consultancy Pvt. Ltd.
Adress: First Floor, Radha House Building, Tapovan Rd, Nirmal Nagar, near Laxmi nagar kaman, Savedi, Tal. Nagar, Dist- Ahilyanagar 414003, maharashtra ,India
top
All Right Reserved.