मसाला पॅकेजिंग…..
भारतामध्ये मसाले विविध प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.
- खडा मसाला आहे, त्या स्थितीमध्ये सुकवलेल्या मसाल्यांना खडा मसाला म्हणतात.
- भुकटी करून, दळून स्वतंत्र किंवा वेगवेगळ्या मिश्रणामध्ये.
- वाळवलेल्या किंवा निर्जंलित स्वरूपात (डिहायड्रेटेड)उदा. कसुरी मेथी, लसूण इ.
अर्क स्वरूपात.
कोणत्याही प्रकारामध्ये असला, तरी मसाला पॅकेजिंग मध्ये खालील बाबींकडे प्राधान्याने लक्ष द्यावे लागते.
- मसाल्यांचा गंध :–
मसाल्यांना त्यांच्या विशिष्ट गंधामुळे महत्त्व असते. त्यामुळे गंध अबाधित राहिला पाहिजे. तसेच त्याच्या चवीत बदल होऊन चालत नाही. मसाला पॅकेजिंग आरेखन करताना त्याची संरचना ही एमव्हीटीआर म्हणजे मॉईश्चर व्हेपर ट्रान्समिशन रेटनुसार ठरवली पाहिजे.
- मसाल्यावरील आर्द्रतेचा परिणाम :-
वर उल्लेखलेल्या एमव्हीटीआर प्रकारच्या पॅकेजिंगचा परिणाम मसाल्याच्या बाष्प खेचून घेण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतो. पॅकेजिंग आरेखन करताना त्याची संरचना हा आर्द्रतेला प्रतिबंध करणारी असावी लागते.
- विविध घटकांपासून प्रतिबंध करण्याची पॅकेजिंगची क्षमता :-
पॅकेजिंग हे बाह्य वायूंना रोखणारी असणे आवश्यक आहे. थोडक्यात पॅकेजिंग हे वायूना प्रतिबंध करणारे असावे.
- गळती रोधक तंत्रज्ञान :–
पॅकेजिंगमध्ये मसाल्यातील गंध, वास राखण्यासोबतच त्यातील तेल किंवा मालाची गळती रोखण्याची क्षमता असावी. अत्यंत बारीक भुकटी असल्यास ती सिलिंग क्षेत्रामध्ये आल्यास अडचणीची ठरू शकते. त्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक हे काम करावे लागते. तसेच त्या योग्य यंत्र सामग्रीही बसवावी लागते.
- साठवण कालावधी :–
पदार्थ किती काळ साठवला जाणार आहे, यासोबतच पॅकेजिंगची आयु मर्यादा याचाही विचार केला पाहिजे.
- अतिनील किरणांचा परिणाम :-
पॅक केलेल्या मसाल्यावर सूर्यप्रकाश पडत असेल अथवा सूर्यप्रकाशात राहण्याची शक्यता असल्यास त्यावर अतिनील किरणांचे काय परिणाम होतात, याचीही शास्त्रीय पद्धतीने कारणी मांसा करणे आवश्यक आहे.
- कीडीपासून बचाव :–
मसाल्यावर होणाऱ्या विविध किडीं व सूक्ष्मजीवांचा प्रादुर्भाव यांचाही विचार पॅकेजिंग आरेखन करताना केला पाहिजे.
सर्वसाधारणपणे मसाले पॅकेजिंगसाठी खालील प्रकार वापरले जातात.
१. पाऊच व दुहेरी आवरणाचे बॉक्सेस.
२. एकापेक्षा अधिक थर असलेले फिल्म पाऊच.
३. कंपोझिट पॅक.
४. स्पायरल कंपोझिट पॅक.
५. टीन कंटेनर.
६. काचेच्या बाटल्या.
७. प्लॅस्टिक कंटेनर.
प्रामुख्याने पेस्ट स्वरूपातील मसाले हे प्लॅस्टिक कंटेनरमध्ये पॅक केले जातात.
अधिक माहितीसाठी :- 7249856424
0 responses on "मसाला पॅकेजिंग"